- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नक्षत्राचं देणं काव्यमंचच्या वतीने संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त या भव्य राज्यस्तरीय सोहळयाचे आयोजन सायन्स पार्क नाट्यगृह, चिंचवड, येथे आयोजन करण्यात आले होते. वृक्ष पूजन करून, झाडाला पाणी घालून,पर्यावरण संदेश देत. कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध उद्योजक नितीनशेठ लोणारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कवी,लेखक, समाजसेवक रामचंद्र पंडित, (सातारा )कार्यक्रमाचे उद्घाटक नितीनशेठ लोणारी, नक्षत्राचं देणं काव्यमंच चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजेंद्र सोनवणे, श्रीकांत चौगुले, डॉ.अलका नाईक, सुलभा चव्हाण, अंजू सोनवणे,योगेश बाहेती आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी,साहित्यिक, समाजसेवक रामचंद्र पंडित आपल्या अध्यक्ष भाषणात म्हणाले की, ” नक्षत्राचं देणं काव्यमंचची यशस्वी वाटचाल कौतुकास पात्र आहे.…
मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ तालुक्यात यंदा सुमारे ७ ते ८ हजार एकर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली आहे. परंतु या पिकावर तांबा व करपा या रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. सोमवार, दि. १५ सप्टेंबर २०२५ पासून प्रत्येक भात उत्पादक शेतकऱ्यास औषध फवारणीसाठी पिक संरक्षण कर्ज योजनेअंतर्गत १०,००० रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेत आत्तापर्यंत केवळ ४८३ शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करून सहभाग घेतला आहे. मात्र संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आसमंत उजळून टाकणारे भगवा ध्वज… ढोल-ताशांचा गगनभेदी निनाद…आणि मर्दानी खेळ सादरकरणाऱ्या मावळ्यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके… आणि त्याला शिवगीत सादरकर्ते अवधुत गांधी यांच्या मावळी सुरांची साथ… शिव-शंभूभक्तांची अफाट गर्दी… आणि साक्षात वरुणराजाचा जलाभिषेक… असा ना भूतो ना भविष्यती अनुभव हजारो शिव-शंभूप्रेमी आणि पिंपरी-चिंचवडकरांनी घेतला. निमित्त होते, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जगातील सर्वांत उंच शिल्प आणि शंभू सृष्टीला ढोल-ताशांची रोमहर्षक ऐतिहासिक मानवंदनेचे. हिंदुभूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ढोल-ताशा महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकाराने ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ला ऐतिहासिक मानवंदना सोहळ्याचे आयोजन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र, मोशी येथे करण्यात…
कॅम्प एज्युकेशन सोसायटीतील आयटीआयच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्पाची मुहुर्तमेढ प्राधिकरण, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)-“शिक्षणाबरोबरच सामाजिक जबाबदारीची जाणीव होणे ही काळाची गरज आहे. सौरऊर्जा प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष तंत्रज्ञान समजेल, वीज बचत होईल आणि पर्यावरणपूरक ऊर्जा वापराचा आदर्श समाजासमोर उभा राहील,” असे प्रतिपादन शिवसेनेच्या उपनेत्या सुलभा उबाळे यांनी निगडी प्राधिकरण येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI) सौरऊर्जा प्रकल्पाच्या लोकार्पणप्रसंगी केले. कॅम्प एज्युकेशन सोसायटीतील आयटीआयच्या छतावर पाच किलोवॅट क्षमतेचे सोलार पॅनल बसविण्यात आले आहे. या उपक्रमामुळे संस्थेची दरमहा हजारो रुपयांची वीज बचत होणार असून, प्रशिक्षणार्थ्यांना आधुनिक ऊर्जातंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी संस्थेचे माजी प्रशिक्षणार्थी व पुणे जिल्हा महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड हे देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक असून पिंपरी चिंचवड महापालिका दरवर्षी अर्थसंकल्प तयार करताना नागरिकांचे अभिप्राय व सूचना विचारात घेते. त्या अनुषंगाने आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अंदाजपत्रकात नागरी सहभाग’ हा उपक्रम महापालिकेने हाती घेतला असून या उपक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन अर्थसंकल्प २०२६-२७ साठी जास्तीतजास्त अभिप्राय नोंदवावेत, असे आवाहन महापालिका उपायुक्त अण्णा बोदडे यांनी केले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते १५ ऑगस्ट २०२५ रोजी ‘अंदाजपत्रकात नागरी सहभाग’ या उपक्रमाला सुरुवात झाली. या उपक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथील एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या पुढाकाराने शहरात रीड्यूस – रीयुज – रिसायकल (आर.आर.आर ) सेंटर सुरू करण्यात आले आहेत. मोरवाडी येथील कापसे उद्यानातील आर.आर.आर. सेंटरला शनिवारी महापालिकेचे उपायुक्त सचिन पवार यांनी भेट देऊन उपक्रमाचा सविस्तर आढावा घेतला. शहरातील आठही प्रभागांत उभारण्यात आलेल्या या केंद्रांमधून नागरिकांकडून घरात पडून असलेल्या पण अजूनही उपयोगी वस्तू संकलित केल्या जात आहेत. त्यानंतर या वस्तू गरजूंपर्यंत मोफत पोहोचवल्या जातात. या उपक्रमामुळे शहरातील कचऱ्याचे प्रमाण कमी होत असून गरजूंना उपयुक्त साहित्य सहज उपलब्ध होत आहे. “घरातील वापरण्यायोग्य वस्तू कचऱ्यात न टाकता जर या केंद्रांवर आणल्या, तर त्या इतरांना…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत विद्यार्थी विकास मंडळ आणि डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पिंपरी पुणे -१८ यांच्या संयुक्त विद्यमाने जल्लोष २०२५-२६ जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा पिंपरी येथील डॉ. डी. वाय पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात सोमवारी (दि. १५) सकाळी ९ वाजल्यापासून सुरू होणार आहे. पिंपरी चिंचवड शहर, मावळ, खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील, पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी २७ प्रकारांमध्ये विविध स्पर्धांत भाग घेऊन सहभागी होता येईल. संगीत विभागात शास्त्रीय भारतीय गायन, टाळ वाद्य, स्वर वाद्य, सुगम संगीत भारतीय व पाश्चात्य, समूहगान, लोकसंगीत…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘संवादाचे माध्यम असलेल्या भाषा मानवी जीवन समृद्ध करतात!’ असे विचार ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा येथे शनिवार, (दिनांक १३ सप्टेंबर) व्यक्त केले. पालिदिनाचे औचित्य साधून लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान, पिंपरी आयोजित पाली परिसंवादात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डाॅ. श्रीपाल सबनीस बोलत होते. स्वागताध्यक्ष प्राचार्य डाॅ. शिवलिंग मेनकुदळे, पाली भाषा अभ्यासक ॲड. डाॅ. सुगंध वाघमारे, मनीषा भोसले, लेखिका ललिता सबनीस, लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती, समन्वयक प्राचार्य डाॅ. पांडुरंग भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. डाॅ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, ‘येत्या १७ सप्टेंबर…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे आणि महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुजाता सुनील पालांडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. पिंपरी-चिंचवड: काँग्रेस पक्षाने बिहार निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींचा अपमान केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाने आज पिंपरी- चिंचवडमध्ये जोरदार आंदोलन केले. “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” या भारतीय संस्कृतीचा आणि मातृशक्तीचा अवमान करणाऱ्या काँग्रेसच्या विचारधारेचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शहरातील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विशेषतः महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. पिंपरी येथील भाजपा पक्ष कार्यालयाजवळ सकाळी १० वाजता हे आंदोलन झाले. शहराध्यक्ष श्री.शत्रुघ्न काटे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. “काँग्रेसची विचारधारा नेहमीच…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त (१७ सप्टेंबर) ते महात्मा गांधी जयंती (०२ ऑक्टोबर) या कालावधीत भाजपातर्फे सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे २१ सप्टेंबर रोजी ‘नमो युवा रन’ नशामुक्त भारत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने भाजयुमोचे प्रदेश सचिव व नमो युवा रन या अभियानाचे पिंपरी चिंचवड शहराचे सहसंयोजक अजित कुलथे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली. यावेळी आपल्या पिंपरी चिंचवड शहरात होणाऱ्या ‘नमो युवा रन’ मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष दिनेश यादव, संकेत चोंधे,…
