Author: maharashtrabreakingnews.com

महाराष्ट्रातील पहिल्या ‘इलेक्ट्रिक कन्व्हर्टेड’ रिक्षाचे होणार लोकार्पण पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र शासनाने १७ सप्टेंबर हा दिवस ‘चालक दिवस’ म्हणून घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर, पिंपरी-चिंचवड शहरात हा दिवस प्रथमच एका भव्य आणि आगळ्यावेगळ्या स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. रिक्षा चालकांच्या अथक परिश्रमाला आणि त्यांच्या प्रामाणिक सेवेला सलाम करण्यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत व रिक्षा ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात, प्रवासी सेवेत सचोटी दाखवणाऱ्या कर्तव्यदक्ष रिक्षा चालकांचा प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत (RTO) विशेष सन्मान केला जाणार असून, महाराष्ट्रातील पहिल्या ‘पेट्रोल-टू-इलेक्ट्रिक’ रूपांतरित रिक्षाचेही लोकार्पण केले जाईल. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन (RTO) कार्यालयाचे  संदेश चव्हाण, पिंपरी-चिंचवड…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता पुढच्या वर्षी होणार आहेत. ३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणूक प्रक्रिया पार पाडावी असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. निवडणुकीसाठी मुदतवाढ मिळावी यासाठी राज्य निवडणूक आयोग आणि सरकारने सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी करताना दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून ३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकात पुढच्या वर्षी होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला फटकारले. आमच्याकडे पुरेसे ईव्हीएम नाही, गरजेनुसार मनुष्यबळ नाही आणि सणासुदीचे दिवस आहेत…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महापालिकेचा शिक्षण विभाग व ‘दि अप्रेंटिस प्रोजेक्ट’ (TAP) यांच्या संयुक्त विद्यमाने भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे आफ्टर-स्कूल मॉडेलचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, कॅपजेमिनी इंडियाचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट प्रसाद शेटये, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्रतिनिधी राजश्री तिटकारे, संस्थेचे सहसंस्थापक प्रशांत कुमार, अनामिका मुखर्जी, दिनेश साळवे, जुही शहा यांच्यासह १४१ शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. ‘दि अप्रेंटिस प्रोजेक्ट’ या उपक्रमांतर्गत महानगरपालिकेच्या १४१ शाळांमध्ये २०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी आफ्टर-स्कूल मॉडेलची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, चिंतनशीलता, सहकार्य आणि संवाद कौशल्ये विकसित करणे असून…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर राज्याच्या कृषी, औद्योगिक विकासावर भर देण्यात आला. तो काळ १९६० चा होता. त्यावेळी यशवंतराव चव्हाण, आचार्य अत्रे, केशवराव जेधे यांच्या दूरदृष्टी नेतृत्वासोबत शंकरराव बाजीराव पाटील ऊर्फ भाऊ यांनी जबाबदारीने कार्य केले. भाऊंनी रोजगार हमी योजनेतील कामगारांना वेतन आणि धान्य देण्याचा निर्णय, कामगारांना किमान वेतन मिळाले पाहिजे, शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेल्या धान्याला योग्य दाम मिळावे यासाठी राज्याला नव्हे तर संपूर्ण देशाला दिशा देणारे कायदे विधीमंडळात संमत करून घेतले. भाऊंच्या कार्याची चुणूक महाराष्ट्राला पहायला मिळाली. भाऊंनी सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. याचे अनुकरण आजच्या काळात केले पाहिजे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत ज्येष्ठ पत्रकार,…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय भूतपूर्व सैनिक संघ – पुणे जिल्हा यांच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभेत वीर गौरव सेनानी सन्मान सोहळ्याचे  गुरुवार, दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. ग. दि. माडगूळकर सभागृह, पेठ क्रमांक २६ निगडी प्राधिकरण येथे आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात सेवानिवृत्त ब्रिगेडियर इंदरमोहन सिंह, गोपाल वानखेडे, विधानसभा उपसभापती अण्णा बनसोडे, विधानपरिषद तालिका सभापती अमित गोरखे, भा. ज. पा. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी उपमहापौर राजू मिसाळ आणि शैलजा मोरे यांची प्रमुख उपस्थिती राहील. भारतीय भूतपूर्व सैनिक संघ – पुणे जिल्हा अध्यक्ष यशवंत महाडिक, मानद सचिव दत्तात्रय कुलकर्णी, मानद…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेत संघटनात्मक फेरबदल करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर प्रमुखपदी राजेश वाबळे यांची वर्णी लागली आहे. पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघाच्या समन्वयकपदी बाळासाहेब वाल्हेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, जिल्हाप्रमुखपदी राजेश खांडभोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा संघटिकापदी शिला भोंडवे यांची नियुक्ती केली आहे. उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार या नियुक्त्या केल्या आहेत. याबाबतची माहिती शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी दिली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, महापालिकेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. गण, गट, प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू आहे. पुणे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महापालिका डेंग्यू व मलेरियासारख्या संसर्गजन्य आजारांना आळा घालण्यासाठी सातत्याने कार्यरत असून, नागरिकांच्या आरोग्यरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत घराघरांत तपासणी, औषध फवारणी, जनजागृती उपक्रम तसेच कठोर दंडात्मक कारवाईला गती देण्यात आली आहे. याच अनुषंगाने १ जून २०२५ पासून आतापर्यंत सुमारे ४ हजार १३७ ठिकाणी नोटिसा बजावल्या असून, १ हजार १४२ जणांवर थेट दंडात्मक कारवाई करून ४० लाख ५८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त सचिन पवार यांच्या अधिपत्याखाली महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून औषध फवारणी, घराघरांत…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १४ मधील दत्तवाडी, विठ्ठलवाडी, विवेक नगर, तुळजा वस्ती, एकता नगर, रुपेश कॉलनी, टेल्को, कपूर कॉलनी, उंबरवाडी, श्रीकृष्ण क्रांती नगर, बौद्ध वस्ती, सुभाष पांढरकर नगर, भंगारवाडी, खडीमशीन परिसर, काळभोरनगर, रामनगर, मोहननगर, फुलेनगर, गवळीवाडा, चिंचवड स्टेशन, दावा बाजार, साईबाबा नगर या परिसरात रोज वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.या वाढत्या समस्येवर त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी युवासेना उपशहर प्रमुख निखिल उमाकांत दळवी यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात महावितरणचे कार्यकारी अभियंता, भोसरी पुणे यांना एक निवेदन सादर केले आहे. दिलेल्या निवेदनात  म्हटले आहे की, वारंवार वीज खंडित होण्यामुळे विद्यार्थ्यांच्या…

Read More

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही उत्तुंग कामगिरी करणाऱ्या चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनी तेजल यादव हिने नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद स्तरावरील शालेय बुद्धिबळ स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. या स्पर्धेत अनेक शाळांमधील गुणवंत खेळाडूंमध्ये कठीण स्पर्धा असताना तेजलने आपली बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि चिकाटीच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी केली. तिच्या या यशाबद्दल शाळेचे संचालक  संदीप काटे यांनी आनंद व्यक्त करताना, “आमच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडाक्षेत्रातही सातत्याने चांगली कामगिरी करत शाळेचा लौकिक वाढवला आहे. तेजलने केलेली कामगिरी ही इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल,” असे मत व्यक्त केले. शाळेच्या प्राचार्या  सुविधा महाले यांनी तेजलचे अभिनंदन करत, “विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत क्रीडा…

Read More

पिंपळे  सौदागर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उन्नती सखी मंच यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “बिन लग्नाची गोष्ट” या मराठी चित्रपटाच्या विशेष प्रीमियर शोला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हा शो सिटी प्राईड रॉयल सिनेमा, जगताप डेअरी, रहाटणी येथे पार पडला. या शोमध्ये सखी मंच सदस्यांना विशेष सवलतीच्या दरात चित्रपट पाहण्याची संधी मिळाली. चित्रपटानंतर प्रेक्षकांना चित्रपटातील कलाकारांसोबत तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील नामांकित अभिनेत्री सौ. निवेदिता सराफ यांच्यासोबत प्रत्यक्ष संवाद साधण्याचा आणि स्मरणीय छायाचित्रे घेण्याचा अनोखा अनुभव घेता आला. शोपूर्वी अभिनेत्री  निवेदिता सराफ, दिग्दर्शक व कलाकार वृंद यांनी उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदा संजय भिसे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी भारतीय…

Read More