- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या आगामी होऊ घातलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका 2025-2026 निवडणूकीकरिता प्रचार प्रमुख पदी माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांची आज (दि. 14) नियुक्ती करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचनेनुसार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी निवडीचे पत्र दिले. पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला पुन्हा काबिज करण्याकरिता व तो अधिकाधिक मजबूत रहावा या दृष्टीकोनातून प्रचार प्रमुख पदी विठ्ठल उर्फ नाना काटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विठ्ठल उर्फ नाना काटे हे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक, माजी विरोधी पक्षनेते असून पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा आगामी पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अतिशय महत्त्वपूर्ण जबाबदारीसाठी …
मार्शल आर्ट्स, कराटे सोबत मल्लखांब, दांडपट्टा, लाठी-काठी पारंपरिक खेळांचा समावेश पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंदुत्ववादी आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनेशभाऊ यादव युवा मंच आणि शेठ माणिकचंद फाउंडेशन यांच्या वतीने संचलित विश्वकल्याण इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजतर्फे शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष दिनेश यादव यांनी दिली. ही स्पर्धा १४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी साडेआठ वाजता शनी मंदिर ग्राउंड, पूर्णानगर येथे पार पडणार आहे. या क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी मल्लखांब, दंडपट्टा, लाठी-काठी, मार्शल आर्ट्स, फायर जंप, कराटे तसेच विविध पारंपरिक खेळांचा समावेश करण्यात आला आहे. या उपक्रमाचे आयोजन इंद्रायणी महिला…
– अविरत श्रमदानचे डॉ. निलेश लोंढे यांची माहिती पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पर्यावरण संवर्धनाचा संदेश घेऊन इंद्रायणी नदीकाठी पुन्हा एकदा सायकलची चाके फिरणार आहेत. “इंद्रायणी नदी स्वच्छता जनजागृती मोहिमे” अंतर्गत आयोजित “रिव्हर सायक्लोथॉन-2025” या भव्य उपक्रमात यंदा तब्बल ३५ हजाराहून अधिक सायकलपटू सहभागी होणार आहेत. हा उपक्रम रविवार, दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 6 ते 10 या वेळेत ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’’ छत्रपती संभाजी महाराज स्मारक, बोऱ्हाडे वाडी, मोशी येथून सुरू होईल, अशी माहिती अविरत श्रमदान संस्थेचे डॉ. निलेश लोंढे यांनी दिली. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, अविरत श्रमदान, सायकल मित्र, WTE फाउंडेशन आणि महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने शिवसेनेचा शनिवारी (१५ नोव्हेंबर) पदाधिकारी प्रशिक्षण मेळावा होणार आहे. याबाबतची माहिती शिवसेनेचे उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. पिंपरीतील कृष्णा हॉटेल येथे शनिवारी दिवसभर पदाधिकारी प्रशिक्षण मेळावा होणार आहे. सकाळी साडे नऊ वाजता हा मेळावा सुरू होणार असून दुपारी चार वाजेपर्यंत चालणार आहे. खासदार श्रीरंग बारणे हे मुख्य मार्गदर्शन करणार आहेत. संघटन कौशल्य व निवडणूक यंत्रणेबाबत शिवसेनेच्या उपनेत्या सुलभा उबाळे मार्गदर्शन करणार आहेत. पुण्यातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे प्रमुख सुधीर जोशी मतदार यादीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तर, प्रसिद्ध व्याख्याते ज्ञानेश्वर कवडे हे भाषण कौशल्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. खासदार श्रीरंग बारणे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या आरक्षण सोडतीनंतर शहरात खऱ्या अर्थाने डिजिटल निवडणुकीची सरगर्मी वाढली आहे. इच्छुकांनी प्रत्यक्ष मैदानात उतरण्याआधीच सोशल मीडियावर आपला ‘दबदबा’ दाखवण्यास सुरुवात केली असून, फेसबुक-इंस्टाग्रामवर “मीच भावी नगरसेवक”, “यंदा माझा नंबर पक्का”, “जनतेच्या मनातील उमेदवार” अशा धडाकेबाज पोस्टचा महापूर पाहायला मिळतो आहे. आरक्षणामुळे प्रभागांचे चित्र स्पष्ट होताच अनेकांनी आपापले ‘सेफ’ प्रभाग ठरवून तयारी सुरू केली आहे. अनेक वर्षे शांत बसलेले किंवा सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही क्वचितच दिसणारे काही आजी-माजी पदाधिकारी अचानक सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. त्यांच्या ‘कमबॅक’ पोस्टने पाठीराख्यांचा उत्साहही एकदम शिगेला पोहोचला आहे. नागरिकांच्या दारोदारी पोहोचण्याऐवजी एकाचवेळी हजारोंपर्यंत पोहोचणारे सोशल मीडिया हे…
डॉ बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील संघर्ष फलदायी ठरला आहे, याचा कष्ट करणे आनंद व्यक्त केला पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मोरवाडी (पिंपरी-चिंचवड) येथे महानगरपालिकेच्या वतीने अशास्त्रीय व चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आलेले डिव्हायडर व अतिविस्तारीत फूटपाथ यामुळे रस्त्याचा गळा आवळला गेला होता. यामुळे वाहतूक कोंडी, रिक्षा चालक व फेरीवाल्यांना प्रचंड त्रास, तसेच सर्वसामान्य नागरिकांना चालण्यास अडथळा निर्माण झाला होता. या भ्रष्टाचाराच्या कुरणावर बोट ठेवत डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कष्टकरी जनता आघाडी, महाराष्ट्र रिक्षा पंचायत, ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता. या आंदोलनाची तात्काळ दखल घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने दिनांक १२ नोव्हेंबर २०२५…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ताथवडे-पुनावळे परिसर पुन्हा एकदा क्रिकेटच्या उत्साहाने रंगणार आहे! ताथवडे पुनावळे सोसायटी प्रीमियर लीग २०२५ (TPL 2025) या बहुप्रतिक्षित क्रिकेट स्पर्धेला रहिवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, तब्बल ८२ संघांची नोंदणी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे, यापैकी १२ महिला संघ आणि ७० पुरुष संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचं आयोजन चेतन अण्णा पवार स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे करण्यात आलं असून, नोंदणी प्रक्रिया १ ते ७ नोव्हेंबरदरम्यान पार पडली. स्पर्धेची सुरुवात २३ नोव्हेंबरपासून होणार असून, सामने पुढील तीन विकेंड्सदरम्यान सुखवाणी पाम्स टर्फ अँड स्पोर्ट्स, ताथवडे येथे रंगणार आहेत. स्पर्धेच्या जल्लोषात भर घालण्यासाठी भव्य जर्सी आणि शर्ट…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाला स्थापनेनंतर तब्बल सात वर्षांनी स्वतःचा स्वतंत्र घटक झेंडा मिळाला आहे. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या पाठपुराव्यामुळे १० नोव्हेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र पोलिस महासंचालक कार्यालयाने या झेंड्याला अधिकृत मान्यता दिली. महाराष्ट्र पोलिस दलातील प्रत्येक जिल्हा आणि आयुक्तालयाला स्वतंत्र घटक झेंडा दिला जातो. या झेंड्याचा उपयोग महाराष्ट्र पोलिस कर्तव्य मेळावा, राज्यस्तरीय स्पर्धा आणि इतर अधिकृत कार्यक्रमांमध्ये संबंधित घटकाच्या ओळख आणि अभिमानाचे प्रतीक म्हणून केला जातो. ७ वर्षांनंतर पूर्ण झाली प्रतीक्षा.. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाची स्थापना १५ ऑगस्ट २०१८ रोजी झाली होती. मात्र, स्थापनेनंतरही या आयुक्तालयाला घटक झेंडा उपलब्ध झाला नव्हता. ही बाब लक्षात घेऊन…
भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरी येथील चॅम्पियन अरेना शूटिंग अकॅडमी (Walke Federation) च्या नेमबाजांनी अहमदाबाद (गुजरात) येथे झालेल्या G.V. Mhalgunker ‘Pre National Shooting Competition’ मध्ये घवघवीत यश मिळवत शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सर्व नेमबाजांनी आगामी ‘National Shooting Competition’ साठी पात्रता मिळवली आहे. अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक ओम पोखरकर सर (आंतरराष्ट्रीय दर्जाचे 10 व 25 मीटर शूटिंग कोच) यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी उत्कृष्ट प्रगती साधली. 🎯 उत्कृष्ट कामगिरी करणारे नेमबाज : स्वर संगम कुमावत – ३५९/४०० सोहम बाबासाहेब गंजे – ३५७/४०० समर्थ शेलार – ३५२/४०० हर्षवर्धन टिकायत – ३४४/४०० प्रियांका भास्कर गार्जे – ३३५/४०० तसेच विवान…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने रविवार, दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी रमणबाग शाळा, पुणे येथे सेवाकुंभ २०२५चे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री तथा केंद्रीय सहसेवा प्रमुख स्वपनकुमार मुखर्जी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सिनेअभिनेते प्रवीण तरडे, विश्व हिंदू परिषद क्षेत्रमंत्री मा रामचंन्द रामुका, प्रा. अनंत पांडे, उद्योजक नितीन जाधव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहील. अखिल विश्वात हिंदूचे प्रतिनिधित्व करणारे विश्व हिंदू परिषद हे आंतरराष्ट्रीय संघटन आहे. स्थापनेपासून सेवा, सुरक्षा व संस्कार या त्रिसूत्रीवर आधारित परिषद कार्य करीत आहे. जनजातीय श्रेत्रातील विद्यार्थी आणि महिलांसाठी…
