- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भाजपाच्या संत तुकाराम नगर–कासारवाडी–खराळवाडी मंडळाच्या एस.सी. मोर्चा अध्यक्षपदी निलेश राजू आढाव यांची निवड करण्यात आली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्ष संघटन बळकटीकरणाच्या दृष्टीने ही निवड महत्त्वाची मानली जात आहे. मंडळातील विविध बैठकीत व संवाद उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग, सामाजिक कार्यातील सातत्य आणि समाजातील मागासवर्गीय घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत ही निवड करण्यात आल्याचे कळते. पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने दिलेल्या शिफारशीवर ही नियुक्ती अधिकृत करण्यात आली. निवडीनंतर प्रतिक्रिया देताना निलेश आढाव म्हणाले, “एस.सी. मोर्चा म्हणून समाजातील समस्यांवर प्रभावी आवाज उठवणे, तरुणांना संघटनाशी जोडणे आणि मंडळात BJP च्या विकासाभिमुख धोरणांची प्रभावी अंमलबजावणी हा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सांगवी आणि पिंपळे गुरव परिसरातील उपनगरांमध्ये मोकाट कुत्रे आणि भटक्या जनावरांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गल्ली–बोळ, रस्ते, चौक आणि वसाहतींमध्ये ४ ते १० च्या टोळक्याने फिरणारे कुत्रे व जनावरे नागरिकांना धास्तवू लागले आहेत. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यात भीतीचे सावट निर्माण झाले असून अनेक जण बाहेर पडण्यास घाबरत आहेत. नागरिकांनी हुसकावण्याचा प्रयत्न केला तरी ही मोकाट जनावरे अंगावर धावून येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. परिस्थिती हाताबाहेर जाणार असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संघटनेचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी या गंभीर समस्येकडे…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या प्रतिभा इन्स्टिट्यूट बिझनेस मॅनेजमेंट मधील एमबीए, एमसीएचे विद्यार्थी, प्राध्यापक, सेवक वर्ग मिळून 86 जणांनी उस्फुर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, संचालिका डॉ. तेजल शहा यांच्या मार्गदर्शनाखाली, एमबीएचे संचालक डॉ. सचिन बोरगावे यांनी रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. तसेच डॉ . बोरगांवे आदीच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. त्यावेळी प्रा. मनीष पाटणकर, प्रा. गुरुराज डांगरे, प्रा. अश्विनी जोशी, प्रा. तुलिका चतर्जी , समन्वयक दत्तात्रय येवले, विद्यार्थी प्रतिनिधी कृष्णन पाटील, वैभव महाजन, मोरया ब्लड सेंटरचे डॉ. प्रक्षाली गांधी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे जिल्हा परिषद यांच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय कुराश स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) च्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत २१ सुवर्ण आणि १५ रौप्य पदकांची कमाई केली. सुवर्णपदक पटकावणारे २१ खेळाडूंची विभागीय कुराश स्पर्धेसाठी निवड झाली आहे. एस. बी. पाटील पब्लिक स्कूल, रावेत येथे झालेल्या या जिल्हास्तरीय शालेय कुराश स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेले खेळाडू खालील प्रमाणे – १४ वर्षे वयोगट मधुरेश जावळे, राजवीर अजुरे, आदित्य खाडे, निरंजन भोंडवे, वैदेही निकम, पूर्वी गायकवाड; १७ वर्षे वयोगट – यश भोंडवे, मानस तरस, ओम पाटील,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाइन मधील “मुलधारा हेरिटेज क्लब” च्या सर्व विद्यार्थी सभासदांनी चिंचवड गाव आणि परिसरात हेरिटेज वॉकचे आयोजन केले होते. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. पिंपरी चिंचवड शहराचा धार्मिक आणि आध्यात्मिक वारसा असणारे मोरया गोसावी मंदिर, राम मंदिर, मंगलमुर्ती वाडा, क्रांतिवीर चापेकर वाडा येथे भेट देऊन त्याचे सांस्कृतिक आणि वास्तुशिल्पीय महत्व समजून घेतले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट च्या एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन मधील विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात. त्या अंतर्गत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक वारसा स्थळांना भेट देणे, त्यांची माहिती घेणे, वास्तुशिल्पीय महत्त्व समजून…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘२०४७ मध्ये भारताला विश्ववंदित राष्ट्र करायचे असेल तर संतसाहित्य शिक्षणपद्धतीत येणे गरजेचे आहे!’ असे विचार शिवथरघळ येथील श्री सुंदर मठ सेवा समितीचे विश्वस्त डॉ. विजय लाड यांनी मनोहर सभागृह, ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी प्राधिकरण येथे (शनिवार, दिनांक २२ नोव्हेंबर) व्यक्त केले. प्रकाश उपासनी लिखित, संवेदना प्रकाशन निर्मित आणि मातृमंदिर विश्वस्त संस्था आयोजित ‘आठवणींच्या वाटेवर…’ या आत्मचरित्रपर कादंबरीचे प्रकाशन करताना डॉ. विजय लाड बोलत होते. मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष नितीनभाई कारिआ, कार्यवाह डाॅ. मनोज देवळेकर, उपाध्यक्षा शारदा चोरडिया, उपक्रम संयोजक सुधीर कुलकर्णी, सुभाष देशपांडे, लेखक प्रकाश उपासनी, प्रकाशक नितीन हिरवे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरी स्थानिक संस्था (युएलबी) यांची कार्यक्षमता वाढविणे, संस्थात्मक शिक्षणाला चालना देणे आणि अत्याधुनिक प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनिक अनुभव समृद्ध करण्याच्या उद्देशाने नुकतेच पिंपरी चिंचवड महापालिकेला कोयंबतूर महापालिकेच्या प्रतिनिधींनी भेट दिली. या भेटीद्वारे अधिकाऱ्यांनी वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, वापरलेल्या पाण्याचे व्यवस्थापन आणि स्वच्छता व्यवस्थापनातील ‘ऑपरेशन अँड मेंटेनन्स’ कामकाजाचे व्यापक निरीक्षण केले. कोयंबतूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अनामिका रमेश (भा.प्र.से.), मुख्य अभियंता थिरू विजयकुमार यांच्यासह सदर अभ्यासदौऱ्यात कोयंबतूर महापालिकेच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. या भेटीदरम्यान पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अत्याधुनिक वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या स्थळावर पाहणी करण्यात आली. या प्रकल्पात कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती, संकलन ते विल्हेवाट प्रक्रियेतील यंत्रणा,…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेने सार्वजनिक स्वच्छतेविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाने १ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत विविध नियमभंग करणाऱ्यांकडून एकूण १ लाख ६० हजार ७०० रुपये इतका दंड वसूल केला आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल व आरोग्य कार्यकारी अधिकारी तथा सहा.आयुक्त अमित पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच ‘फ’ क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांच्या अधिपत्याखाली ही कारवाई राबवण्यात आली. शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी करण्याच्या दिशेने महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. नागरिकांनी कचरा विलगीकरणाबाबत…
पाणी व्यवस्थापन आणि नदी सुधारवर “फोकस” – शंकर जगताप थेरगावातील कार्यकर्ता मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या राजकीय जीवनाचा प्रवास 2007 पासून सुरू झाला . त्यानंतर अनेक जबाबदाऱ्या खांद्यावर पडत गेल्या. या जबाबदाऱ्यांना कार्यकर्त्यांचे पाठबळ मिळाले. तुम्ही सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत काम केले. माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात . यामुळे प्रत्येक संघर्षाच्या प्रसंगी खंबीरपणे उभा राहिलो . याच कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी महापालिका निवडणुकीमध्ये ”अब की बार 100 पार” हा नारा आपल्याला पूर्ण करायचा आहे असा निर्धार थेरगाव येथील कार्यकर्ता मेळाव्यात पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख तथा आमदार शंकर जगताप यांनी केला. थेरगावच्या याच व्यासपीठावर…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवडमध्ये नोव्हेंबर महिन्याचे रेशन धान्य तब्बल वीस दिवस उशिरा पोहोचले. त्यातही नागरिकांना मिळणारी ज्वारी निकृष्ट, बुरशीदार आणि पावडरसारखी असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अनेक दुकानांत आलेल्या ज्वारीत सोनकिडे, बुरशी तसेच हाताने शिवलेल्या पोत्यांची पॅकिंग दिसत असल्याने लाभार्थ्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. सामाजिक संघटनांनी “निकृष्ट धान्य खरेदीस कोण जबाबदार?” असा सवाल उपस्थित केला आहे. दुकानदारांवर दुहेरी संकट उशिरा आलेले धान्य आणि त्यातही खराब ज्वारी यामुळे रेशन दुकानदार अडचणीत आले आहेत. लाभार्थ्यांनी थेट दुकानदारांकडे नाराजी व्यक्त केल्याने अनेक ठिकाणी वाद निर्माण झाले. भोसरी (फ) विभागात धान्य सर्वाधिक उशिरा पोहोचल्याचे समजते. शहरातील तिन्ही पुरवठा विभागांत मिळून ४,९३,८७३ लाभार्थी आहेत,…
