- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “क्लार्क पासून न्यायाधीश” हा विलक्षण प्रवास फक्त ऐकण्यास प्रेरणादायी नाही, तर संघर्षासमोर डगमगणाऱ्यांसाठी एक जिवंत उदाहरण ठरावा अशी कहाणी आहे अॅडव्होकेट राज नलगे यांची. मुंबई उच्च न्यायालयामार्फत घेण्यात आलेल्या न्यायाधीश परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात राज्यात सर्वाधिक गुण मिळवत ‘प्रथम क्रमांक’ पटकावण्याचा पराक्रम त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे सर्वात कमी वयात जिल्हा न्यायाधीश म्हणून निवड होणारे ते पहिलेच तरुण वकील ठरले आहेत. नलगे यांचा प्रवास संघर्षमय. आर्थिक संकटातही शिक्षणाची सांगड घालत त्यांनी वकिलाच्या क्लार्क म्हणून सुरू केलेले करिअर हळूहळू पुढे सरकवत न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च मार्गावर झेप घेतली. “संघर्षासमोर यश नतमस्तक होते” हे त्यांचे जीवनसूत्र जणू वास्तवात उतरले आहे.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने आज विविध कष्टकरी दिव्यांग बांधवांना भेटून कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी मनापासून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मनपा समिती सदस्य किरण साडेकर,सामाजिक कार्यकर्ते नाना कसबे,ओमप्रकाश मोरया,लाला राठोड आधी उपस्थित होते. दिव्यांग बांधवांची जिद्द संघर्ष,आणि आत्मविश्वासाला मनापासून सलाम करतो. समाजातील प्रत्येक दिव्यांग बांधव हा प्रेरणेचा स्रोत आहे. त्यांच्या हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि समान संधींसाठी आपण सर्वांनी एकत्र येऊ असे मत नखाते यांनी व्यक्त केले.
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)-‘जुने आदर्श घेऊनच नवी पिढी पुढे जाईल,मात्र आधीच्या पिढीने,संवादाची दारे उघडी ठेवावी’ असे आवाहन,माध्यम तज्ञ भारत पाटील केले. तरुणांमधील वाढती बेकारी,व्यसनाधीनता आणि उद्रेक या विषयावर ते फुले -आंबेडकर व्याख्यानमालेत बोलत होते.अध्यक्षस्थानी कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते होते. पुढे बोलताना भारत पाटील यांनी. व्यसनाची व्याख्या बदलली असून,मोबाईल हे नवे व्यसन असून,त्या उद्योगाचेही केंद्रीकरण होत असल्याचे,निदर्शनास आणून दिले.त्यावर लक्ष जाऊ नये म्हणून,जातीजातीत भांडणे लावून दिली आहेत.कोवळी मुले भक्ष्यस्थानी पडत आहेत.याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.उच्च शिक्षणात कमालीची,घट झाली आहे.दहावी,बारावीनंतर विद्यार्थी,शाळा सोडल्याचा दाखला, आणायला देखील जात नसल्याचे सांगितले.मन उध्वस्त होत आहे.रिकामे हात,रिकामे मेंदू यामुळे नवी पिढी व्यसनाधीन होत आहे,त्यातून उद्रेक…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दापोडी येथील सामाजिक कार्यकर्त्या दुर्गाताई निरंजन ठोकळ व सनराईस मेडिकल फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाआरोग्य सेवा शिबिर शनिवारी (दि. २९ नोव्हेंबर) यशस्वीपणे पार पडले. दापोडी परिसरातील सुमारे ५ हजारांहून अधिक नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवत शिबिराचा लाभ घेतला. या एकदिवसीय शिबिरात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील २५ हून अधिक नामांकित रुग्णालयांनी सहभाग घेतला होता. या शिबिरात १२० दिव्यांग बांधवांना आवश्यक साहित्य आणि २,६७४ चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तसेच, १६० रुग्णांची डोळ्यांच्या मोफत शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करण्यात आली. याशिवाय, २३६ रुग्णांची जनरल शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी आणि इतर शस्त्रक्रियांसाठी नोंदणी झाली असून, त्यांना पुढील उपचारांसाठी संबंधित रुग्णालयात दाखल…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “पिंपरी चिंचवड वैभव” काव्यसंग्रहाचे प्रकाशन आज बुधवारी (दि.३ डिसेंबर) सायं. ५ वाजता, आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृह(लहान हॉल), येथे प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, पद्मश्री गिरीश प्रभुणे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, संस्थेचे अध्यक्ष व संपादक राजन लाखे आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती या काव्य संग्रहाची संकल्पना मांडणारे ज्येष्ठ साहित्यिक संभाजी बारणे यांनी प्रसिद्धीस दिली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर आलेल्या हरकती व सूचना तात्काळ निकाली काढा, असे निर्देश आयुक्त श्रावण हार्डिकर यांनी दिले आहेत. महापालिकेतील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत माजी महापौर मधूकर पवळे सभागृहात आज प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचना यासह मतदान केंद्र निश्चिती, दुबार मतदार यादी आदी कामकाजाबाबत आढावा बैठक आयुक्त हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, नगर सचिव मुकेश कोळप, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, सहाय्यक संचालक नगररचना प्रशांत शिंपी, महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, डॉ. प्रदीप…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ब क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्रमांक १६ येथील किवळे भागातील शुभारंभ क्लारा कन्स्ट्रक्शन साईटवर बांधकाम राडारोडा व्यवस्थापन व कामगार सुरक्षा या दोन महत्त्वपूर्ण विषयांवर जनजागृती करण्यात आली. महापालिका अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली व आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या अधिपत्याखाली हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवड शहरात बांधकामातून निर्माण होणारा राडारोडा उघड्यावर टाकू नये, तो महापालिकेच्या राडारोडा प्रकल्पात जमा करावा, याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. महापालिकेने राडारोडा संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करून दिली असून नागरिक व बांधकाम व्यावसायिकांनी १८००१२०३३२१२६ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधून बांधकाम राडारोडा संकलनासाठी संपर्क करावा, असे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी, आकुर्डी प्राधिकरण परिसरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने हरित सेतू प्रकल्पाअंतर्गत विविध विकास कामे सुरू आहेत. या प्रकल्पामुळे अनेक वर्षांपासून वाढवलेले देशी वृक्ष तोडण्यात येतील. त्यामुळे पर्यावरणाची हानी होईल. सर्व रस्ते छोटे करून पदपथ मोठे केले जात आहेत. यामुळे वाहतूक कोंडी होऊन अनेक समस्या निर्माण होतील व अपघात होण्याची शक्यता आहे. हा हरीत सेतू प्रकल्प रद्द करावा, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी “निगडी प्राधिकरण रेसिडेंट फोरम फाउंडेशन” (एनपीआरएफ फाउंडेशन) या संस्थेच्या वतीने बुधवारी (दि.३ डिसेंबर), सायंकाळी पाच वाजता, हुतात्मा चौक, आनंद हॉस्पिटल जवळ, निगडी प्राधिकरण सेक्टर २६, २७ येथे तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, या आंदोलनात परिसरातील…
कामगार-विरोधी नवे ४ कामगार कायदे तात्काळ रद्द करण्याची मागणी – इंटकचे प्रदेशाध्यक्ष डॉ. कैलास कदम पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशातील कामगारांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे केंद्र सरकारचे नवे ४ कामगार कायदे (Labour Codes) तात्काळ रद्द करण्यात यावेत, अशी ठाम मागणी इंटकचे प्रदेशाध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी पिंपरी चौक येथे झालेल्या साखळी आंदोलनादरम्यान केली. या कायद्यांमुळे रोजगार सुरक्षा, वेतन संरक्षण, आरोग्य–सुरक्षा आणि संघटन स्वातंत्र्य धोक्यात येत असल्याचा आरोप इंटकतर्फे करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. कदम म्हणाले, “सरकारने विद्यमान २९ कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करून ४ नवे कोड लागू करण्याची घोषणा केली असून, १ डिसेंबर २०२५ पासून त्यांची अंमलबजावणी करण्याचे संकेत दिले…
वाकड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाकड, पेठ क्र. ३८/३९ मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभा २०२४ च्या प्रचारादरम्यान वाकड ,कस्पटे वस्ती येथील ग्राउंडवर उपस्थित राहून स्थानिक नागरिकांना विकासाचे ठोस आश्वासन दिले होते. या ठिकाणी विरंगुळा केंद्र, खेळाचे मैदान, उद्यान हेही होणार होते . या बहुमुल्य भूखंडावर नागरिकांसाठी सुविधा निर्माण करण्याचे आश्वासन देत जनतेचा विश्वास संपादित केला होता.परंतु सत्ता मिळाल्यानंतर सरकारने आपला शब्द मोडत हा भूखंड थेट बिल्डरच्या हवाली केल्याचे निदर्शनास आले.कस्पटे वस्ती,वाकड परिसरात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. सार्वजनिक हिताचे रक्षण करण्याऐवजी खासगी गटांना लाभ देणारा हा निर्णय स्थानिक जनतेच्या भावनांवर आघात करणारा असल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर कस्पटे वस्ती,वाकडमधील…
