Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा प्रामुख्याने पवना धरणातून केला जातो. सध्या धरणातील उपलब्ध पाणीसाठा चिंताजनकरीत्या कमी झाला असून यंदा मान्सूनच्या आगमनास झालेला विलंब लक्षात घेता भविष्यातील पाणीटंचाईची संभाव्य परिस्थिती टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिनांक २० जून २०२६ पासून शहरात १५ टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील नागरिकांना आवश्यक पिण्याचे पाणी उपलब्ध राहावे तसेच उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करता यावे यासाठी ही उपाययोजना करण्यात येत आहे. पाणी कपातीच्या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत जबाबदारीने व काटकसरीने करणे आवश्यक आहे. पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी महापालिकेकडून खालील नमूद केल्याप्रमाणे निर्बंध लागू करण्यात येत आहेत : * स्विमिंग पूल भरण्यासाठी…

Read More

विश्वशांती घुमटाच्या साक्षीने सामूहिक योगासने; ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’चा संदेश पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ या संकल्पनेवर आधारित येथील एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एडीटी) विद्यापीठात सामूहिक योगासनांच्या प्रात्यक्षिकांद्वारे १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. समग्र विश्वाला शांततेचा संदेश देणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज विश्वशांती घुमटाच्या साक्षीने झालेल्या या योगोत्सवात विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी उपस्थितांनी निरोगी जीवनासाठी दररोज योगाभ्यास करण्याचा संकल्प केला. हा आंतरराष्ट्रीय योग दिन जगातील सर्वात उंच ‘विश्वशांती घुमट’ या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे साजरा करण्यात आला. विज्ञान आणि अध्यात्माचा अनोखा संगम साधणाऱ्या या भव्य घुमटाची संकल्पना व निर्मिती माईर्स शिक्षण…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधील विभाग प्रमुख प्रा. डॉ. समीर सावरकर यांनी महाराष्ट्र रायफल असोसिएशन वरळी, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या कप्तान एस. जे. एझिकेल मेमोरियल महाराष्ट्र राज्य शूटिंग चॅम्पियनशिप या राज्यस्तरीय शूटिंग स्पर्धेत ०.२२ कॅलिबर लॉग रायफल ५० मीटर प्रोन (पालथ्याने) या प्रकारात उत्कृष्ट नेमबाजी करत रौप्य पदक पटकावले. डॉ. सावरकर यांना राष्ट्रीय प्रशिक्षक शंतनू भिडे यांनी मार्गदर्शन केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश…

Read More

एआय अँड एमएल साठी ॲस्पायर नॉलेज अँड स्किल्स, बीएससी (ऑनर्स) उपयुक्त – डॉ. संजय गांधी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) एआय बाबत सर्वत्र उत्सुकता आणि भीती निर्माण झाली आहे. संगणक आणि मोबाईल ज्याप्रमाणे आपण सहजपणे स्वीकारला आणि आता ते आपल्या जीवनाचा एक भाग झाला आहे. त्याचप्रमाणे पुढील काळात एआय देखील सर्वसामान्यांच्या जीवनाचा एक भाग असेल. भारत देश हा जगात या एआय वापरामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयटी कंपन्या आणि त्यांच्याशी संबंधित सेवा या सर्वात जास्त भारतात आहेत, त्यामुळे एआयशी संबंधित सर्वात जास्त रोजगार आणि गुंतवणूक भविष्यकाळात भारतामध्ये होईल अशी अपेक्षा करियर मार्गदर्शक विवेक वेलणकर यांनी व्यक्त केली. पुण्यातील ॲस्पायर नॉलेज अँड स्किल्स…

Read More

– रेल्वेफाटकमुक्तीच्या दिशेने ‘पीएमआरडीए’चे महत्त्वाचे पाऊल! पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्रातील वाहतूककोंडी सोडविण्याच्या आणि रस्ते रेल्वेफाटकमुक्त करण्याच्या दृष्टीने आज (शुक्रवार) एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. ‘पीएमआरडीए’ हद्दीतील रेल्वे उड्डाणपूल (आरओबी) आणि रेल्वे मार्गाखालील भुयारी मार्ग (आरयूबी) यांच्या जलद व दर्जेदार बांधकामासाठी ‘पीएमआरडीए’ने ‘महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.’ (महारेल) या कंपनीसोबत अधिकृत सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे पुणे महानगर प्रदेशातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वाहतुकीच्या प्रश्नांच्या निराकरणास मोठी मदत होणार आहे. मुख्यमंत्री तथा ‘पीएमआरडीए’चे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगर प्रदेशातील वाहतूककोंडीची समस्या गांभीर्याने घेत, रेल्वेफाटकमुक्तीसाठी विशेष पुढाकार घेतला होता. यासंदर्भात…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कलाकारांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सुरू केलेला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. आपल्या शहरामध्ये विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे अनेक गुणी कलाकार आहेत. अनेकदा अशा कलाकारांचे योगदान समाजापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचत नाही किंवा त्यांना योग्य वेळी प्रोत्साहन मिळत नाही. अशा परिस्थितीत कलाकारांचा शोध घेऊन त्यांचा सन्मान करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे. अशा उपक्रमांमुळे कलाकारांना नवसंजीवनी मिळते, तसेच युवा पिढीलाही कलेच्या क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळते, असे मत आंतरराष्ट्रीय कीर्तिचे कथक नर्तक पंडित डॉ. नंदकिशोर कपोते यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकात आपल्या कार्यकर्तृत्वाने मोलाची भर घालणाऱ्या तसेच कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रात…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये दररोज मोठ्या संख्येने नागरिक विविध कामानिमित्त येत असतात. नागरिकांचे म्हणणे संवेदनशीलतेने व संयमाने ऐकून त्यांच्या तक्रारी, सूचना आणि मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व विभागप्रमुख आणि अधिकाऱ्यांना दिले आहेत. महानगरपालिकेत नागरिकांच्या तक्रारी, सूचना तसेच विविध विषयांबाबत प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी दर मंगळवार व गुरुवारी दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत नागरिक भेटीचे आयोजन करण्यात येते. या कालावधीत विविध विभागांशी संबंधित प्रश्न मांडण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने आयुक्त कार्यालयात उपस्थित राहतात. मात्र, नागरिकांची वाढती संख्या आणि त्याचवेळी अनेकदा अचानकपणे येणाऱ्या राज्य व केंद्र शासनाच्या…

Read More

सीएसआर निधीतून साकार होणार ‘अक्षरविश्व’ ज्ञानसंकुल; महापालिकेवर एक रुपयाचाही आर्थिक भार नाही निधी कमी पडल्यास महापौर स्वतः करणार आर्थिक मदत पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहराला केवळ औद्योगिक नगरी म्हणून नव्हे, तर ज्ञान, साहित्य, संस्कृती आणि संशोधनाचे केंद्र म्हणून नवी ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने महापौर भा. रवि लांडगे यांच्या संकल्पनेतून ‘अक्षरविश्व’ या अत्याधुनिक ज्ञानसंकुलाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार होत आहे. १५ जून २०२६ रोजी झालेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मौजे भोसरी (कासारवाडी) येथील सार्वजनिक सुविधा क्षेत्रातील सुमारे ८,८३१.३६ चौरस मीटर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक ग्रंथालय आणि ज्ञानसंकुल उभारण्याच्या उपसूचनेस मान्यता देण्यात आली. हा प्रकल्प आनंदग्राम सामाजिक सेवाभावी संस्था, भोसरी…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अभिनेत्री तथा खासदार कंगना रानौत निर्मित “भारत भाग्य विधाता” हा हिंदी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाचे दिग्दर्शक मनोज तापडिया,चित्रपट निर्मात्या बबीता अशीश्वाल तसेच अभिनेत्री गिरिजा ओक आणि स्मिता तांबे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांची आज सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान चित्रपटाच्या निर्मितीमागील संकल्पना, कथानक आणि समाजाभिमुख विषयांबाबत चर्चा करण्यात आली. महापौर रवि लांडगे यांनी चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा देत चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. यावेळी महा मेट्रो पीसीएमसीच्या ब्रँड ॲम्बेसेडर संगीता तरडे तसेच जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते. महापौर रवि लांडगे म्हणाले, ‘चित्रपट हे समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. ‘भारत भाग्य विधाता’सारखे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सत्ताधारी भाजपकडून निव्वळ खर्चाचा अंजेडा राबवण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे. महापौरांसाठी तब्बल 30 लाखांची तर, आयुक्तांसाठी 19 लाखांची अलिशान गाडी खरेदी करण्यात आली आहे. या वाहन खरेदीसह विकासकामांच्या इतर खर्चास स्थायी समितीच्या बुधवारी (दि.17) झालेल्या सभेत मंजुरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे होते. बैठकीत स्थायी समिती सदस्यांसह आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, नगर सचिव मुकेश कोळप तसेच, विषयाशी संबंधित विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते. महापौर व आयुक्तांच्या दिमतीला प्रशासनाकडून नवीनच वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. असे असतानाही त्यांच्यासाठी दोन अलिशान गाड्या खरेदी करण्यात…

Read More