- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक राहुल कलाटे आयोजित वाकड व परिसरातील नागरिकांनी एक अविस्मरणीय संगीत-गीत संध्या अनुभवली. प्रख्यात गायिका बेला शेंडे यांच्या मधुर सुरांनी सजलेला ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’ व दिवाळी फराळ कार्यक्रम येथील कै. तानाजीभाऊ तुकाराम कलाटे उद्यानात मोठ्या उत्साहात पार पडला. संध्याकाळी प्रकाशझोतांत आणि फुलांच्या सजावटीत न्हालेल्या कलाटे उद्यानात वाकड आणि परिसरातील नागरिकांची कुटुंबियांसमवेत गर्दी उसळली होती. बेला शेंडे, सहकारी गायक व वाद्य वृंदांच्या साथीने एकशे बढकर एक गाण्यांनी सजलेली ही दिवाळीची रात्र सर्वांच्या मनात कायमची घर करून गेली. यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या उस्फुर्त प्रतिसादात दिवाळी फराळ आणि सांगितीक मेजवानीच्या अनोख्या सोहळ्याचा मनमुराद आस्वाद नागरिकांनी घेतला.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुढील काळात विज्ञान तंत्रज्ञानात प्रचंड वेगाने बदल होत आहे. अवघ्या काही महिन्यांत नव नवीन तंत्रज्ञान विकसित होत असून विद्यार्थ्यांनी ते आत्मसात करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत; तरच भविष्यात आश्वासक प्रगती साध्य करता येईल. मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या विविध स्तरातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी केला पाहिजे, असे मार्गदर्शन ज्येष्ठ तंत्रज्ञ, मार्गदर्शक, लेखक अच्युत गोडबोले यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) येथे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात बी. टेक. प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात यावेळी अच्युत गोडबोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. विजयकुमार जंगम शेट्टी, संग्राम निर्मळे,…
“तेरे जैसा यार कहा, कहा ऐसा याराना, शंकर जगताप आणि सचिन साठे यांनी सादर केलेल्या गाण्याला उत्स्फूर्त प्रतिसाद पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सण, संस्कृती आणि समाज प्रबोधन व संघटन यांचा सुंदर संगम सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या वतीने दोन दिवसीय दिवाळी पहाट या कार्यक्रमात पहायला मिळाला आहे. या उपक्रमामुळे नव कलाकारांना व्यासपीठ मिळाले, नागरिकांमध्ये सांस्कृतिक चळवळ जागृत करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. मी माझे मित्र सचिन साठे आणि त्यांच्या फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे याबद्दल अभिनंदन करतो, तसेच सर्व नागरिकांना दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो असे गौरवउद्गार आमदार शंकर जगताप यांनी काढले. दिवाळी निमित्त पिंपळे निलख येथे सचिन…
चांगला दृष्टीकोन, इच्छाशक्तीला कृतीशीलतेची जोड हवी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मानवता मनुष्याचा विवेक आहे. त्यामुळे मानवतेला धर्माच्या साच्यात बसवू नका, असे आवाहन थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्यसिद्धांताचे जनक आणि रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांनी पिंपरीत बोलताना व्यक्त केले. समाजात चांगले बदल घडवण्यासाठी दृष्टीकोन हवाच. त्याचप्रमाणे इच्छाशक्तीला कृतीशीलतेची जोड आवश्यक आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. जनकार्य मंच या संस्थेच्या वतीने दिवाळीनिमित्त शहरातील पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते एकत्र आणून त्यांच्यात चिंतनशील संवादाचे आयोजन करण्यात आले, तेव्हा ते बोलत होते. अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव पृथ्वीराज साठे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी जनकार्य मंचाचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पुरोगामी चळवळीचे नेते मानव कांबळे, मारुती…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य रस्ते व नदीवरील पुलांचे आयुष्यमान किती झाले आहे. ते पूल धोकादायक आहेत का, त्यांची बांधकाम तपासणी महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. शहरातील भाग एकमेकांना जोडण्यासाठी तसेच, वाहतूक रहदारी सुरक्षित व्हावी म्हणून महापालिकेने मुख्य रस्त्यावर उड्डाण पुल आणि पवना, इंद्रायणी व मुळा नदी पात्रावर पुल बांधले आहेत. त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. ते पुल धोकादायक आहे का, हे तपासण्यासाठी महापालिका मुख्य रस्त्यांवरील उड्डाण पुल आणि नदीवरील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार आहे. त्या कामासाठी स्थापत्य विभागाने 21 जुलैला…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दीपावलीचे औचित्य साधून धनत्रयोदशी, शनिवार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी चिंचवडगावातील क्रांतितीर्थ अर्थात क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या वाड्यात दीपोत्सव साजरा करण्यात आला. क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक विनोद बन्सल, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा अध्यक्ष ॲड. ललित झुनझुनवाला, झुनझुनवाला, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे उपाध्यक्ष डॉ. अशोक नगरकर, शिक्षण विभाग प्रमुख नितीन बारणे, मधुसूदन जाधव, सुहास पोफळे, हेमराम चौधरी, डॉ. शकुंतला बन्सल या मान्यवरांनी प्रज्वलित केलेल्या दीपांनी तसेच विद्युत रोषणाईने संपूर्ण वास्तू उजळून निघाली होती. याप्रसंगी सुगंधी चाफ्याची फुले आणि मिष्टान्नाचे वितरण करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या संयोजनात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पिंपरी चिंचवड शहर आणि मावळ लोकसभा रिपब्लिकन सेनेच्या वतीने पत्रकार बंधू भगिनींचा व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा उत्साह पूर्ण वातावरणात शनिवारी पिंपरी येथे संपन्न झाला. पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष गुलाब पानपाटील यांनी निमंत्रित केलेल्या स्नेह मेळाव्यात व पत्रकार बंधू, भगिनींच्या दिवाळी फराळ कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, उपाध्यक्ष महावीर जाधव, डिजिटल मीडिया अध्यक्ष विनय सोनवणे, संजय सूर्यवंशी, मारुती बानेवार, पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील उर्फ बाबू कांबळे तसेच पिंपरी चिंचवड, मावळ परिसरातील बहुसंख्य पत्रकार बंधू, भगिनी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि आपुलकीचा सण. याच सणाच्या पार्श्वभूमीवर कुदळवाडी येथे एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. आरोग्य, सफाई आणि ड्रेनेज विभागातील कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांच्या समाजासाठी केलेल्या अमूल्य योगदानाची दखल घेण्यात आली. या सन्मान सोहळ्याचे आयोजन भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष दिनेश यादव आणि ईद्रायंणी महिला प्रतिष्ठान अध्यक्ष निशा यादव यांनी केले. कार्यक्रमात सर्व कर्मचाऱ्यांना मिठाई आणि भेटवस्तू प्रदान करून त्यांच्या निष्ठेचे, मेहनतीचे व सेवेचे मनापासून कौतुक करण्यात आले. कार्यक्रमात संरपंच काळुराम यादव, चेअरमन दत्तात्रय मोरे, तात्यासाहेब सपकाळ, किसन आप्पा यादव, कोडिंबा यादव, मुरलीधर पवार, लालचंद यादव, विलास यादव, दिपक ठाकुर, अमित बालघरे, काका शेळके,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भूपाळी, गौळणी, विठ्ठलाची गाणी, लावणी, कव्वाली, हिंदी-मराठी गाण्यांची रसिकांना मेजवानी मिळाली. निमित्त होते पिंपळे गुरव येथील कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘सूरमयी दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे. नवी सांगवीतील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात आयोजित दिवाळी पहाटच्या तिसऱ्या दिवशी ‘संतवाणी ते लोकगीते व लावणी’ कार्यक्रमात सांगवी-पिंपळे गुरवकरांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती. उत्साहपूर्ण वातावरणात गायक चंद्रकांत शिंदे, गायिका वर्षा एखंडे, गायिका राजेश्वरी पवार, गायक चित्रसेन भवार या कलाकारांनी सादर केलेल्या उत्कृष्ट जुन्या, नव्या सुरेल गाण्यांमुळे ही ‘दिवाळी पहाट’ रसिकांसाठी अविस्मरणीय ठरली. यावेळी आमदार शंकर जगताप, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, अप्पासाहेब रेणुसे, उद्योजक विजय जगताप, माजी नगरसेवक…
सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित ‘सूरमयी दिवाळी पहाट’ या कार्यक्रमात ‘श्री तिथं सौ’ या अनोख्या मैफलीचा आस्वाद घेण्यासाठी पहाटेच्या गारव्यात रसिकांनी मोठी गर्दी केली होती. तरुणाईला भुलविणारे किस्से, कविता आणि सुरेल गाण्यांनी वातावरण भारावून गेले. यावेळी भाऊसाहेब भोईर, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, पोलीस निरीक्षक अमोल नांदेकर, दत्त मंदिराचे शिवानंद स्वामी महाराज, वारकरी महामंडळाचे शहराध्यक्ष विजूअण्णा जगताप, उद्योजक अरुण पवार, ऍड. अभिषेक जगताप, श्रीधर फौजदार, शशिकांत गायकवाड, बाळासाहेब पिल्लेवार, शिवाजी पाडुळे, सुनील गायकवाड, नायब तहसीलदार श्रावण ताते, आप्पा कुंजीर, नंदकुमार कटारे, प्रदीप जगताप, सचिन शेलार, प्रदीप गायकवाड, कमलाकर जाधव, उद्योजक वामनराव कड,…
