- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अक्षय्यतृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महाभोग दाखविण्यात आला. साडेतीन मुहूतार्पैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्यतृतीयेच्या मंगलदिनी दरवर्षी हा महा नैवेद्य बाप्पाला दाखवला जातो. याच दिवशी गणरायाचे दर्शन व्हावे, याकरिता भाविकांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला. यामध्ये गणपती बाप्पांना ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. पुण्यातील आंब्यांचे सुप्रसिद्ध व्यापारी देसाई आंबेवालेचे संचालक मंदार देसाई कुटुंबियांच्यावतीने हा नैवेद्य देण्यात आला. मंदिरात रविवारी पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक झाला. त्यानंतर पहाटे ४ वाजता गायिका विदुषी मंजुषा पाटील यांनी स्वराभिषेकातून गायनसेवा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २८ अंतर्गत येणाऱ्या पिंपळे सौदागर परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नवीन पर्यायी रस्त्याचा समावेश करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत नगरसेविका अनिता संदीप काटे यांनी महापालिकेच्या नगररचना विभागाच्या उपसंचालकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, नाशिक फाटा ते कोकणे चौक बीआरटीएस मार्ग तसेच कुणाल आयकॉन समोरील डी.पी. रस्ता हे दोन प्रमुख मार्ग कोकणे चौक आणि शिवर चौक येथे एकत्र येत असल्याने या भागात दररोज प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते. परिणामी स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत असून, वारंवार तक्रारीही समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर पिके…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम चिंचवड येथील उद्योगनगर येथे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गुणवंत कामगार अण्णा जोगदंड तर वक्ते प्राध्यापक केरनाथ ढवळे होते यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला .प्रमुख पाहुणे व वक्ते यांच्या शुभहस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे वक्ते प्राध्यापक केरनाथ ढवळे यांनी संविधान जागर – मूलभूत हक्क व मूलभूत कर्तव्य या विषयावर व्याख्यान दिले ते म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पहिले कायदामंत्री होते समाजसुधारक, शास्त्रज्ञ होते . प्रमुख पाहुणेआण्णा जोगदंड म्हणाले की जगातील 154 देशांमध्ये डॉ. बाबासाहेब…
१०८ विद्यार्थ्यांना ९१ टक्क्यांपेक्षा जास्त गुण पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचा सीबीएसई इयत्ता दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकाल लागला आहे. यामध्ये निरंजन अनुसे याला ९८.४ टक्के गुण मिळाले असून त्याने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक आरना झांजे आणि खुशी कटारिया ९८ टक्के, तृतीय क्रमांक श्रीजीत राठोड आणि वेदांत मडोली ९७.८ टक्के, चौथा क्रमांक अंकूर हरल आणि आर्या देवशटवार ९७.६ टक्के तर पाचवा क्रमांक सिद्धी जाधव आणि सुधनवा कुलकर्णी यांनी ९७.४ टक्के गुण मिळवले. एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या एकूण २७९ विद्यार्थ्यांपैकी १०८ विद्यार्थ्यांना ९१ टक्क्यांपेक्षा जास्त गुण…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा इंटरनँशनल स्कुलचा इयत्ता १०वी (सी.बी.एस.ई) बोर्ड परीक्षेत १०० टक्के निकाल लागला. शाळेत ईशान गाडेकर याने ९८.८० टक्के गुण मिळवून प्रथम आला. इंग्रजी व आयटीत १०० पैकी १०० गुण तर सामाजिक शास्त्र विषयात ९९ गुण मिळविले. अवनी मंडोत व मनस्वी मराठे यांनी ९८ टक्के गुण मिळवून दुसऱ्या क्रमांक पटकावला. त्यांनी इंग्रजी व आयटी विषयात १०० पैकी १०० गुण मिळविले. तर निश्चल बडजाते याने ९७.८० टक्के मिळवून तिसरा आला. याने देखील आयटी व इंग्रजी १०० पैकी १०० गुण प्राप्त केले. तर पहिल्या दहामध्ये रुद्र मंचेकर, तन्वी कापसे, वेदांत सुर्वे,…
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे पुस्तक; आमदार अमित गोरखे यांच्या अभ्यासूवृत्तीवर मुख्यमंत्र्यांची कौतुकाची थाप! पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, हे काळाची गरज आहे. याच उदात्त हेतूने आमदार अमित गोरखे यांनी शब्दांकित केलेल्या ‘आधुनिक भारताचे शिल्पकार : युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या पुस्तकाचे प्रकाशन आज पुणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री माननीय श्री. मुरलीधरजी मोहोळ यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचे लोकार्पण करण्यात आले. पुस्तक सकारात्मक परिवर्तन घडवून आणणारे पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
महावितरणच्या चार कार्यालयांचे विभाजन करण्याची आमदार शंकर जगताप यांची मागणी ताथवडे येथील ‘यशदा’ प्रकल्पासाठी जागा ताब्यात घेऊन अतिउच्च दाब सब-स्टेशन उभारण्याच्या सूचना ऊर्जा राज्यमंत्र्यांसोबत बैठक; प्रलंबित कामे व निधीबाबत सकारात्मक प्रतिसाद पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील झपाट्याने होणारे नागरीकरण आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता महावितरणच्या सध्याच्या यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. ग्राहकांच्या तक्रारींचे वेळेत निवारण करण्यासाठी देहूरोड शाखा कार्यालयाचे विभाजन करून रावेत येथे स्वतंत्र कार्यालय करावे, तसेच काळेवाडी, हिंजवडी आणि बिजलीनगर या मोठ्या विभागांमधील कार्यालयांचेही तात्काळ विभाजन करावे, अशी आग्रही मागणी चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी केली.दरम्यान ताथवडे येथील ‘यशदा’ प्रकल्पासाठीची जागा ताब्यात घेऊन तिथे अतिउच्च…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भाजप पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष शत्रुघ्न बाप्पू काटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, भाजप युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर यांनी नागरिकांसाठी मोफत विमा वितरण अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष अभियानात पिंपरी चिंचवडमधील सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मोफत विमा वितरणासाठी नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे – दोन पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड व पॅन कार्ड झेरॉक्स – घेऊन यावे, असे सांगण्यात आले आहे. मोफत विमा वितरणाचा कार्यक्रम सोमवार, २० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत आयोजित केला असून, ठिकाण भाजपा शहर कार्यालय, एम.एस.आर कॅपिटल, मोरवाडी, पिंपरी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयाकडून चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीर कारवाई करण्यात येत होती आणि स्टॉल, हातगाडी काढून घ्या अन्यथा तीन दिवसात कारवाई करू असा दम देण्यात येत होता या कारवाईचा निषेध करत कायदा अंमलाचा जाब विचाराण्यासाठी या कार्यक्षेत्रातील विक्रेते तातडीने एकत्र येऊन आज ड क्षत्रिय कार्यालय रहाटणी काळेवाडी येथे आंदोलन केले. नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ तर्फे झालेल्या आंदोलनामध्ये कामगार नेते काशिनाथ नखाते पथ विक्रेता समिती सदस्य राजू बिराजदार, सदस्य किरण साडेकर, शैलेंद्र गाडे, कार्याध्यक्ष लक्ष्मण शेरखाने, इरफान चौधरी, सागर कापूरे,मनोज रुपनवर, सुनील भोसले, संतोष बनगर,राजेश माने,नंदू आहेर, रवींद्र गायकवाड, सुषमा शेगावकर,…
कंत्राटी कामगारांना हरियाणा पॅटर्न लागू करण्यासाठी अभ्यासगट स्थापन करीत असल्याची कामगार मंत्र्यांची घोषणा मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कृषी, आरोग्य, शिक्षण, महिला , युवा , उद्योग अशा विविध धोरणाप्रमाणे मागील अनेक वर्षांपासून आपल्या न्यायहक्कासाठी लढणाऱ्या महाराष्ट्रातील कष्टकरी ,श्रमिक कामगारांचे देखील धोरण तयार करून , कंत्राटी कामगारांना कंत्राटदार मुक्त सेवेसाठी हरियाणा पॅटर्न लागू करण्यात यावा यासह विविध मागण्यासाठी भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाने आपल्या विविध उद्योगातील कामगारांचा आज मुंबईतील वांद्रे स्थित कामगार आयुक्त कार्यालयावर हजारोंच्या संख्येने धडक आक्रोश मोर्चा आयोजित केला होता. या भव्यदिव्य अशा मोर्चामध्ये घरेलू, बांधकाम, अंगणवाडी , आशा वर्कर, रिक्षा टॅक्सी चालक, फेरीवाले, विडी कामगार, जलसेवा, नगरपालिका…
