Author: maharashtrabreakingnews.com

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशाचे जनप्रिय व यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक सुरेश भोईर यांच्या सौजन्याने आणि योगदान प्रतिष्ठान आणि डॉ.डी.वाय.पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्र १८ मध्ये एक दिवसीय मोफत आरोग्य चिकित्सा व होमिओपॅथिक वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पार्टी *पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष श्री शत्रुघ्न (बापु) काटे* यांच्या हस्ते संपन्न झाले. शिबिरामध्ये नागरिकांच्या विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी,आरोग्य सल्ला, तसेच औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. महिलांसाठी,ज्येष्ठ नागरिकांसाठी व युवकांसाठी वेगवेगळ्या आरोग्य तपासणी कॅम्पचे आयोजन विशेष ठरले.या शिबिराचा साधारण 132 नागरिकांनी लाभ…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्चाच्या वतीने रविवारी ‘नमो युवा रन’ मॅरेथॉन आयोजन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘नमो युवा रन’ मॅरेथॉन आयोजन करण्यात आले आहे. ही मॅरेथॉन रविवार, दि. २१ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता पिंपळे सौदागर येथील लिनीयर गार्डन, कोकणे चौक ते ८ टु ८० पार्क येथे केले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व पिंपरी चिंचवड भाजपा शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या अध्यक्षतेखाली आणि पिंपरी चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश यांच्या प्रमुख…

Read More

डॉ बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य चालक सोहळा संपन्न पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र शासनाने १७ सप्टेंबर हा दिवस ‘चालक दिवस’ म्हणून घोषित केल्यानंतर, पिंपरी-चिंचवड शहरात हा दिवस प्रथमच अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. शहरातील रिक्षा चालकांच्या अथक परिश्रमाला, त्यांच्या प्रामाणिक सेवेला आणि समाजाप्रती असलेल्या कर्तव्यनिष्ठेला सलाम करण्यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि रिक्षा ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथील अल्पाइन हॉटेलमध्ये एका विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक रिक्षा चालकांचा, विशेषतः महिला रिक्षा चालकांचा, प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत (RTO) अधिकृत प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. प्रामाणिकतेचा सन्मान:…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक 14 मधील शितळादेवी मंदिराच्या मागे असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वसंतदादा पाटील मराठी व फकीरभाई पानसरे उर्दू शाळा मैदानावर नवरात्र उत्सव साजरा करण्यास यंदा परवानगी नाकारण्यात आल्याने विठ्ठल प्रतिष्ठानने नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखिल उमाकांत दळवी यांनी आयुक्तांना निवेदन सादर केले आहे. “दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सवाचा कार्यक्रम नियोजित असून, सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मात्र यंदा अचानक अ. क्षेत्रीय कार्यालय, निगडी येथून परवानगी नाकारण्यात आली आहे,” असे त्यांनी नमूद केले आहे. दळवी यांनी सांगितले की, कार्यक्रम सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत घेतला जातो. मंडप मैदानाच्या एका बाजूला उभारला…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डिलक्स चौकातील हॉटेल एसएसटी श्री सिद्धविनायक वडापाव सेंटर मध्ये चोरी झाली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी मंगळवारी (दि. 26) भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 331(4), 305, 3(5) कलमान्वये अकरांवर गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार 25 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे घडला. 1) संजय मनोहर पवार 2) दत्ता मनोहर पवार 3) शुभम संजय पवार 4) मुन्ना संजय पवार (5) संतोष चव्हाण 6) हेंमत दत्ता पवार सर्व राहणार काळेवाडी 7) उमेश मधुरे रा. रुपी नगर निगडी 8) अमर सोमेश्वर लाड रा. मोशीगाव 9) मयुर (पूर्ण नाव माहीत नाही) रा. जाधववाडी, चिखली 10) प्रदीप यादव रा. जाधववाडी, चिखली…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदूषण नियंत्रण आणि हरित ऊर्जा धोरणाच्या दिशेने एक क्रांतिकारी पाऊल उचलत महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि इलेक्ट्रोमोशन कंपनीने संयुक्तरित्या महाराष्ट्रातील पहिली पेट्रोल रिक्षा इलेक्ट्रिक रूपांतरित रिक्षा तयार करून घेतली. या रिक्षेचे औपचारिक लोकार्पण पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमात आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते हिरवा ध्वज दिखवून करण्यात आले. या उपक्रमामुळे पिंपरी-चिंचवड शहर प्रदूषणमुक्त करण्याच्या दिशेने रिक्षाचालक वर्गाचा मोलाचा योगदान ठरणार असून, राज्यातील इतर भागांसाठीही हा आदर्श ठरेल. या रिक्षेचे रूपांतर इलेक्ट्रोमोशन कंपनीच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड शहरात घडवण्यात आले असून, ती पूर्णपणे इलेक्ट्रिक ऊर्जेवर कार्यरत आहे. सर्व…

Read More

आमदार अमित गोरखे यांचा ” “एक पेड माँ के नाम” उपक्रम पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात आमदार अमित गोरखे यांच्या माध्यमातून अभिनव उपक्रम राबवण्यात आला. ‘एक पेड माँ के नाम’ या संकल्पनेवर आधारित आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘संघ शताब्दी पंचसूत्री’ मधील ‘पर्यावरण’ या प्रमुख विषयाचा समन्वय साधत, शाहूनगर येथील शिव शाहू शंभो उद्यानात ५० फुटी अश्वत्थ वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. हा ऐतिहासिक सोहळा माजी नगरसेविका श्रीमती अनुराधा गोरखे यांच्या हस्ते पार पडला, जो मातृशक्तीच्या सन्मानाचा अनोखा संदेश ठरला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश मातृशक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, तिच्या निस्वार्थ सेवेला अभिवादन करणे आणि…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पिंपरी- चिंचवड भारतीय जनता पार्टीने ‘सेवा पंधरवडा’ अभियानांतर्गत भव्य रक्तदान ‘अमृत महोत्सव’ शिबिराचे आयोजन केले होते. चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित केलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या या शिबिराचे उद्घाटन शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापु) काटे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य हेमंतराव हरहरे यांच्या हस्ते झाले. या वेळी २७५ हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या शिबिराला अनेक मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये आमदार शंकर जगताप,आमदार अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे,…

Read More

पिंपरी  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – 17 सप्टेंबर, हा दिवस मराठवाड्याच्या हैदराबाद संस्थानातून मुक्तीचा स्मरणदिन आहे. 1948 मध्ये भारतीय सैन्याने ऑपरेशन पोलोद्वारे निजामाच्या रझाकारी अत्याचारातून मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. या लढ्यात हजारो मराठवाड्यातील वीरांनी वीरमरण पत्करले. हा दिवस मराठवाड्याच्या स्वाभिमानाचे आणि बलिदानाचे प्रतीक आहे, जो दरवर्षी उत्साहाने साजरा केला जातो. यानिमित्ताने रहाटणीत मराठवाडा मुक्तीसंग्रामातील शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी रहाटणी फाटा याठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाला स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, रहाटणी-पिंपळे सौदागर भाजपा मंडल अध्यक्ष सोमनाथ तापकीर, संजय गांधी निराधार योजना चिंचवड विधानसभा अध्यक्ष नरेंद्र माने, सामाजिक कार्यकर्ते नरेश आप्पा खुळे, महाराष्ट्र शासन…

Read More

काळेवाडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशातील बेरोजगारी, महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि अन्य अपूर्ण वचनांविरुद्ध जनतेचा आवाज ऐकवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आज काळेवाडी येथे एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. मोदींनी दिलेले २ कोटी रोजगार दरवर्षी देण्याचे वचन, पेट्रोल-डिझेल दरवाढ थांबवण्याचे वचन यासारखी अनेक आश्वसे पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ, या कार्यक्रमात लॉलिपॉप चॉकलेट्सचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे राज्य सचिव चंद्रशेखर जाधव यांनी केले. या वेळी पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतिक जगताप, आदी उपस्थित होते. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तसेच सरकारच्या निषेधार्थ या लॉलिपॉप चॉकलेट्सचे वितरण केले. या कार्यक्रमाद्वारे युवक काँग्रेसने देशातील सध्याची परिस्थिती सरकारच्या जवाबदारीवर प्रश्नचिन्ह ठेवले…

Read More