Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आज विद्यार्थी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शाळेचे संस्थापक श्री. अरुण चाबुकस्वार सर, शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत , तसेच पालक प्रतिनिधी निर्मला सावंत, प्रियंका गायकवाड आणि जासू सुतार यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या आकर्षक नृत्य सादरीकरणाने झाली. इयत्ता सहावी व तिसरीच्या मुला-मुलींनी सुंदर डान्स परफॉर्मन्स करून सर्वांचे मन जिंकले. विद्यार्थ्यांसाठी विशेष मनोरंजनात्मक खेळांचीही व्यवस्था करण्यात आली. अनिता रोडे व  उर्मिला ठोबरे यांनी विविध खेळांचे आयोजन करून मुलांचा उत्साह अधिकच वाढवला. विद्यार्थी दिनाचा कार्यक्रम मुलांच्या हास्य-विनोदाने आणि…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूल पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांना स्वच्छता जनजागृती संदेश देण्यात आला. “स्वच्छ परिसर — सुंदर शहर”रहाटणी येथील वीर संभाजी गार्डन येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा आरोग्य विभाग आणि न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता इंडियन मोहीमेचा उपक्रम राबविण्यात येत आहे. शहराची स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, याची जाणीव करून देण्यासाठी खालील महत्त्वाचे संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत ओला व सुका कचरा वेगळा करा कचरा योग्य पद्धतीने संकलनासाठी द्या रस्ते, परिसर व सार्वजनिक ठिकाणी घाण टाकणे टाळा स्वच्छतेबाबत मुलांमध्ये आणि समाजात जागरूकता…

Read More

राज्याच्या विकास, स्थैर्य आणि भाजपाच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विजयाची मोहोर पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  बिहार निवडणुकीमध्ये येथील नागरिकांनी राज्याचा विकास, स्थिरता आणि मुख्य म्हणजे भाजपच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे. या विजयाचे प्रतिबिंब महाराष्ट्रात देखील उमटणार आहे यात कोणतीही शंका नाही असे मत पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांनी बिहार  निवडणुकीनंतर व्यक्त केले. आजच्या विजयाचे मुख्य कारण सुशासन, लोकांचा प्रचंड विश्वास आणि बिहारमध्ये सुधारलेली कायदा व्यवस्था हेच असू शकते असेही जगताप म्हणाले. बिहार राज्याच्या निवडणुकीमध्ये भाजपा प्रणित एनडीए सरकारला “न भूतो न भविष्यती” असा प्रतिसाद मिळाला आहे. या निर्णयाचे स्वागत पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख आमदार…

Read More

काँग्रेस व मातंग एकता आंदोलनतर्फे कार्यक्रम उत्साहात चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड स्टेशन येथे क्रांतिकारक क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी (अनुसूचित जाती विभाग) आणि मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र संघटना यांच्या वतीने अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमात लहुजी वस्ताद साळवे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास तसेच त्यांचे शिष्य आणि स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व नेतृत्त्व मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्ष हिरामण खवळे, वरिष्ठ उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, ॲड. अनिरुद्ध कांबळे, हर्षद ओव्हाळ, रवी ससाने, विशाल कसबे, युवक काँग्रेसचे प्रवक्ते, शितल कोतवाल,…

Read More

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून केली. या विशेष उपक्रमातून विद्यार्थ्यांनी भारताच्या पहिल्या पंतप्रधानांविषयी आदरभाव व्यक्त केला. कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे संचालक श्री. संदीप काटे यांच्या प्रभावी भाषणाने झाले. आपल्या विस्तृत भाषणात त्यांनी मुलांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यात शिक्षणाचे महत्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की— “मुलंच आपल्या देशाची खरी संपत्ती आहेत. त्यांच्यातील प्रतिभा ओळखून ती योग्य दिशेने फुलवणे ही शाळेची तसेच पालकांची सामूहिक जबाबदारी आहे. पंडित नेहरू यांनी मुलांवर ठेवलेला विश्वास आणि प्रेम आजही आपल्याला नवनव्या कल्पनांची प्रेरणा देते.”…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बोधिसत्व प्रतिष्ठान शिक्षण संस्था संचालित राजर्षी शाहू महाराज विद्यालयामध्ये आज संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष गोकुळजी गायकवाड साहेब व संस्थेचे सचिव  एल.एस. कांबळे  यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित नेहरू जयंती (बालदिन) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक  बाबाजी शिंदे  व प्रमुख पाहुणे म्हणून सृजन अकॅडमीचे संस्थापक  संतोष नांदे  उपस्थित होते. सर्वप्रथम पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अतिशय छान शब्दात आपले मनोगत व्यक्त करताना पंडित नेहरूंच्या राजकीय व सामाजिक जडण घडण व कारकीर्द यावर प्रकाश टाकला. प्रमिथ फाउंडेशनचे मा. थोरात सर यांनी पंडित नेहरू यांचेविषयी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महापालिका दिव्यांग भवन फाउंडेशनच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक योजना राबवत आहे. पण केवळ योजनेतून आर्थिक सहाय्य देण्याऐवजी आपण त्यांना रोजगार देऊन स्वावलंबी बनवणे गरजेचे आहे. दिव्यांगांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे ही प्रशासन आणि समाजाची सामायिक जबाबदारी आहे. संवेदनशीलतेसोबत संधी उपलब्ध झाल्यास दिव्यांग व्यक्तीही अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करू शकतात, असे प्रतिपादन समाजविकास विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे यांनी केले. दिव्यांग भवन येथे ‘सेन्टर ऑफ एक्सलन्स’ अंतर्गत आयोजित दिव्यांग बांधवांच्या रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी महापालिका दिव्यांग कक्षाच्या सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक परेश…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  स्पर्धेच्या काळात युवक, युवती करिअर करण्यासाठी जास्त वेळ घालवत आहेत. उच्च शिक्षण त्यानंतर नोकरी, व्यवसाय यामध्ये लग्नाचे वय वाढत आहे. त्यात वधू, वरांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अपेक्षा जुळणे कठीण होत जाते. कुटुंबसंस्था टिकवण्यासाठी असे वधू, वर परिचय मेळावे हा एक उत्तम पर्याय आहे. खान्देश माळी मंडळ आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले पाहिजे असे माजी महापौर योगेश बहल यांनी सांगितले. खान्देश माळी मंडळ पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित केलेला अखिल माळी समाज २७ वा राज्यव्यापी भव्य वधु, वर, पालक परिचय मेळावा आचार्य अत्रे सभागृह पिंपरी, पुणे येथे संपन्न झाला यावेळी बहल बोलत यांनी मार्गदर्शन…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुका जवळ येताच शहरातील राजकीय वातावरणात चढ-उतार वाढू लागले आहेत. भाजपच्या मजबूत उपस्थितीला रोखण्यासाठी विरोधी पक्षांत दबक्या आवाजात सुरू असलेल्या युती चर्चांना आता उघड रूप मिळू लागले आहे. विशेषतः शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या दोन्ही सत्तारूढ सहयोगींमध्ये स्थानिक पातळीवर नवी समीकरणे जुळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांची अलीकडेच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत प्रभागनिहाय गणित, स्थानिक नेतृत्त्वाची ताकद, परस्पर मतांतरांचा विचार, तसेच निवडणुकीत एकत्रित वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठीचे पर्याय यावर सविस्तर चर्चा झाली. महत्त्वाचे म्हणजे या बैठकीचा सूर पूर्णपणे सकारात्मक होता, अशी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  नुकत्याच पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) दणदणीत विजय मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पार्टी (BJP) पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने आज, शुक्रवार, दिनांक १४ नोव्हेंबर  विजयोत्सव साजरा करण्यात आला. शहर जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा मध्यवर्ती कार्यालय, मोरवाडी, पिंपरी (पुणे -१८) येथे हा जल्लोष सोहळा पार पडला. कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात, घोषणा देत आणि फटाक्यांची आतषबाजी करत विजयाचा आनंद व्यक्त केला. संपूर्ण परिसर भाजपच्या झेंड्यांनी आणि उत्साहाच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून शुभेच्छा दिल्या आणि केंद्र तसेच बिहारमधील नेतृत्वाचे अभिनंदन केले. बिहारमधील या विजयामुळे देशात पुन्हा एकदा पंतप्रधान…

Read More