Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागामार्फत मालमत्ता कर वसुली मोहिमेला गती देण्यात आली असून, थकबाकीदारांवर जप्तीची कठोर कारवाई सुरू आहे. आतापर्यंत शहरातील २७ मालमत्तांची जप्ती करण्यात आली आहे. थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या असून विविध ठिकाणी थेट मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यासाठी करसंकलन विभागाच्या १८ विभागीय कार्यालयांमार्फत कारवाई सुरु आहे. महापालिकेकडून वारंवार आवाहन करून, नोटीस देऊन देखील मालमत्ता कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांची मालमत्ता जप्त करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आणि सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सर्व विभागीय कार्यालयांना दिले आहेत. ही मोहीम पुढील महिनाभर व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असून याकाळात मालमत्ताकर थकबाकी असणाऱ्या थकबाकीदारांवर कारवाई…

Read More

चिंचवड (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकारातून “जन की बात संवाद | सेवा | समर्पण” होत असलेल्या या विशेष कार्यक्रमात प्रभाग क्रमांक २२ व परिसरातील ५९० तक्रारींची ऑन द स्पॉट सोडवणूक करण्यात आली. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २२ मधील नागरिकांसाठी आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकारातून “जन की बात संवाद | सेवा | समर्पण” हा विशेष कार्यक्रम सुरु आहे. गुरुवार, दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी काळेवाडीतील ज्योतिाबा मंगल कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांनी तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यामध्ये शासकीय योजना, जनसामान्यांच्या तक्रारी, शासकीय दाखले, महापालिकेशी संबधित तक्रारी, वीज, पाणी, ड्रेनेज…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘कविवर्य नारायण सुर्वे हे मानवतावादी कवी होते!’ असे विचार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी नारायण सुर्वे यांचे निवासस्थान, स्वानंद सोसायटी, नेरळ येथे व्यक्त केले. नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी आयोजित पद्मश्री नारायण सुर्वे जन्मशताब्दी सोहळ्यातील काव्यजागर आणि पुरस्कार प्रदान समारंभात डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. श्रमश्री बाजीराव सातपुते अध्यक्षस्थानी होते; तसेच पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, सचिव पुरुषोत्तम सदाफुले यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांना पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान, महाराष्ट्र साहित्य परिषद…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  संत महात्म्यांच्या नावाने वेगवेगळ्या समाजाची आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून हे सरकार जाती-जातीमध्ये द्वेष निर्माण करीत आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार महासंघ प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांनी केला. गुरुवारी (दि.१६ ऑक्टोबर) पिंपरी, पुणे येथे महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार महासंघ व मायक्रो ओबीसी, अलुतेदार, बलूतेदार, विमुक्त, भटके समाजाच्या जिल्हा प्रतिनिधींची महाराष्ट्र प्रदेश बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निमंत्रक व महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रतापराव गुरव, प्रदेश कार्याध्यक्ष सतीश दरेकर, प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत गवळी, शशिकांत आमने, मुकुंद मेटकर, किशोर सूर्यवंशी, सतीश कसबे, चंद्रकांत कापडे, बाळासाहेब शेलार, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष अभिमन्यू…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  चिखली आणि कुदळवाडी परिसरात वसुबारस निमित्ताने विविध ठिकाणी गाय-वासरांचे पूजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक गोसेवक आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन गोरक्षणाचा संकल्प करत पूजनाचे आयोजन केले आहे. यासाठी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने पुढाकार घेण्यात आलेला आहे अध्यक्ष दिनेश यादव यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याबाबत भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष दिनेश यादव म्हणाले, गाय आणि वासराचे पूजन ही भारतीय संस्कृतीतील एक श्रद्धेची बाब आहे. गोमातेचे केवळ धार्मिकच नाही तर सामाजिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. या वर्षी वसुबारस साजरी करताना नागरिकांनी केवळ पूजनापुरते मर्यादित न राहता, वर्षभर गोरक्षणासाठी कार्य करावे, असा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे गुरव येथील कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान व माजी नगरसेवक राजेंद्र जगताप मित्र परिवार यांच्या वतीने येत्या १९, २०, २१ व २२ ऑक्टोबर रोजी ‘सुरमयी दिवाळी पहाट’ अंतर्गत संगीत, गाण्यांची मैफिल अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे, अशी माहिती माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी दिली. पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सुरमयी दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे दीपप्रज्ज्वलन १९ ऑक्टोबर रोजी पहाटे ५.३० वाजता सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नांदेकर यांच्या हस्ते होणार आहे. दि. १९ ऑक्टोबर रोजी सूरपालवी अंतर्गत गायिका पल्लवी पत्की-ढोले, झी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) दिवाळीचा आनंद साजरा करताना, गेल्या काही वर्षांत शहरात दिवाळीच्या कालावधीत घडणाऱ्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत ‘सुरक्षित दिवाळी’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत आपत्कालीन परिस्थितीसाठी पूर्वतयारी तसेच विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी सुरक्षिततेच्या सूचनांचे काटेकोर पालन करून आनंददायी व सुरक्षित दिवाळी साजरी करावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. दिवाळीच्या काळात नागरिकांनी आपल्या परिसरातील पार्किंग, रस्ते, वसाहती आणि बाजारपेठांमध्ये निष्काळजीपणे फटाके फोडणे टाळावे. प्रत्येकाने स्वतःची, कुटुंबाची आणि समाजाची सुरक्षा राखावी. आग लागल्यास त्वरित १०१ या अग्निशमन नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अग्निशमन विभागाकडून करण्यात आले…

Read More

पर्यावरणपूरक तसेच सुरक्षित दिवाळीसाठी प्रशासन सज्ज – आयुक्त श्रावण हर्डीकर पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिवाळी हा आनंद, उत्साह आणि ऐक्याचा सण असून, या काळात नागरिकांची दिवाळी आनंददायी, सुरक्षित आणि सुखकर व्हावी तसेच पर्यावरणाचे रक्षण व्हावे, यासाठी योग्य नियोजन करण्यात यावे. दिवाळी काळात फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी जनजागृती मोहीम राबवावी, शहरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि अग्निशमन यंत्रणा सतर्क ठेवावी, वाहतुकीची योग्य व्यवस्था, गर्दी नियंत्रण आणि अपघात प्रतिबंधक उपाय तत्परतेने राबवावेत, गर्दीच्या भागांत वाहतूक व्यवस्थापनासाठी आवश्यक पथके नेमावीत, असे निर्देश पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गेल्या काही दिवसांपासून रहाटणी – तापकीर नगरमधील शास्त्री नगर, दत्त नगर, नाखते वस्ती, शिवराज नगर, सज्जनगड कॉलनी, पवना नगर रहाटणी आणि तपकीर नगर या भागांमध्ये पाणीपुरवठा अनियमित आहे. सकाळ-संध्याकाळी कमी दाबामुळे किंवा पाणीच न मिळाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येची दखल घेत आज माझ्या जनसंपर्क कार्यालयात महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यात उपअभियंता ऋषिकेश गेंगजे, जूनियर इंजिनियर समीक्षा मालपुरे, कर्मचारी मुकेश भुजबळ आणि शेखर साठे उपस्थित होते. समस्यांचे मूळ शोधून तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. “सध्या दिवाळी सणाची धामधूम असून ऐन सणामध्ये पाणीप्रश्न निर्माण झाल्याने नागरिकांची…

Read More

दिवाळीपूर्वी नव्या कार्यालयीन पद्धतीची अंमलबजावणी नको मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यभरातील महावितरण कार्यालयांच्या पारंपरिक ‘सेक्शन’ या कार्यालयीन पद्धतीला बंद करून नव्या ‘रीस्ट्रक्चरिंग’ रचना पद्धतीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय कंपनी प्रशासनाने घेतला आहे. मात्र, या नव्या पद्धतीची अंमलबजावणी दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात करणे हे ग्राहक व कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अव्यवहार्य ठरेल, असे स्पष्ट करून ही अंमलबजावणी १ नोव्हेंबर २०२५ नंतरच करावी, अशी मागणी करणारे निवेदन पुणे जिल्हा महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समिती सदस्य तथा चिंचवड विधानसभा शिवसेना शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी मुंबईस्थित महावितरण कंपनीचे संचालक (संचालन) सचिन तालेवार आणि संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांना सादर केले आहे. निवेदनात त्यांनी नमूद…

Read More