Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिका निवडणुकीसाठी आज, मंगळवार (दि. ११) रोजी सकाळी प्रभागनिहाय आरक्षण सोडती काढण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वच प्रभागांमधील इच्छुक संभाव्य उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. सोडतीनंतर सर्वच पक्षांच्या निवडणूक तयारीला वेग येणार असून स्थानिक राजकारणाची दिशा ठरणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान प्रभागनिहाय आरक्षित जागांची संख्या निश्चित करून प्रस्ताव आयोगाकडे पाठविला होता. त्या प्रस्तावाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्याअनुषंगाने सोमवारी (दि. १०) प्राधिकृत अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडतीची रंगीत तालीम पार पडली. आज मुख्य सोडत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार आहे. शहरातील प्रभागरचना…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात विक्रमी प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल ५६९ नागरिकांनी नोंदणी केली, तर त्यापैकी ४७० पात्र रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजसेवेचा उज्ज्वल आदर्श घालून दिला. सध्या पिंपरी चिंचवड शहरातील विविध रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांना जीवदान मिळावे आणि शहरातील रक्तसाठा वाढावा, यासाठी सोसायटी फेडरेशनने हा सामाजिक उपक्रम राबवला. या शिबिरात शहरातील विविध सोसायट्यांतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पुरुषांसह महिला रक्तदात्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. या उपक्रमामुळे फेडरेशनच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत असून, समाजहितासाठी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महापालिकेने शाश्वत, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक शहरी वाहतूक व्यवस्थेसाठी राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. या उपक्रमांसाठी महापालिकेला केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयामार्फत “शहरी वाहतूक उत्कृष्टता पुरस्कार” (Award of Excellence in Urban Transport) प्रदान करण्यात आला आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या अर्बन मोबिलिटी परिषदेत केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी, केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार राज्यमंत्री तोखन साहू, भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव श्रीनिवास कटिकिथला, विशेष कार्यकारी अधिकारी जयदीप यांच्यासह…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी चौकात अहिल्यादेवी पुतळ्यासमोर बसविण्यात आलेला अशास्त्रीय आणि अपघातजन्य काँक्रिट डिव्हायडर तात्काळ हटवावा, या मागणीसाठी आज रिक्षा-टॅक्सी चालकांनी मनपा मुख्यालयासमोर मोठे एल्गार आंदोलन केले. हे आंदोलन महाराष्ट्र रिक्षा पंचायत कष्टकरी जनता आघाडी आणि ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झाले. आंदोलनादरम्यान आंदोलकांनी “भ्रष्टाचार बंद करा”, “डिव्हायडर हटवा”, “वाहतूक कोंडी थांबवा” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी डॉ. कांबळे यांनी मनपा आयुक्तांना संबोधित सात मागण्यांचे निवेदन सादर केले. मनपाचे अधिकारी अभिमन्यू भोसले यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले व डिव्हायडरबाबत तातडीने कार्यवाहीचे आश्वासन दिले. डॉ. कांबळे यांनी प्रशासनावर आर्थिक गैरव्यवहार…

Read More

एमआयटी एडीटी विद्यापीठातर्फे करिअर गाईडन्स सेमिनार निगडीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात “बारावी नंतर पुढे काय?” या विषयावर मार्गदर्शन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  बारावीची परीक्षा संपल्यानंतर “पुढे काय करावे?” हा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांसमोर नेहमीच उभा राहतो. विद्यार्थ्यांनी आपल्या आवड, क्षमता आणि संधी लक्षात घेऊन योग्य करिअर निवडणे ही जबाबदारीची वेळ असते. या निवड प्रक्रियेत पालकांचे मार्गदर्शन आणि समजूतदारपणा महत्त्वाचा ठरतो. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी आणि पालकांना निर्णय घेण्यास मदत व्हावी यासाठी एमआयटी एडीटी विद्यापीठ, पुणे आणि ॲडमिशन सजेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “बारावी नंतर पुढे काय?” या विषयावर मोफत करिअर गाईडन्स सेमिनार आयोजित करण्यात आला आहे. हा सेमिनार…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशप्रेमाने भारावून कार्यरत असलेल्या सर्व सेवाभावी संस्थांची मातृसंस्था आहे!’ असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषद केंद्रीय सह मंत्री तथा अखिल भारतीय सह सत्संग प्रमुख महेंद्र तथा दादा वेदक यांनी पांजरपोळ, भोसरी येथे (रविवार, दिनांक ०९ नोव्हेंबर २०२५) व्यक्त केले. पुणे ग्रामीण विभागातील विश्व हिंदू परिषदेच्या चार जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी वर्गातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दादा वेदक बोलत होते. याप्रसंगी विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र प्रांत मंत्री किशोर चव्हाण, प्रांत सहमंत्री आणि ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सतिश गोरडे, प्रांत सहमंत्री नितीन वाटकर, विभाग मंत्री सोमनाथ दाभाडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. दादा वेदक पुढे म्हणाले…

Read More

महिलांच्या विश्वासातून नेतृत्व मजबूत; पुनावळे-ताथवडे-वाकडमध्ये राहुल काटेंचा प्रभाव वाढतोय पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – पुनावळे,ताथवडे, वाकड परिसरात भाजपाचे कार्यकर्ते राहुल काटे यांच्या पुढाकाराने ‘उत्सव आनंदाचा – खेळ पैठणीचा!’ या उपक्रमास महिलांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. महिला मतदारांशी थेट संवाद साधत, महिलांच्या कलेला व्यासपीठ देणारा हा कार्यक्रम आगामी निवडणुका लक्षात घेऊन महत्त्वाचा ठरत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. कार्यक्रमाला परिसरातील महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसली. मंचावरून महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश देत कार्यक्रमाचे रूपांतर सामाजिक-जागृती व जनसंपर्क मोहिमेत करण्यात आले असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बाप्पू) काटे यांनी विजेत्या महिलांचा सन्मान केला. तर अभिनेत्री पल्लवी वैद्य यांनी उपस्थिती…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना ओला व सुका कचरा स्वतंत्र देण्याचे आवाहन केले आहे. शहरातील अनेक नागरिक कचरा वर्गीकरणाचे नियम पाळत असले तरी काही भागांमध्ये अद्याप ओला व सुका कचरा एकत्र दिला जातो, असे प्रशासनाचे निरीक्षण आहे. महापालिकेने दोन वेगवेगळ्या रंगांचे डबे उपलब्ध करून दिले असून, त्यांच्या योग्य वापराने कचऱ्याचे प्रभावी वर्गीकरण, पुनर्वापर आणि कंपोस्टिंग सुलभ होईल. घनकचरा व्यवस्थापन अधिनियमानुसार प्रत्येक नागरिकाने घरगुती तसेच व्यावसायिक कचरा वर्गीकृत स्वरूपात देणे बंधनकारक आहे. स्वच्छतेसाठी नियुक्त निरीक्षण पथके रोज तपासणी करत असून, नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे..“शहर स्वच्छ ठेवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,” असे…

Read More

  पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  विद्यार्थी हा आत्मनिर्भर आणि विकसित भारताचा प्रमुख कणा आहे. त्यांना पूर्वीच्या गुरुकुल पद्धतीतील सर्वांगिण दृष्टीकोन विकसित करणारे, समाजाप्रती संवेदनशील बनविणारे, मानसिक व शारीरिक आरोग्य अबाधित राखत कायम सकारात्मक दृष्टीकोन देणारे, पुस्तकाबाहेरील शिक्षण द्यायला हवे. कारण, विद्येचे अंतिम उद्दिष्ट केवळ पदवी मिळवणे नव्हे; मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी करणे, स्वतःला देशाच्या प्रगतीसाठी समर्पित करणे — हेच खऱ्या शिक्षणाचे यश आहे. अपयश हे शेवट नसते, तर नव्या प्रवासाची सुरुवात असते. त्यामुळे, अपयशाला यशाची शिडी बनवून तुमच्या ज्ञान, कर्तृत्व आणि संवेदनशीलतेच्या बळावर भारताला जागतिक महासत्ता बनवा, असे आवाहन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले. ते येथे आयोजित…

Read More

विश्वास पाटील यांना यशवंतराव चव्हाण प्रज्ञावंत साहित्य पुरस्कार तसेच इतरांना भूमिपुत्र पुरस्कार जाहीर पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने चौथे साहित्य संमेलन मोशी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर साहित्य नगरी (जय गणेश बँक्वेट हॉल) बीआरटी रोड, मोशी येथे रविवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. याचे उद्घाटन सकाळी ९ वाजता, ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षण तज्ञ न. म. जोशी यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन सत्रात ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांना यशवंतराव चव्हाण प्रज्ञावंत साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष संदीप भानुदास तापकीर यांनी पत्रकार परिषदेत दिली.    चिंचवड…

Read More