- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पुणे (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘ज्यांनी गायीचा प्रतिपाळ केला, त्यांना दुधासह आयुर्वेदिक महत्त्व असलेले पंचगव्य देणारी गाय ही सामाजिक समरसतेचे प्रतीक आहे!’ असे विचार विश्व हिंदू परिषद मुंबई व कर्णावती क्षेत्र गोरक्षा प्रमुख भाऊराव कुदळे यांनी वीर बाजी पासलकर सभागृह, सिंहगड रोड येथे (मंगळवार, दिनांक ०२ डिसेंबर) व्यक्त केले. विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत गोरक्षा एवंम गोसंरक्षण, सेवा, समरसता व धर्मप्रसार या आयामामधील जिल्हा प्रमुख आणि जिल्हा सहमंत्री यांच्यासह कात्रज, सिंहगड, पर्वती आणि विद्यापीठ भागातील सामाजिक पुंजातील सेवा, समरसता, गोरक्षा एवंम गोसंरक्षण, धर्मप्रसार व प्रसार या आयामाचे पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना भाऊराव कुदळे बोलत होते. याप्रसंगी विश्व हिंदू परिषद…
कासारवाडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कासारवाडी येथील पार्श्वनाथ युवक मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्व.प्रा. प्रकाश पगारिया यांच्या 41 व्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन आधार ब्लड बँकेचे जनसंपर्क प्रमुख मकरंद शापुरकर यांच्या सहकार्याने आयोजित केले गेले.मंडळाच्या या 41 व्या रक्तदान शिबिरामध्ये आज दिनांक एक डिसेंबर रोजी 53 जणांनी रक्तदान केले. पार्श्वनाथ युवक मंडळाच्या वतीने गेली 41 वर्षे सातत्याने ह्या दिवशी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते.मंडळाकडे सुमारे 3500रक्तदात्यांची सुची असून अनेक गरजुंना मोफत रक्त दिले जाते. रक्तदान शिबीराच्या आयोजनासाठी युवक मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते श्रेयस पगारिया, पंकज कांकरिया , श्रेणिक मंडलेचा, राहुल, कल्पेश,मयुर ,विपुल पगारिया , प्रशांत बाफना, रोहन बोरा आदिंनी परिश्रम…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)ने अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध कडक भूमिका घेतली आहे. नियमबाह्यपणे सुरू असलेल्या रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लॅन्टविरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, या कारवाईची सुरुवात मुळशी तालुक्यातील मौजे जांबे येथील ‘मिलेनियम आरएमसी प्लॅन्ट’वर धडक कारवाई करून झाली. पीएमआरडीएच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने १ डिसेंबर २०२५ रोजी या अनधिकृत प्लॅन्टवर कारवाई करताना पोकलेन मशीनच्या सहाय्याने प्लॅन्टचे लोखंडी पत्राशेड व आरसीसी वॉल तोडले. त्यानंतर संपूर्ण प्लॅन्ट सीलबंद करण्यात आला. परवानगीशिवाय हा प्लॅन्ट पुन्हा सुरू केल्यास महाराष्ट्र प्रादेशिक व नगर नियोजन अधिनियम 1966 (एमआरटीपी) अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी कडक ताकीद मिलेनियम…
आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात ७५ टक्के मतदान झाल्याचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले. आळंदी नगरपरिषदेच्या वतीने प्रभाग क्रमांक १ ते १० मध्ये नगराध्यक्ष पदासह २१ सदस्य निवडण्यासाठी मतदान उत्साहात झाले. आळंदी नगरपरिषदेने मतदारांसाठी विविध सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मतदारांचे स्वागत करण्यात आले. १८ वय वर्षावरील नवमतदारांसह ९४ वर्षे वयोवृद्ध जेष्ठ नागरिक, महिला, पुरुष, दिव्यांग बांधव यांनी देखील मतदान करीत लोकशाहीचे उत्सवात आपला सहभाग दाखविला. सेल्फी घेत नवमतदारानी मतदान केल्याचा संदेश देत इतरांनी मतदान करण्याचे आवाहन केले. आळंदी शहरातील १० प्रभागातील मतदानासाठी ३० मतदान केंद्र तैनात करण्यात आली…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंजवडी आयटी पार्क परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. भरधाव बस थेट फुटपाथवर चढली आणि पायी जाणाऱ्या नागरिकांना जोराची धडक दिली. या दुर्घटनेत दोन लहानग्या शाळकरी भावंडांचा मृत्यू झाला असून काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये अर्चना देवा प्रसाद (वय ८), सूरज देवा प्रसाद (वय ६) तर गंभीर जखमींमध्ये प्रिया देवा प्रसाद (वय १८) आणि पादचारी अविनाश चव्हाण यांचा समावेश आहे. बसमधील काही प्रवासीही किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वाकड या रस्त्यावर झाला. आयटी कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी ही बस भरधाव वेगात असताना चालक मद्यधुंद…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी–चिंचवड शहराच्या संघटनात्मक बांधणीसाठी करण्यात आलेल्या नव्या नियुक्त्यांमध्ये प्रणव प्रकाश यादव यांची शहर उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनिमित्त भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष दिनेश लालचंद यादव आणि भाजपा पिंपरी–चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या प्रसंगी प्रदेश महामंत्री प्रमोद परदेशी,विधी आघाडीचे अॅड. विशाल डोंगरे, तसेच अॅड. नवनाथ जगताप आदी उपस्थित होते. पक्षामधील विविध सामाजिक उपक्रम, युवा संपर्क, जनसेवा आणि संघटनात्मक कार्यामध्ये प्रणव यादव यांनी दाखविलेल्या कार्यतत्परतेची दखल घेऊन ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना प्रणव यादव म्हणाले— “पक्ष…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने बुधवार (३ डिसेंबर) रोजी ‘जागतिक दिव्यांग दिन’ साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त समाज विकास विभागाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी नवीन योजनांचे उद्घाटन व विविध उपक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी ११ ते सायंकाळी ७ दरम्यान या कार्यक्रमात दिव्यांगांसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या सामाजिक संस्था तसेच विशेष प्राविण्य प्राप्त दिव्यांग नागरिक व विद्यार्थी यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती समाज विकास विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे यांनी दिली. महापालिकेच्या अतिरिक्त…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘डॉ. आनंद यादव यांनी ग्रामीण वास्तव आपल्या साहित्यातून साकारले!’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अश्विनी धोंगडे यांनी स निगडी प्राधिकरण येथे (रविवार, दिनांक ३० नोव्हेंबर) व्यक्त केले. समरसता साहित्य परिषद आणि डॉ. आनंद यादव अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आनंदयात्री’ या डॉ. आनंद यादव यांच्या ९०व्या जन्मदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. अश्विनी धोंगडे बोलत होत्या. ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री गिरीश प्रभुणे, लेखिका प्रा. डॉ. कीर्ती मुळीक, ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक हरिहर कुलकर्णी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती; तसेच पिंपरी – चिंचवड परिसरातील साहित्यिक आणि अन्य मान्यवरांची सभागृहात उपस्थित होती. डॉ. अश्विनी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील सोसायटी धारकांसाठी चिखली मोशी चरोली पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन यांनी रविवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सहकार संवादा कार्यक्रम आयोजित केला होता. सदर कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड शहरातील सोसायट्यांमधील 3 हजार पेक्षा अधिक कार्यकारी मंडळातील सदस्य त्याचप्रमाणे सोसायटी सभासद उपस्थित होते. सदर सहकार समाज कार्यक्रमामध्ये सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी सोसायटी फेडरेशनच्या स्थापने मागील भूमिका स्पष्ट केली. त्याचप्रमाणे आजपर्यंत मागील दहा वर्षांमध्ये सोसायटी फेडरेशनने केलेल्या कामाबद्दल माहिती सांगितली. त्यामध्ये सोसायट्यांना मूलभूत लागणारे पाणी उपलब्ध करून दिले. सोसायटीधारकांच्यावर लागलेले उपयोगकर्ता शुल्क स्थानिक आमदार महेश लांडगे यांच्याकडे पाठपुरावा करून महापालिका प्रशासनाबरोबर समन्वय साधून…
पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोडवरील रेस्टॉरंटला भीषण आग पिंपळे सौदागर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोडवरील ‘हॉटेल रंगला पंजाब’ च्या खालच्या मजल्यावर सोमवारी अचानक लागलेल्या आगीने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीचा धूर वरच्या मजल्यावरील कोचिंग क्लासपर्यंत पोहोचताच विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला. घटनास्थळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली असताना भाजपचे युवा नेते संदीप काटे यांनी कार्यकर्त्यांसह तातडीने धाव घेतली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे हे देखील उपस्थित होते. घटनेची माहिती मिळाल्यावर काटे यांनी रहाटणी अग्निशामक विभागाशी तत्काळ संपर्क साधून टीमला घटनास्थळी पाठवले. स्थानिक असल्यामुळे त्यांनी स्वतः यंत्रणांचा समन्वय साधत विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मदत केली. अल्पावधीतच अग्निशामक…
