Author: maharashtrabreakingnews.com

कारेकर,शिक्षणाधिकारी(माध्यमिक) जिल्हा परिषद ,पुणे चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिक्षण विभाग (माध्यमिक), जिल्हा परिषद पुणे आणि कमला एज्यूकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ज्युनिअर कॉलेज, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने शाळा अंतर्गत जिल्हास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धा २०२५ चे यशस्वी आयोजन करण्यात आले . ही स्पर्धा विज्ञान विषयाविषयी विद्यार्थ्यांमध्ये रुची निर्माण करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आणि सृजनशीलतेला वाव देणे या उद्देशाने घेण्यात आली. या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण चौदा शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. विज्ञानावर आधारित सादरीकरणांद्वारे विद्यार्थ्यांनी सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकत विज्ञानाचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. नाट्यलेखन, अभिनय, संवाद कौशल्य, सर्जनशीलता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या निकषांवर परीक्षकांनी विजेत्यांची निवड केली. पाहिले विजेते पारितोषिक न्यू…

Read More

पिंपळे सौदागर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिवाळीच्या मंगल वातावरणात उन्नती सोशल फाउंडेशन आणि शत्रुघ्न (बापु) काटे युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वरामृत दिवाळी पहाट” या भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.हा कार्यक्रम १८ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे ६ वाजता आणि १९ ऑक्टोबर रोजी पहाटे ६ वाजता तसेच संध्याकाळी ६ वाजता शिव छत्रपती शिवाजी महाराज लिनिअर अर्बन गार्डन, गोविंद यशदा चौक, पिंपळे सौदागर येथे उत्साहात संपन्न झाला. चिंचवड विधानसभेचे आमदार मा.श्री.शंकर जगताप यांची प्रमुख उपस्थिती स्वरामृत दिवाळी पहाटला होती. या दोन दिवसांच्या सुरेल पर्वात प्रख्यात आणि लोकप्रिय कलाकारांनी आपली कला सादर केली. त्यामध्ये सारेगमप फेम महेश कंटे, सुरमणी भाग्यश्री देशपांडे,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आस्मानी संकट डोळ्यांसमोर असताना कोणीतरी मदतीसाठी येईल आणि तो ईश्वरच असेल, असा विचार शेतकरी करीत असतो. त्यावेळी भोसरीसह पिंपरी-चिंचवडमधील असंख्य हात नेहमीच मदतीसाठी पुढे येतात. सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने हाती घेतलेला “एक हात गोधन”चा उपक्रमामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्मविश्वासाला बळ मिळणार आहे, अशी भावना भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. हिंदूभूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष तथा भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने मराठवाडा आणि सोलापूरसह अन्य जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांमधील गरजवंतांना पहिल्या टप्प्यात १०६ गायींचे दान करण्यात आले. त्यासाठी आयोजित केलेल्या गोपूजन सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष चव्हाण बोलत होते. यावेळी भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे गुरव येथील कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित चार दिवसीय ‘सुरमयी दिवाळी पहाट’चा पार्श्वगायक त्यागराज खाडिलकर, व्हर्सेंटाईल सिंगर ममता नेने – गोगटे, पार्श्वगायक संतोष माहेश्‍वरी, पार्श्वगायिका रोहिणी पांचाळ, पार्श्‍वगायक नितीन कदम यांच्या गायनाने बुधवारी शानदार समारोप झाला. संपूर्ण कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी माजी नगरसेवक अप्पा रेणुसे, भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, तानाजी काळभोर, डॉ. प्रदीप ननवरे, कीर्तनकार सायली जगताप- देशमुख, माजी नगरसेवक संतोष कांबळे, राजू लोखंडे, संजय जगताप, शिवाजी पाडुळे, दिलीप तनपुरे, सूर्यकांत गोफणे, माजी नगरसेविका माई काटे, चंदा लोखंडे, बाबुराव शितोळे, कविता राजेंद्र जगताप, छाया विजूअण्णा जगताप, आयोजक वारकरी महामंडळाचे शहराध्यक्ष विजूअण्णा जगताप,…

Read More

भूम (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “संकट म्हटलं की शिवसेना मदतीला आलीच…” या विचाराला साजेशी कृती दाखवत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पुन्हा एकदा जनतेच्या पाठीशी उभे राहून समाजकारणाची परंपरा कायम ठेवली. भूम तालुक्यातील उमाची वाडी व बागलवाडी या अतिवृष्टीग्रस्त भागातील कुटुंबांना भेट देत ग्रामीण भागातील महिलांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत २२५ कुटुंबांना दिवाळी फराळाचे साहित्य, तसेच महिला भगिनींना साडी-चोळीचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला. अतिवृष्टीमुळे त्रस्त झालेल्या शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन मावळ लोकसभेचे उपजिल्हाप्रमुख दस्तगीर भाई मणियार, चिंचवड विधानसभा प्रमुख हरेश आबा नखाते, एकनाथजी मंजाळ, लक्ष्मण टोणपे,…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील विविध सामाजिक चळवळीत सक्रिय असलेले आणि नेहमीच लोकहितासाठी पुढाकार घेणारे युवा सामाजिक कार्यकर्ते नकुल आनंदा भोईर (वय ४०) यांचा मध्यरात्री पत्नी चैताली भोईर (वय २९) हिच्या हातून खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे माणिक कॉलनी, चिंचवडगाव परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नकुल आणि चैताली भोईर यांच्यात मध्यरात्री उशिरा घरात कडाक्याचे भांडण झाले. नकुल भोईर हे काही दिवसांपासून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होते, यावरून वारंवार वाद होत होता. या वादाच्या भरात चैतालीने संतापाच्या भरात कपड्याने नकुलचा गळा आवळून खून केल्याचे पोलिस तपासात प्राथमिक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  चिखली येथील घरकुल वसाहतीतील सामाजिक कार्यकर्ते पोपट आरणे यांची पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाच्या शहर सचिवपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती हिरामण खवळे यांच्या हस्ते करण्यात आली. सामाजिक बांधिलकी आणि कार्यतत्परतेसाठी ओळखले जाणारे पोपट आरणे यांनी या नियुक्तीनंतर पक्षाच्या सर्व घटकांना न्याय देत, काँग्रेस पक्षाच्या धोरणांनुसार प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. या नियुक्तीबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आरणे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास भाऊ कदम यांचे आकर्षक स्केच उत्तम कलात्मकतेने साकारल्याबद्दल चित्रकार अमृता पोपट अरणे हिचा सर्वधर्मसमभाव भव्य सत्कार करण्यात आला. हा सत्कार मान्यवरांच्या हस्ते पार पडला. अमृता अरणे हिच्या कलाकृतीतून समाजातील एकता, सौहार्द आणि सकारात्मकतेचा संदेश प्रभावीपणे व्यक्त झाला असल्याचे मान्यवरांनी यावेळी गौरवले. राष्ट्रीय लोक अदालत पॅनल न्यायाधीश रमेश अण्णा उमरगे यांनी या प्रसंगी अमृता हिला शुभेच्छा देत तिच्या पुढील कलाजिवनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. कलाप्रेमी व उपस्थित मान्यवरांनी या निमित्ताने अमृता अरणेच्या सर्जनशीलतेचे कौतुक केले आणि तिच्या कलाकृतीतून सामाजिक ऐक्याचा सुंदर संदेश दिल्याबद्दल अभिनंदन केले.

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – सोहम् सार्वजनिक ग्रंथालय आणि अभ्यासिकेच्या वतीने संत तुकारामनगर, पिंपरी येथे दीपावलीनिमित्त  महानगरपालिका ह विभागातील स्वच्छतादूत कर्मचारीवर्गाच्या समर्पित सेवेला सन्मानाचा सलाम करण्यात आला. महानगरपालिका माजी शिक्षण उपसभापती मायला खत्री, माजी नगरसेविका सुजाता पलांडे, माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे, सामाजिक कार्यकर्ते किरण सुवर्णा, संत तुकारामनगर पोलीस स्थानकातील साहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल शेटे, अभिजित गोफण, सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष जगन्नाथ नेरकर, संचालिका निर्मला नेरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते स्वच्छतादूत महिला कर्मचारीवर्गाला साड्या आणि पुरुष कर्मचारीवर्गाला पेहराव तसेच मिठाई आणि फळफळावळ यांचे वाटप करण्यात आले. जगन्नाथ नेरकर यांनी प्रास्ताविकातून, ‘सफाई कामगार हे खऱ्या अर्थाने समाजसेवक आणि आरोग्यरक्षक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘श्रीमद् भगवद्‌गीता पूजेपुरती न ठेवता जीवन मार्गदर्शक ग्रंथ म्हणून आचरणात आणा!’ असे आवाहन ब्रह्माकुमारी मैत्रेयी चैतन्य यांनी मनोहर सभागृह, ज्ञानप्रबोधिनी, निगडी प्राधिकरण येथे केले. चिन्मय मिशन, पिंपरी-चिंचवड आणि पुणे यांच्या वतीने आयोजित श्रीमद् भगवद्‌गीता (प्रकरण पंधरावे) पठण स्पर्धा २०२५ च्या पारितोषिक वितरण समारंभात ब्रह्माकुमारी मैत्रेयी चैतन्य बोलत होत्या. ह. भ. प. येवलेमहाराज, मिशनचे अध्यक्ष हेमंत गवंडे, सचिव आनंद देशमुख यांची व्यासपीठावर तर सहभागी शाळांमधील शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी अशी सुमारे १२०० हून अधिक व्यक्तींची समारंभात उपस्थिती होती. यावर्षीच्या स्पर्धेत ६८ शाळांमधील सुमारे ४००० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्वक सहभाग घेतला. या स्पर्धेची सुरुवात जुलै २०२५ मध्ये…

Read More