- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उन्नती सोशल फाउंडेशनने मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी भरीव मदत प्रदान करण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगरूळ, शेळकाधानोरा, शिरपुरा (तालुका: कळंब, जिल्हा: धाराशिव) तसेच पालसिंघण (ता. बीड, जि. बीड) या गावांतील आपत्तीग्रस्तांपर्यंत प्रत्यक्ष मदत पोहोचवण्यात आली. उन्नती सोशल फाउंडेशनच्या कटीबद्ध प्रयत्नांमुळे प्रभावितांना आवश्यक वस्तू तसेच आर्थिक आधार मिळाला. या मोहिमेत अन्न, वस्त्र, जीवनावश्यक साहित्य, शालेय साहित्य (बॅग, पुस्तके, वह्या, शाळा बूट) यांचा समावेश होता. तसेच जनावरांसाठी पशुखाद्य आणि इतर आवश्यक वस्तू वितरीत करण्यात आल्या. एकूण धान्याचे २५० किट आणि वस्तू स्वरूपात ₹5 लाखांची मदत उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ.सौ. कुंदाताई संजय भिसे यांच्या मार्फत करण्यात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डब्ल्यू.एम.ओ. संस्थेकडून माढा तालुक्यातील सुलतानपूर, निमगाव आणि वडशिंगे या गावांतील पूरग्रस्त कुटुंबांना मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली. या मदत उपक्रमात २५० हून अधिक किराणा किट, २०० हून अधिक साड्या, लहान मुलांसाठी शालेय साहित्य व कपडे, पुरुषांसाठी शर्ट-पॅन्ट, तसेच एक वर्षाखालील बालकांसाठी पाळणे व गाद्या वाटप करण्यात आले.यावेळी सलोनी नरवडे, अनिकेत जरे, रवी जाधव, सुभाष पालेकर, चेतन गोळे, विजय साळेकर, स्थानिक ग्रामस्थ, माजी सरपंच अनिल शिंदे, गोरक्ष शिंदे, प्रशांत जाधव उपस्थित होते. सलोनी नरवडे यांनी सांगितले, पूरग्रस्त नागरिकांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी ही मदत थोडासा आधार ठरावी, ही आमची मनापासून इच्छा आहे. समाजातील प्रत्येकाने अशा वेळी…
मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभेतील वडेश्वर आणि माऊ ग्रामपंचायत हद्दीतील अंदर मावळ भागातील नागरिकांसाठी जिल्हा परिषद पुणे आणि मावळ पंचायत समिती मार्फत आरोग्य उपकेंद्र, उपरुग्णालय, पशुवैद्यकीय दवाखाना आणि तलाठी कार्यालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नांतून टाटा पॉवर कंपनीने २० गुंठे जागा मोफत दिली आहे. त्यामुळे सुसज्ज पशुवैद्यकीय दवाखान्यासह विविध सुविधा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कागदपत्रांच्या हस्तांतरणाचा कार्यक्रम लोणावळा टाटा पॉवर कार्यालयात खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी टाटा पॉवर कंपनीचे अधिकारी मनोहर म्हात्रे आणि राजेंद्र गावडे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर मावळ गट विकास अधिकारी कुलदीप प्रधान, सरपंच…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ”आम्ही क्रांतिवीर चापेकर बंधूच्या शौर्याच्या, प्रखर देशभक्ती व त्यागाच्या गोष्टी इतिहासात वाचत हाेताे, त्याचे प्रत्यक्ष दर्शन आज चलचित्राद्वारे आम्हाला घडले आहे. हुतात्मा चापेकर वाड्यामध्ये परंपरा, संस्कृतीच्या अनेक सुंदर छटा पहावयास मिळाल्या,चापेकर बंधूंनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान, त्याग याची छाेटीशी झलक बघता आली. देशांतील तरूणांनी चिंचवडमध्ये येऊन चापेकरांच्या स्मृतींना अभिवादन करावे व त्यांच्याकडून देशभक्तीची प्रेरणा घ्यावी आणि भारत मातेच्या उत्कर्षासाठी कायम प्रयत्न करत रहावेत”, असे प्रतिपादन केरळ राज्याचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी केले. चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयाला केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी आज सदिच्छा भेट देऊन चापेकर स्मारकाची पाहणी केली. त्याचबरोबर हुबेहूब दिसणारी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बांद्रा येथील एसआरए न्यायालयात संजय नगर पुनर्वसन प्रकल्पाविरोधात दाखल याचिकेची सुनावणी पार पडली. या सुनावणीत आपल्या दाव्याच्या बाजूने काही महत्त्वपूर्ण आदेश शिखर तक्रार निवारण समिती, एसआरए कडून देण्यात आले आहेत. पुढील सुनावणीदरम्यान महत्त्वपूर्ण आदेश पारित करण्यासाठी एसआरए पुणे कार्यालयाला आवश्यक दस्तऐवज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कृती समितीने नागरिकांसाठी सविस्तर माहिती देण्यासाठी लवकरच संजय नगरमध्ये सभेचे आयोजन करावे, अशी विनंती करण्यात आली आहे. आजच्या सुनावणीसाठी कृती समितीतर्फे माननीय मधुकर म्हस्के, विष्णू सातपुते, लालचंद पवार आणि ॲड. संतोष शिंदे उपस्थित होते.
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) मावळ विधानसभा मतदारसंघातील धामणे, गोडूंबे, दारुंब्रे, साळुंब्रे, सांगवडे आणि मुळशीतील नेरेत प्रस्तावित केलेल्या नगररचना योजनेला येथील नागरिकांचा तीव्र विरोध आहे. ग्रामस्थ, शेतकऱ्यांना योजना मान्य नसून याबाबात ग्रामसभेत ठराव झाले आहेत. त्यामुळे ही प्रस्तावित नगररचना योजना तत्काळ रद्द करण्याची मागणी शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांची उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. खासदार बारणे यांनी उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. त्यांची भेट घेऊन प्रस्तावित नगररचना योजनेला असलेला नागरिकांचा विरोध शिंदे यांना सांगितला. याबाबतचे सविस्तर निवेदन दिले. खासदार बारणे म्हणाले, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने धामणे,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आजचा काळ आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा म्हणजे “एआय” चा आहे. हे केवळ तंत्रज्ञान नाही, तर मानवी विचार पद्धतीला पूरक असलेलं स्मार्ट साधन आहे. या तंत्रज्ञाना मुळे तुमचे विचार आणि संकल्पना अधिक व्यापक होतील व तुमचा दृष्टिकोन अधिक चांगला होण्यासाठी सामर्थ्य मिळेल. “एआय” हे नवोपक्रमाचं (Innovation – इनोव्हेशन) केंद्रबिंदू बनलं आहे. या हॅकेथॉनमध्ये तुम्ही एखाद्या समस्येवर उपाय शोधत असताना त्याला “एआय” ची साथ दिली. तर ते केवळ तांत्रिक नव्हे तर स्मार्ट उपाय उपलब्ध करून देईल. “एआय” शिकणं म्हणजे फक्त कोडिंग शिकणे नाही. तर डेटामधून अर्थ शोधून भविष्यातील दिशा निश्चित करणे आहे. “एआय” हे मानवाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून…
पिंपळे सौदागर,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उन्नती सोशल फाउंडेशन आयोजित भव्य दांडिया ग्रुप डान्स स्पर्धा मोठ्या उत्साहात व सांस्कृतिक जल्लोषात संपन्न झाली. स्व. बाळासाहेब कुंजीर क्रीडांगण, पिंपळे सौदागर येथे दिनांक ५ ते ७ ऑक्टोबर २०२५ दरम्यान सायंकाळी ६.०० ते १०.०० या वेळेत झालेल्या या तीन दिवसीय स्पर्धेमध्ये तब्बल ४० ग्रुप्सनी सहभाग नोंदविला. प्रत्येक ग्रुपने सादर केलेल्या पारंपरिक व आधुनिक नृत्यरचनांनी उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या स्पर्धेमध्ये प्रत्येक सहभागी ग्रुपला रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ मनोरंजनापुरती दांडिया संध्याकाळ न ठेवता, त्याला स्पर्धात्मक व सांस्कृतिक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न उन्नती सोशल फाउंडेशनने केला. या प्रसंगी उन्नती सोशल…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘जे आर डी आणि रतन टाटा हे आधुनिक काळातील संत आहेत!’ असे गौरवोद्गार रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी गुरुवार, दिनांक ०९ ऑक्टोबर २०२५ रोजी ऑटोक्लस्टर सभागृह, चिंचवड येथे काढले. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद, पुणे आयोजित भारतरत्न जे आर डी टाटा आणि उद्योगमहर्षी रतन टाटा पुरस्कार प्रदान सोहळ्यात चंद्रकांत दळवी बोलत होते. लातूरचे आमदार शिवाजीराव कव्हेकर अध्यक्षस्थानी होते; तसेच टाटा मोटर्स लिमिटेडचे निवृत्त वरिष्ठ महाव्यवस्थापक मनोहर पारळकर आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेचे अध्यक्ष सुदाम भोरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुरस्कार प्रदान सोहळ्यात ॲक्सिस इंजिनिअरिंग (तळवडे) चे संचालक महेश शिंदे…
पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’त ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांना मानपत्र प्रदान व युवा दिग्दर्शक सुजय डहाके यांचा सन्मान पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आळंदीतील संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहूतील जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी मराठी भाषेला संस्कार दिले. देहू आणि आळंदी ही फक्त तीर्थक्षेत्रे नाहीत, तर मराठी संस्कृतीची संस्कारक्षेत्रे आहेत. तुकाराम-ज्ञानेश्वरांच्या विचारांनी ही भूमी मराठीची खरी विद्यापीठे आहे. या विद्यापीठाच्या परिसरात असलेल्या पिंपरी चिंचवड या कामगार नगरीत मला पुरस्कार मिळतोय, हा माझ्या जीवनातील महत्त्वाचा क्षण असून, हा पुरस्कार मला आशिर्वादासारखा आहे. कामगार नगरीने केलेला सन्मान माझ्यासाठी अविस्मरणीय पर्वणी आहे, असे उद्गार ज्येष्ठ कवी-साहित्यिक रामदास फुटाणे…
