Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड येथील ज्येष्ठ समाजसेवी श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सच्या जैन भवन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष ,पिंपरी चिंचवड जैन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, भगवान महावीर एज्युकेशन सोसायटी, पार्श्वनाथ क्रीडा मंडळ, आनंद परिवार ट्रस्ट ,महर्षि आनंद सेवा प्रतिष्ठान, ओम जय आनंद डायलिसिस सेंटर, माजी विद्यार्थी संघ, शिवाजी विद्यालय धामणी,रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट पुणे शाखा , पश्चिम भारत सीए स्टुडंट विकासा, लक्ष्मी बॅंक अशा अनेक संस्थांचे संस्थापक,/ अध्यक्ष तसेच बंधुता प्रतिष्ठान,आनंद तीर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, , मै भारत हुं फोंडेशन, प्रीतम मेडिकल फाउंडेशन,जितो चिंचवड पिंपरी अशा अनेक संस्थांचे पदाधिकारी,म्हणुन त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली आहे.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विश्ववंदनीय महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील भीमसृष्टी स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत शहर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले. याप्रसंगी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, संत गाडगेबाबा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या महापुरुषांच्या जय जयकाराच्या घोषणा देण्यात आल्या. याबाबत माहिती देताना शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, “यंदाचे वर्ष हे ऐतिहासिक महापुरुष विशेष वर्ष आहे, शताब्दी, द्वि शताब्दी, त्री शताब्दी स्वरूपाचे आहे, यंदाचे वर्ष हे महाड चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष, महात्मा ज्योतिराव फुले…

Read More

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मत’ दिले, आता ‘पत’ मिळवण्यासाठी आपला लढा : डॉ. बाबा कांबळे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक नागरिकाला ‘एक व्यक्ती, एक मत’ हा अधिकार देऊन समानतेची क्रांती घडवून आणली. आज गरिबाच्या मतालाही पंतप्रधानांच्या मताइतकीच किंमत आहे. “मात्र, दिवसरात्र कष्ट करणाऱ्या रिक्षा चालक, टॅक्सी चालक आणि असंघटित कष्टकऱ्यांना समाजात अद्याप हक्काची ‘पत’ (सन्मान आणि आर्थिक स्थैर्य) मिळालेली नाही. हीच पत आणि कष्टाला सन्मान मिळवून देण्यासाठी आमचा लढा सुरू आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष गोरगरीब कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांनी केले. महाराष्ट्र रिक्षा पंचायत संलग्न…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –    भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ नागरिक संघामध्ये विशेष कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात संघाच्या सदस्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी संघाच्या सदस्या राधिका  बोर्लीकर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याबद्दल आपले विचार मांडले. त्यांनी बाबासाहेबांनी समाजातील वंचित घटकांसाठी केलेला संघर्ष, शिक्षणाचे महत्त्व आणि सामाजिक समतेसाठी दिलेले योगदान यावर सविस्तर भाष्य केले. तसेच त्यांनी महाड चवदार तळे सत्याग्रह या ऐतिहासिक आंदोलनाचा उल्लेख करत बाबासाहेबांच्या कार्याची प्रेरणा आजही समाजाला मार्गदर्शक ठरत असल्याचे सांगितले. बाबासाहेबांमुळेच आज भारतीय समाजाला समानतेचा आणि न्यायाचा मार्ग मिळाला असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेचे मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले यांच्याकडे महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदाचा तात्पुरता अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. याबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने आदेश जारी करण्यात आले आहेत. आदेशात म्हटले आहे की, सन २०२५-२०२६ चे सुधारित व सन २०२६-२०२७ चे मूळ अंदाजपत्रकातील तरतुदींमध्ये वाढ/घट करून करण्यात आलेल्या बिल अदायगी तसेच मागील तीन वर्षांतील तत्सम प्रकरणांची चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्यात आलेली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य, वित्तीय शिस्तीशी संबंधित बाबींचा विचार करता, चौकशी निष्पक्ष, पारदर्शक व प्रभावीपणे पार पाडण्यासाठी महापालिकेचे मुख्य लेखा व…

Read More

बालवाडीतून पहिलीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ उत्साहात पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  बालवाडी हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्यावर मुलांमध्ये आत्मविश्वास, सृजनशीलता आणि शिकण्याची आवड निर्माण करणे गरजेचे असते. महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे, असे प्रतिपादन शिक्षण समितीच्या सभापती रविना आंगोळकर यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने पीसीएमसी पब्लिक स्कूल, साई जीवन, जाधववाडी (कन्या व मुले शाळा क्र. ८७) येथे बालवाडीतून इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी शिक्षण समितीच्या सभापती रविना आंगोळकर बोलत होत्या. यावेळी विधी समिती सभापती सुजाता…

Read More

पेटंट बाबत जागरूकता निर्माण व्हावी – डॉ. हरीश तिवारी पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  शैक्षणिक क्षेत्रातील संशोधक व नावीन्यपूर्ण नवसंकल्पना सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक संपदा हक्क (आयपीआर), पेटंट कायदे आणि पेटंट ड्राफ्टिंग याबाबत जागरूकता निर्माण झाली पाहिजे. यासाठी पीसीइटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई हे नेहमी आग्रही असतात, असे पीसीसीओइआरचे संचालक व प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी सांगितले.    पीसीसीओइआर मध्ये विद्यार्थ्यांसाठी व संशोधकांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतात. त्याच्या संशोधकांनी लाभ घ्यावा आणि आपल्या संशोधनाचे आणि स्वामित्व हक्कांचे संरक्षण करावे…

Read More

पर्यावरण आणि आरोग्याचा सुंदर संगम; महापुरुषांच्या जयंती साजरी करण्याचा नवा पायंडा पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उन्नती सोशल फाउंडेशन, पिंपळे सौदागर यांच्या वतीने महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती सामाजिक बांधिलकी जपत आणि वेगळ्या पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत १३५ रोपांचे वाटप करण्यात आले, तसेच आरोग्य सेवेच्या दृष्टीने सनराईज मेडिकल फाउंडेशनला चार व्हीलचेअर प्रदान करण्यात आल्या. पर्यावरण आणि आरोग्य या दोन्ही क्षेत्रांचा सुंदर संगम साधणारा हा उपक्रम सर्व स्तरातून कौतुकास पात्र ठरला. हा कार्यक्रम उन्नती सोशल फाउंडेशन कार्यालय, पिंपळे सौदागर येथे पार पडला. उन्नती सोशल फाउंडेशनने महापुरुषांच्या जयंती साजरी करण्यासाठी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शब्द, सुर आणि विचार यांचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळालेल्या ‘काव्यशायराना’ या बहुभाषिक काव्यमंचाने ‘विचार प्रबोधन पर्व २०२६’ला एक वेगळाच उंचावलेला आयाम दिला. मराठी, हिंदी आणि उर्दू काव्याच्या सुरेल अभिव्यक्तीतून सामाजिक समता, मानवी नातेसंबंध आणि बदलत्या समाजाचे प्रतिबिंब उभे राहत, उपस्थित श्रोत्यांना केवळ मनोरंजन नव्हे तर विचारांची नवी दिशा देणारा हा कार्यक्रम ठरला. पिंपरी येथील क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (भिमसृष्टी) येथे महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती वर्षानिमित्त ११ ते १७ या कालावधीत सामाजिक समता सप्ताह व विचार प्रबोधन पर्व २०२६…

Read More

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समता, स्वातंत्र्य आणि न्यायाचा विचार हा आपल्या संविधानाचा पाया आहे. त्यांनी दिलेल्या शिक्षण, संघटन आणि संघर्षाच्या मंत्रामुळे समाजात परिवर्तन घडले. आजच्या पिढीने त्यांच्या विचारांना केवळ स्मरणात न ठेवता आचरणात आणणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस, भीमसृष्टी तसेच एच. ए क़ॉलनी आणि दापोडी येथील पुतळ्यास महापौर रवि लांडगे तसेच…

Read More