Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डॉ. आंबेडकरांनी भारतात आणि परदेशात आपले शिक्षण पूर्ण करून शैक्षणिक क्षेत्रात प्रावीण्य मिळवले. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्या मिळवल्या, तसेच ६४ हून अधिक विषय आणि ११ भाषांवर प्रभुत्व प्राप्त केले—जे त्यांच्या काळातील एक अतुलनीय विद्वत्तापूर्ण यश होते. डॉ. आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य शोषित वर्गाच्या उन्नतीसाठी समर्पित केले. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून, त्यांनी भारतीय राज्यघटनेला आकार देण्यात, मूलभूत हक्कांची हमी देण्यात आणि लोकशाहीचा पाया घालण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून त्यांचे योगदान कायद्यापुरते मर्यादित नव्हते—त्यांनी लैंगिक समानता, कामगार सुधारणा आणि सर्वांसाठी शिक्षणाचा पुरस्कार केला. १९९० मध्ये, राष्ट्रासाठी केलेल्या त्यांच्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर पिंपळे सौदागरमधील ‘साई वैभव’ (सेव्हन स्टार लेन) येथील अवघ्या एका बालकाने यशाचे उत्तुंग शिखर सर केले आहे. कु.रुग्वेद शशिकांत शेवाळे याने अत्यंत कठीण समजली जाणारी ‘सैनिक शाळा प्रवेश परीक्षा २०२६’ पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन अमरावतीनगर (तामिळनाडू) येथील सैनिक शाळेत आपले स्थान निश्चित केले आहे. रुग्वेदच्या या गौरवशाली यशाबद्दल भाजप शहराध्यक्ष व नगरसेवक श्री शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या हस्ते त्याला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. अथक परिश्रमातून ‘तिहेरी’ यशाची मोहोर देशभरातून जवळपास २ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यामधून रुग्वेदने केवळ लेखी परीक्षाच नव्हे, तर अत्यंत कठीण समजली जाणारी वैद्यकीय…

Read More

निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  “आजच्या विज्ञानयुगात गावे बदलत आहेत.काकड आरती आणि भूपाळीने गावगाड्याची सुरुवात व्हायची आणि दिवस भजन किर्तनाने संपायचा. गावात प्रत्येक माणूस हा वैशिष्ट्यपूर्ण स्वभावाचा होता. पण आत्मीयता आणि जिव्हाळा होता. संतांनी नेहमीच भोंदूपणावर कोरडे ओढले.आज भोंदू बाबांचे पेव फुटले आहे. जगण्याचा वेदनेतून लोक भोंदूगिरीला बळी पडत आहेत. गावपण जपताना माणसाने शहाणे होणे गरजेचे आहे. वेदनेचा आक्रोश जाणावा लागेल. गावगाड्यातील प्रत्येक अनुभवांवर लिहिणे ही कृतज्ञता आहे. माणसातील प्रतिभा जागवणारी ग्रामसंस्कृती जपणे ही काळाची गरज आहे.” असे प्रतिपादन माजी आमदार आणि  प्रथितयश रसिकराज उल्हासदादा पवार यांनी केले आहे. जेष्ठ ग्रामीण साहित्यिक दादाभाऊ गावडे यांनी या आपल्या  पूर या मूळ…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता  सप्ताह कार्यक्रम चिंचवड येथील उद्योगनगर येथे आयोजन करण्यात आले होते  सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गुणवंत कामगार अण्णा जोगदंड  तर वक्ते प्राध्यापक केरनाथ ढवळे होते.  यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम  संपन्न झाला .प्रमुख पाहुणे व वक्ते यांच्या शुभहस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे वक्ते प्राध्यापक केरनाथ ढवळे यांनी संविधान जागर – मूलभूत हक्क व मूलभूत कर्तव्य या विषयावर व्याख्यान दिले ते म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पहिले कायदामंत्री होते समाजसुधारक, शास्त्रज्ञ होते . प्रमुख पाहुणेआण्णा जोगदंड म्हणाले की जगातील 154 देशांमध्ये डॉ. बाबासाहेब…

Read More

‘विचार प्रबोधन पर्व २०२६’ अंतर्गत परिसंवादात परदेशातील शिक्षण व रोजगार संधींबाबत मार्गदर्शन पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय संबंधांवरील विचार आजही आधुनिक भारताच्या परराष्ट्र धोरणाला दिशा देणारे ठरत असून, जागतिकीकरणाच्या युगात शिक्षण व रोजगाराच्या नव्या संधी शोधताना त्यांच्या दूरदृष्टीची प्रासंगिकता अधिक ठळकपणे जाणवते. सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक समतेचा आग्रह धरणाऱ्या त्यांच्या विचारसरणीमुळे भारतीय युवकांनी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होण्यासाठी व्यापक दृष्टीकोन स्वीकारणे आवश्यक आहे, असे मत ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय संबंधांवरील विचार आणि सद्यस्थिती तसेच परदेशातील शिक्षण व रोजगार संधी’ या विषयावर आयोजित परिसंवादात तज्ज्ञांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेत सामान्य करावर विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. कर आकारणी आणि कर संकलन विभागाच्या या उपक्रमामुळे शहरातील नागरिकांना ‘पर्यावरणपूरक’ जीवनशैली अंगीकारण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. कचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया आणि झिरो वेस्ट संकल्पना प्रभावीपणे राबवणाऱ्या इमारतींना करात थेट सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संगोपन करताना नागरिकांना आर्थिक दिलासाही मिळणार आहे. अशा मिळणार सवलती : * ऑनसाइट कंपोस्टिंग यंत्रणा कार्यान्वित असल्यास – ५% सवलत * ऑनसाइट कंपोस्टिंग  एस.टी.पी प्लँट कार्यान्वित असल्यास ८% सवलत * फक्त एस.टी.पी प्लँट कार्यान्वित असल्यास ३% सवलत * झिरो वेस्ट संकल्पना राबविल्यास  ८% सवलत * झिरो वेस्ट तसेच एस.टी.पी…

Read More

वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी १७५ गडकिल्ले सर; ​ पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणाऱ्या गडकोटांच्या मोहिमेत रहाटणीतील एका चिमुकलीने सुवर्ण अक्षरांनी आपली नोंद केली आहे. रहाटणी, ज्योतिबा कॉलनी येथील रहिवासी असलेल्या कु. शर्विका म्हात्रे हिने वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी तब्बल १७५ गडकिल्ले सर करण्याचा पराक्रम केला आहे. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेत भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक श्री. शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या हस्ते विठ्ठलाची मूर्ती देऊन तिचा विशेष सन्मान करण्यात आला. ​दुर्गभ्रमंतीचा नवा आदर्श… ​स्वराज्याच्या गडकोटांचे जतन आणि संवर्धन व्हावे, तसेच नवीन पिढीला या इतिहासाची ओळख व्हावी यासाठी अनेक जण दुर्गभ्रमंती करतात.…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ (एमआयटी एडीटी) आणि जागतिक स्तरावरील इन्फ्रास्ट्रक्चर अभियांत्रिकी सॉफ्टवेअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी बेंटली सिस्टिम्स यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. याचवेळी ‘इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन सेंटर ऑफ एक्सलन्स’ या उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. डिजिटल पायाभूत सुविधा शिक्षणाला चालना देणे आणि उद्योग-संलग्न शिक्षण अधिक सक्षम करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड सायन्सेस अंतर्गत सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमास बेंटली सिस्टिम्सचे दक्षिण आशिया विभागीय कार्यकारी कमलकन्नन तिरुवडी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शैक्षणिक संचालक हर्ष नागपाल, वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक मोनिका जेधे आणि परमर्थ सैनी हे मान्यवर…

Read More

गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून विकासाचा संदेश; राष्ट्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत आमदार गोरखे यांचे प्रभावी संबोधन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गोव्यात आयोजित कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन (CPA) वेस्ट झोन–VII च्या प्रतिष्ठित परिषदेत महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य श्री. अमित गोरखे यांनी आपल्या दूरदृष्टीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण भाषणातून राष्ट्रीय नेतृत्वाचे लक्ष वेधून घेतले. ८ ते १० एप्रिल दरम्यान पणजी येथे पार पडलेल्या या तीन दिवसीय परिषदेत त्यांनी ‘विकसित भारत 2047: युवा लोकप्रतिनिधींची  भूमिका’ आणि ‘शाश्वत पर्यटनाचा विकासात्मक प्राधान्यक्रम’ या दोन महत्त्वपूर्ण सत्रांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. विशेष म्हणजे महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या तीन राज्यांतील मोजक्या लोकप्रतिनिधींची या परिषदेसाठी निवड करण्यात आली होती. यामध्ये आमदार अमित…

Read More

अनधिकृत बांधकामांवर कडक कारवाई करण्याचे दिले निर्देश स्वच्छ सर्वेक्षण २०२६ च्या अनुषंगाने आरोग्य विभागाची सविस्तर आढावा बैठक पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व नालेसफाईची कामे वेळेत, नियोजनबद्ध आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले तसेच सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेचा आरोग्य विभागाने सातत्याने आढावा घ्यावा. सार्वजनिक स्वच्छतेच्या कामामध्ये कोणताही हलगर्जीपणा करू नये. नाल्यांवरील तसेच शहरातील अनधिकृत बांधकामे, अडथळे निर्माण करणारी आस्थापने यांच्यावर कडक कारवाई करावी,असे देखील त्यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये दिवंगत महापौर मधूकरराव पवळे सभागृहात नुकतीच आरोग्य विभागाची आढावा बैठक आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली…

Read More