Author: maharashtrabreakingnews.com

चिंचवड (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाकड, पुनावळे, मामुर्डी दरम्यान सुरु असलेल्या अंतर्गत आणि डिपी रस्त्याच्या कामापासून या परिसरातील रहिवाशी, तसेच वाहनचालकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे. त्यासाठी येथील सुरू असलेले सर्व अंतर्गत आणि डिपी रस्त्यांचे काम युध्दपातळीवर पूर्ण करा, असे स्पष्ट निर्देश चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी संबधित अधिका-यांना दिले आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्याकडून मुंबई-बैंगलोर महामार्गावरील वाहतूक कोंडी व समस्यांकडे सातत्याने लक्ष दिले जात आहे. त्यांच्याकडून या महामार्गावरील समस्यांपासून नागरिकांची सुटका करण्यासाठी वारंवार सूचना केल्या जात आहे. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून हे काम करण्याच्या सूचना दिल्यानंतर काही दिवसांपूर्वी वाकड, पुनावळे, मामुर्डी दरम्यानच्या अंतर्गत आणि डिपी…

Read More

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर परिसरातील रस्त्यांच्या विकासाला गती देण्यासाठी भाजप शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न (बापू) काटे यांनी प्रत्यक्ष पाहणी मोहीम हाती घेतली आहे. स्मार्ट सिटी विभागामार्फत सुरू असलेल्या कुणाल आयकॉन रोड व ट्रायोज सोसायटी रस्ता या दोन्ही महत्त्वाच्या मार्गांची त्यांनी सविस्तर पाहणी केली. या पाहणीदरम्यान श्री. काटे यांनी रस्ता कॉंक्रिटकरणाच्या कामाची गती, गुणवत्ता आणि नागरिकांना होणाऱ्या सोयीसुविधा यांची माहिती घेतली. त्यांनी संबंधित पालिका अधिकाऱ्यांना काम वेळेत, दर्जेदार आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. ट्रायोज सोसायटी रस्त्याची पाहणी करताना श्री. काटे यांनी अधिकारी वर्गाला निर्देश दिले की, > “नागरिकांना वाहतुकीच्या अडचणींना अधिक काळ तोंड द्यावे…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिवाळी निमित्त स्वदेशी आयुर्वेदिक उत्पादन वापरून  पिंपरी, खराळवाडी येथील संतोष बाबर या तरुणाने आयुर्वेदिक अभ्यंग स्नान किट केवळ १४० रुपयात उपलब्ध करून दिले आहे.    आकर्षक पॅकिंग बॉक्समध्ये सुगंधी उटणे (५० ग्रॅम), सुगंधी तेल (२० मि. ली.), सुगंधी उटण्याचा साबण (८० ग्रॅम), आकर्षक मेणाची व मातीपासून बनवलेली पणती (१ नग) या सर्व वस्तू केमिकल विरहित, आयुर्वेदिक आणि स्वदेशी आहेत. बॉक्सवर आकर्षक दिवाळी भेटकार्ड आहे. हे अभ्यंग स्नान किट आपण दिवाळीनिमित्त आपल्या  नातेवाईकांना, आप्तेष्टांना आणि मित्रमंडळींना भेट म्हणून देण्यासाठी उत्तम पर्याय आहे. या किटची किंमत महागाई च्या काळात सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी म्हणजे फक्त १४०/- रुपये…

Read More

चिखली जाधववाडी येथील इमॅजिका पार्क सहकारी गृह रचना संस्थेने सोसायटीच्या स्वखर्चाने बसवला ४० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जाधववाडी चिखली येथील इमॅजिका पार्क सोसायटीने 40 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प बसवला असून या प्रकल्पामुळे ही सोसायटी विजेसाठी स्वावलंबित झाली आहे. या सौरऊर्जा प्रकल्पामुळे सदर सोसायटीला प्रत्येक महिन्याला येत असणारे भरमसाठ विजेचे बिल आता शून्य झाले आहे. उलट सदर प्रकल्पामधून निर्माण होणारी वीज महावितरण कंपनी विकत घेणार आहे. सदर सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन आणि लोकार्पण फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सदर सोसायटीचे चेअरमन श्री प्रशांत निखाडे त्याचप्रमाणे सर्व कमिटी मेंबर आणि बहुसंख्य…

Read More

चिंचवड (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 22 मधील नागरिकांसाठी लोकप्रिय आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकारातून “जन की बात संवाद | सेवा | समर्पण” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी दहा वाजता काळेवाडीतील ज्योतिाबा मंगल कार्यालय या ठिकाणी होणार आहे. या वेळी आमदार शंकर जगताप स्वत: उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. यामध्ये शासकीय योजना, जनसामान्यांच्या तक्रारी, शासकीय दाखले, महापालिकेशी संबधित तक्रारी, वीज, पाणी, ड्रेनेजबाबतच्या नागरिकांच्या समस्या ते जाणून घेणार आहेत. नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी महानगरपालिका, महावितरण, पाणीपुरवठा विभाग आणि इतर शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतरत्न, मिसाईल मॅन आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती ही वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा केली जाते . तरुणपणी ते वृत्तपत्र विक्री करायचे त्यांच्या प्रेरणेतून वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा करण्यात वृत्तपत्र विक्रेता दिनाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरातील विक्रेत्यांच्या ठिकाणी जाऊन कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी त्यांचा सन्मान करून त्यांना मिठाई भरून या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ नॅशनल हॉकर फेडरेशनच्या वतीने हा सन्मान करण्यात आला. यावेळी इरफान चौधरी,अंबालाल सुखवाल, सुशील खरात, नितीन भराटे, प्रकाश साळवे आदी उपस्थित होते. नखाते म्हणाले साधारण मध्यरात्री अडीच, तीन वाजल्यापासून…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –पिंपरी-चिंचवड आणि कारवार या दोन शहरांदरम्यान थेट बससेवेची दीर्घकाळची मागणी अखेर पूर्ण झाली असून, आज या बससेवेचे उदघाटन उत्साहात पार पडले. पिंपरी-चिंचवड आगारातून या बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य  काळुराम नढे, माजी नगरसेवक विनोद नढे, चिंचवड ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, आगार व्यवस्थापक पल्लवी पाटील, स्थानक प्रमुख वैशाली कांबळे, तसेच कारवार मित्र मंडळाचे अध्यक्ष महेंद्र राणे उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील नागरिकांकडून कारवारकडे नियमित बससेवेची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. पर्यटन, नोकरी, शिक्षण आणि व्यापाराच्या दृष्टीने या मार्गावरील प्रवाशांची संख्या वाढत असताना बससेवेअभावी नागरिकांना त्रास होत होता. अखेर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली चिंचवड येथे आज जनतेच्या स्थानिक तक्रारींवर थेट तोडगा काढण्यासाठी ‘जनसंवाद’ कार्यक्रम संपन्न झाला. चिंचवडमधील या उपक्रमात आज सुमारे ३ हजार तक्रारी नोंदविण्यात आल्या, त्यापैकी तब्बल १२०० तक्रारींचे निराकरण तत्काळ करण्यात आले. इतर प्रकरणांवर संबंधित विभागांकडून कार्यवाही सुरू आहे. या तक्रारी मुख्यत्वे समाजकल्याण, पाणीपुरवठा, महसूल, बांधकाम परवानग्या, पोलीस, घनकचरा व्यवस्थापन, सिटी सर्व्हे कार्यालय, वीज वितरण, आरोग्य, सहकारी संस्था आणि वाहतूक विभागाशी संबंधित होत्या. प्रत्येक विभागाकडे २०० हून अधिक अर्ज आले आहेत. या आधीच्या जनसंवाद सत्रांत हडपसर ४०००, पिंपरी ४८००, खडकवासला ३६०० आणि चिंचवड ३०००…

Read More

विद्याभारती अखिल भारतीय शिक्षण संस्था पुणे यांच्या वतीने पुरस्कार प्रदान पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळांमध्ये राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची दखल घेत विद्याभारती अखिल भारतीय शिक्षण संस्था पुणे यांच्या वतीने  संपूर्ण पुणे जिल्ह्यातील एकूण १५ शाळांना ‘उत्कृष्ट शाळा पुरस्कार २०२५’ देऊन गौरविण्यात आले असून, नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला या गौरवप्राप्त शाळांमध्ये एक ठळक स्थान पटकावले आहे.नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ला, पिंपरी चिंचवड शहरातील एक नामांकित संस्था म्हणून ‘पुणे जिल्हा उत्कृष्ट शाळा पुरस्कार २०२५’ ने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा विद्याभारती, अखिल भारतीय शिक्षण संस्था, पुणे यांच्या वतीने शनिवारी, दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी ग.दि. माडगूळकर सभागृह, आकुर्डी येथे मोठ्या दिमाखात पार…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चऱ्होली उपअग्निशमन केंद्रामार्फत सांडपाणी शुद्धीकरण केंद्र (सिव्हेज ट्रीटमेंट प्लांट) येथे गॅस लिकेज, स्वतःचा आणि इतरांचा बचाव, आग आणि आगीचे प्रकार तसेच आग विझविण्याच्या पद्धतींवर आधारित मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित कर्मचारी व नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत काय करावे आणि काय करू नये, याबाबत मार्गदर्शन केले. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे यांच्या अधिपत्याखाली उपअग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे आणि प्रभारी उपअग्निशमन अधिकारी विकास नाईक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मॉक ड्रिलमध्ये अग्निशमन विभागाचे जवान, सांडपाणी शुद्धीकरण केंद्राचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक…

Read More