- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मोरेवस्ती – म्हेत्रेवस्ती परिसरातील नागरिक सध्या भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासामुळे प्रचंड त्रस्त झाले आहेत. परिसरात दिवसेंदिवस कुत्र्यांची संख्या वाढत चालली असून त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शाळेत जाणाऱ्या लहान मुलांवर हल्ल्याचा धोका, रात्री उशिरा कामावरून परतणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, तसेच परिसरातील स्वच्छता आणि आरोग्यावर याचा प्रतिकूल परिणाम होत आहे.या गंभीर पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे शहर अध्यक्ष विजय जरे यांनी नागरिकांच्या वतीने पशुवैद्यकीय अधिकारी अरुण दगडे यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन सादर केले. या निवेदनात खालील महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या: भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवाव्यात.कुत्रा पकडण्यासाठी येणाऱ्या गाड्यांमध्ये कार्यक्षमतेचा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उन्नती सोशल फाउंडेशनच्या नवरात्रोत्सव २०२५ च्या पाचव्या दिवशी, हिरवा रंग साजरा करत वृक्षारोपण उपक्रमलिनिअर गार्डन, गोविंद-यशोदा चौक, पिंपळे सौदागर येथे उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमाद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविणे आणि वनराई वाढविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. उन्नती सोशल फाउंडेशन नवरात्रीच्या वेगवेगळ्या रंगानुसार विविध सामाजिक उपक्रम राबवत असते. या पार्श्वभूमीवर हिरव्या रंगासाठी वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले, ज्याद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचला. डॉ. कुंदा संजय भिसे, अध्यक्ष, उन्नती सोशल फाउंडेशन यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले , “वृक्षारोपण हा फक्त पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम नाही, तर समाजातील प्रत्येक नागरिकाला निसर्गासोबत जोडणारा संदेश आहे. आजच्या पावन…
संघशताब्दीनिमित्याने विशेष महत्व हजारो संघ स्वयंसेवकांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे रविवार दि.२८ सप्टेंबर रोजी शहरातील विविध भागातील तब्बल २९ स्थानी तर दि.२ व ५ ऑक्टोबरला १४ ठिकाणी, २७ व ३० सप्टेंबर रोजी २ स्थानी असे एकूण ४५ स्थानी विजयादशमी उत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रहित, संघटन आणि सेवाकार्यासाठी सदैव कटिबद्ध असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी विजयादशमी उत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा विजयादशमीच्या पावनपर्वावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत त्यामुळे या उत्सवांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. यावर्षी पिंपरी चिंचवड शहरात देखील तब्बल ४५ विविध…
पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरातील आकुर्डी, काळभोरनगर, मोहननगर, दत्तवाडी परिसरातील वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. या भागातील वीज पुरवठा तत्काळ सुरळित करावा. नवरात्र उत्सव सुरु आहे. दसरा, दिवाळी सण जवळ आले आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. महावितरणच्या सुरु असलेल्या, प्रलंबित कामांना गती देण्याचे आदेश शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. महावितरण विद्युत वितरण कंपनीच्या पिंपरी-चिंचवड विभागातील वीज प्रश्नांचा खासदार बारणे यांनी बुधवारी आढावा घेतला. यावेळी पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील काकडे, गणेश खिंड परिमंडळाचे अधीक्षक अभियंता शहाजी गायकवाड, कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे, अतुल देवकर, शिवसेनेचे महानगरप्रमुख राजेश…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या महत्त्वाकांक्षी घोषणेला प्रभावीपणे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी (भाजप) पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने बुधवारी, २४ सप्टेंबर रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मोरवाडी येथील भाजपच्या शहर कार्यालयात ही कार्यशाळा पार पडली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निर्देशानुसार आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला अभियानाचे प्रदेश सहसंयोजक, आमदार विक्रम पाचपुते यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आगामी ९० दिवस चालणाऱ्या ‘आत्मनिर्भर भारत’अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करणे हा होता. यामध्ये पक्षाचे धोरण, अभियानाची उद्दिष्ट्ये आणि स्थानिक पातळीवर राबवायचे उपक्रम यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेला शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू)…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) कार्यालयात मुख्यमंत्री यांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम (RTS) या विषयावर विशेष प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या निर्देशानुसार लोकसेवा हक्क आयोगाच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यशाळेत कामगार उपायुक्त कादंबरी भोसले यांनी अधिकारी, कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. शासनाच्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान आणि विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंमलात आला आहे. शासनाने १५० दिवसाच्या महत्वकांक्षी उपक्रमांतर्गत नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन शासकीय सेवा सुविधा देण्याचे निर्देश दिले आहे. त्या अनुषंगाने पीएमआरडीएमध्ये आरटीएस (RTS) अधिनियमांतर्गत विविध सेवांची कार्यक्षम अंमलबजावणी करण्यात येत आहे. या प्रशिक्षणामुळे…
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विधानभवनात आज झालेल्या रोजगार हमी योजना समितीच्या बैठकीस आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली. समितीच्या अकोला जिल्ह्यातील दौऱ्यात (११ ते १३ ऑक्टोबर २०२१) दिलेल्या आश्वासनांवरील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीदरम्यान सिंचन विहिरी, सामाजिक वनीकरण, रेशीम विभाग, प्रधानमंत्री आवास योजना, रस्ते आणि शेतरस्ते यांसह विविध योजनांच्या प्रलंबित कामांचा सखोल तपास करण्यात आला. सन २००७ मध्ये मंजूर झालेल्या सिंचन विहिरींच्या अनेक कामा अद्याप अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले. सामाजिक वनीकरण विभागात २०१९ पासून रोपवाटीका उभारणीचाच अभाव असल्याचे स्पष्ट झाले. रेशीम विभागातील २०१८ ते २०२२ दरम्यान मंजूर झालेली कामे तीन वर्षांनंतरही अपूर्ण आहेत.…
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील बहुजनांच्या शिक्षणक्रांतीचे आधारवड आहेत.२२ सप्टेंबर १८८७ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावात जन्मलेल्या या महामानवाने अज्ञानी, वंचित, शोषित आणि उपेक्षित बहुजन समाजाला जीवनसमृद्धीच्या ज्ञानप्रकाशाकडे नेण्यासाठी शिक्षण हेच प्रभावी साधन असल्याचे ओळखून महात्मा जोतीराव फुले यांच्या सत्यशोधकी व शैक्षणिक विचारांना अनुसरून रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली .त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी वेचले. श्रमाला प्रतिष्ठा देत त्यांनी तळागाळातील मुलांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणले. भाऊराव पाटील आणि त्यांच्या पत्नी रयतमाऊली सौ. लक्ष्मीबाई यांनी या विद्यार्थ्यांना आपल्या स्वतःच्या मुलांप्रमाणे जपले, वाढवले आणि शिकवले.त्यांना सुजाण नागरिक बनविले.महात्मा जोतीराव फुले,राजर्षी छत्रपती शाहू महाराज ,डॉ,बाबासाहेब…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिका स्थापनेस २०३२ मध्ये ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने महापालिकेने ‘व्हिजन@५० शहर धोरण’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत शिक्षण विभागासाठी पुढील पाच वर्षांचा धोरणात्मक आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने विचारमंथन करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी देखील सहभागी होऊन आपले मत मांडले. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या संकल्पनेतून ‘व्हिजन@५० शहर धोरण’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत विविध क्षेत्रातील व्यक्तींशी चर्चा करण्यात येत आहे. शहराचा विकास करताना प्राधान्यक्रम कोणत्या गोष्टींना द्यावा? कोणत्या क्षेत्रांना महत्त्व द्यावे? येथील शिक्षण व्यवस्था कशी असावी?…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये देशात सातवा व राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. महापालिकेकडून राबवण्यात आलेली स्वच्छता मोहीम, कचरा विलगीकरण, स्वच्छतेबाबत जनजागृती, आर.आर.आर (रिड्यूस–रियुज–रिसायकल) प्रकल्प तसेच शून्य कचरा प्रकल्प अशा विविध प्रकल्पांमुळे शहराच्या सार्वजनिक स्वच्छतेत उल्लेखनीय बदल घडून आला आहे. या सर्व उपक्रमांच्या यशामागे नागरिकांचा सहभाग जितका महत्त्वाचा आहे, तितकाच सहभाग स्वच्छता कर्मचाऱ्यांचा आहे. यामध्ये महिला सफाई कर्मचाऱ्यांची संख्या साडेचारशेपेक्षा जास्त असून पिंपरी चिंचवड शहराची स्वच्छतेची धुरा सांभाळण्यामध्ये या कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने “स्वच्छ शहर, सुंदर शहर” हे ध्येय गाठण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे…
