- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ तालुक्याला जागतिक पातळीवर पर्यटन केंद्र म्हणून ओळख मिळवून देणारा महत्त्वाकांक्षी लोणावळा स्काय वॉक प्रकल्प लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झालेल्या प्राथमिक चर्चेनंतर, पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत प्रकल्पाच्या तांत्रिक बाजूंचा सखोल आढावा घेण्यात आला. यामध्ये प्रकल्पासाठीची जागा, पर्यायी जोडणी रस्ते आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या योजनांवर विशेष चर्चा झाली. आमदार सुनील शेळके यांच्या म्हणण्यानुसार, हा प्रकल्प केवळ मावळच्या पर्यटनालाच नव्हे, तर येथील स्थानिकांना रोजगार आणि व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध करून…
पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेचा वर्ष २०२६-२७ चा अर्थसंकल्प अधिक लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या ‘अंदाजपत्रकात नागरी सहभाग’ या उपक्रमाला यंदा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अंदाजपत्रकासाठी महापालिकेच्या आठ प्रभागांमधून २ हजार ७०० पेक्षा जास्त नागरिकांचे अभिप्राय प्राप्त झाले आहेत. मागील वर्षी या उपक्रमात २ हजार २७९ नागरिक सहभागी झाले होते. त्या तुलनेत यंदा चांगला प्रतिसाद मिळाला असून या उपक्रमात सहभागी होण्यासाठी १५ सप्टेंबर २०२५ अंतिम मुदत आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते १५ ऑगस्ट २०२५ रोजी या उपक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर नागरिकांना ऑनलाईन अभिप्राय देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. नागरिकांनी…
काळेवाडी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विजयनगर काळेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते विजय सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम घेऊन आदर्श घडविला. वाढदिवसानिमित्त विजयनगर येथील जिजाऊ क्लिनिक येथे वृक्षारोपण कार्यक्रम, स्नेह छाया प्रकल्प दिघी येथील विद्यार्थ्यांना अन्नदान सामुग्री देऊन व नगद नारायण वारकरी संस्था आळंदी येथील वारकरी मुलांना अन्नदान सामग्री व रात्री काळेवाडी प्रभागातील महिलांसाठी खेळ पैठणीचा या कार्यक्रमाने वाढदिवस साजरा केला, कोठे बॅनरबाजी न करता एक सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्याचा विजय भाऊ सुतार मित्रपरिवाराने निर्णय घेऊन स्तुत्य उपक्रम राबवल्याने काळेवाडी परिसरातील नागरिकांनी शुभेच्छाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे. काळेवाडी परिसरातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी विजय सुतार नेहमी अग्रेसर भूमिका घेत, शासन…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्र. २८ रहाटणी पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोड वरील छत्रपती युवा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे जिरेटोप शिल्प उभारण्यात यावे, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्तांकडे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्र. २८ रहाटणी पिंपळे सौदागर मध्ये महानगरपालिकेच्या वतीने अनेक लोकउपयोगी प्रकल्प राबविले आहेत सुसज्य रस्ते, उद्यान, क्रीडांगणे, शिल्प व इतर प्रकल्प साकारण्यात आले असून, त्यानुसार महानगरपालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागामार्फत कुणाल आयकॉन रोड हा अत्याधुनिक पद्धतीने विकसित करण्यात येत असून रस्त्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे. या कुणाल आयकॉन रोड वरील छत्रपती युवा चौक परिसरात येथे लहान मोठ्या…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या दैनंदिन समस्या केवळ एका फोन कॉलवर सोडविण्याचा नवा उपक्रम आमदार शंकर जगताप यांनी हाती घेतला आहे. वन कॉल प्रोब्लेम सोल्व्ह संकल्पना राबवत ‘आपल्या सर्वांची, आपली हेल्पलाईन’ सुरुवात करताना त्यांनी हेल्पलाईन क्रमांक ७५७५९१११११ जाहीर केला. या हेल्पलाईनद्वारे पाणीपुरवठा, रस्ते, कचरा व्यवस्थापन, आरोग्य, वीजपुरवठा तसेच शासकीय कार्यालयांशी संबंधित प्रश्न नोंदविता येणार असून, संबंधित विभागाशी समन्वय साधून त्वरित कार्यवाही केली जाणार आहे. नोंदविलेल्या तक्रारींवर तातडीने फॉलो-अप घेतला जाईल, अशी माहितीही देण्यात आली. आमदार जगताप म्हणाले, “नागरिकांच्या समस्या सोडविणे ही माझी जबाबदारी आहे. लोकांना त्यांच्या छोट्या-मोठ्या अडचणींसाठी कार्यालयीन दारं ठोठावावी लागू नयेत, म्हणून ही हेल्पलाईन…
काळेवाडी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विजयनगर काळेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते विजय सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम घेऊन आदर्श घडविला. वाढदिवसानिमित्त विजयनगर येथील जिजाऊ क्लिनिक येथे वृक्षारोपण कार्यक्रम, स्नेह छाया प्रकल्प दिघी येथील विद्यार्थ्यांना अन्नदान सामुग्री देऊन व नगद नारायण वारकरी संस्था आळंदी येथील वारकरी मुलांना अन्नदान सामग्री व रात्री काळेवाडी प्रभागातील महिलांसाठी खेळ पैठणीचा या कार्यक्रमाने वाढदिवस साजरा केला, कोठे बॅनरबाजी न करता एक सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्याचा विजय भाऊ सुतार मित्रपरिवाराने निर्णय घेऊन स्तुत्य उपक्रम राबवल्याने काळेवाडी परिसरातील नागरिकांनी शुभेच्छाचा व कौतुकाचा वर्षाव होत . याबाबत सविस्तर वृत्त असे की काळेवाडी परिसरातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी विजय सुतार…
– हिंदूभषण स्मारक ट्रस्टच्या पुढाकाराने राज्यातील लक्षवेधी सोहळा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे संपूर्ण जगाला हेवा वाटावा असे भव्य-दिव्य आणि सर्वांत उंच पूर्णाकृती शिल्प अर्थात ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात येत आहे. भगवा ध्वज हा शौर्याचे आणि स्वाभिमानाचे प्रतिक असून, या ध्वजाला आणि भगव्याच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या शंभुराजांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वांत मोठा ढोल-ताशा ऐतिहासिक अन् गगनभेदी निनाद सोहळा आयोजित केला आहे. बोऱ्हाडेवाडी-मोशी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या जागेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या मान्यतेने छत्रपती संभाजी महाराज यांचे पूर्णाकृती शिल्प आणि शंभुसृष्टी उभारण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने तरुण पिढीला एकत्र आणण्यासाठी आणि त्यांना सामाजिक बदलाचे सैनिक बनवण्यासाठी “युवा जोडो अभियान” हा महत्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवला जाणारा हा उपक्रम तरुणांना लोकशाही मूल्ये, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रविकासात सहभागी होण्यासाठी प्रेरित करणारा आहे. १० आणि ११ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबई येथील टिळक भवन येथे पार पडलेल्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत या अभियानाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीस भारतीय युवक काँग्रेसचे महासचिव तथा महाराष्ट्र प्रभारी अजय चिकारा, सहप्रभारी नवज्योत संधू आणि शांभवी शुक्ला यांच्यासह सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्हा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आमदार अमित गोरखे यांच्या मातोश्री आणि माजी नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त कलारंग कला संस्थेने ‘गुणवंत विद्यार्थ्यांचा व महिलांचा गौरव सोहळा’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पिंपरी-चिंचवड येथील संभाजीनगरमधील साई उद्यानात हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला नागरिकांनी विद्यार्थांसह पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सुरुवात प्रा. गणेश शिंदे यांच्या ‘जीवन सुंदर आहे’ या प्रेरणादायी व्याख्यानाने झाली. त्यांनी सकारात्मक दृष्टीने जीवनाकडे पाहण्याचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले. त्यांच्या प्रभावी विचारामुळे उपस्थितांना चांगलाच आनंद झाला. यानंतर दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या ४२८ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी या ठिकाणी महाविकास आघाडी आयोजित काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष श.प.,शिवसेना (उबाठा) व इतर घटक पक्षांच्या वतीने जन सुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आले. लोकशाहीची हत्या व गळा घोटणारे हे विधेयक नागरिकांच्या हक्कांची पायमल्ली करणारे आहे. तेव्हा सरकारने अशा प्रकारचे विधेयक लागू न करता ते रद्द करावे यासाठी हा महाविकास आघाडी च्या सर्व मित्र पक्षाने पिंपरी चौकामध्ये मोठ्या प्रमाणात पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा देत या आंदोलनात सहभागी झाले. काँग्रेस शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष तुषार कामठे, देवेंद्र तायडे,…
