- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नावीन्य, संशोधन आणि भावी काळासाठी सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठ, पुणे आणि फिलिप्स इंडिया यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला. उद्योग–विद्यापीठ सहकार्य बळकट करण्याच्या दृष्टीने हा करार एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या करारांतर्गत एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट’ हा विषय संरचित पद्धतीने समाविष्ट करण्यात येणार असून फिलिप्सच्या तज्ज्ञांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योग-अनुभव, तज्ज्ञ व्याख्याने, उद्योगभेटी आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील. या करारावर स्वाक्षऱ्या करण्यासाठी फिलिप्स इंडियाकडून विस्पी काकारीयल, आशिष शाह आणि चेतन लोणकर उपस्थित होते. तर विद्यापीठाकडून कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून,याद्वारे प्रतिज्ञा करतो की,आम्ही आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निःपक्षपाती आणि शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता, किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू,” अशी शपथ दिव्यांग बांधवांनी अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप व्यवस्थापन प्रमुख तृप्ती सांडभोर यांच्या उपस्थितीत घेऊन येत्या महानगरपालिका निवडणुकीत १०० टक्के मतदान करण्याचा निर्धार केला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त समाज विकास विभागाच्या दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात…
– महानगरपालिका निवडणुकीसाठी पिंपळे-सौदागर येथे महत्वपूर्ण बैठक पिंपर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना अपेक्षित विकासकामांसाठी किंवा सुधारणांसाठी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधा आणि योग्य सूचना संकलित करून लोककेंद्रीत जाहीरनामा तयार करा. भाजपा सत्ताकाळात केलेली विकासकामे आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प घराघरात पोहोचतील, असे नियोजन करा, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहरातील पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व लोकप्रतिनिधी, माजी खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकारी यांची राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, शहराध्यक्ष…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट्स, चिंचवड यांच्या वतीने संस्थेच्या 19 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत तीन दिवसीय “ प्रतिभा सृजन व्याख्यानमाला -2025”* दिनांक सात ते नऊ डिसेंबर या कालावधीत संध्याकाळी पाच ते सात वाजता चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयाच्या प्रागंणात आयोजित केली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञ, विचारवंत, उद्योगपती, कला व साहित्य क्षेत्रातील अग्रणी व्यक्तींची व्याख्याने या व्याख्यानमालेतून विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना प्रेरणा देणार आहेत. प्रतिभा सृजन व्याख्यानमालेचे पहिले पुष्प दि. 7 ,रोजी दीपस्तंभ फाउंडेशन चे संपादक संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांचे ‘याला जीवन ऐसे नाव’ या विषयावर व्याख्यान देऊन गुंफणार आहेत. दिनांक आठ रोजी प्रेरक वक्ते…
पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर परिसरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्रभाग क्रमांक २८ मधील कुणाल आयकॉन रोडचे कॉंक्रिटिकरण आणि रुंदीकरणाचे काम सुरू असून काही भागात हे काम वेगाने सुरू आहे, तर अनेक ठिकाणी अत्यंत संथगतीने सुरू असल्याने नागरिकांचा त्रास वाढला आहे. रस्त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. याचबरोबर रस्त्यालगतच्या सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना उड्डाणाऱ्या धुळीपासून, उखडलेल्या रस्त्यापासून आणि वळण रस्त्यांमुळे सतत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. स्मार्ट सिटी, महापालिका, महावितरण आणि गॅस कंपन्या यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे कामाचा वेग मंदावल्याचे समजते. कुणाल आयकॉन रोड हा परिसरातील वाढती लोकसंख्या आणि वाढत्या वाहतूकीमुळे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्यांवर नागरिकांचा अक्षरशः आक्रोश उसळला आहे. बुधवारी मुदतीच्या अखेरच्या दिवशी तब्बल ३,२१६ हरकती, तर एकूण १०,२८८ हरकती व सूचनांचा पाऊस प्रशासनावर पडला आहे. २०१७ च्या निवडणुकीच्या तुलनेत १४ पट अधिक हरकती दाखल होत असल्याने मतदार याद्यांतील गोंधळाचे राजकारण चांगलेच तापले आहे. शहरातील चार विधानसभा मतदारसंघांमधील मिळून १७ लाख १३ हजार ८९१ मतदारांच्या याद्या विधानसभेच्या आकडेवारीवर आधारित तयार करण्यात आल्या. चिंचवड मतदारसंघातील सर्वाधिक ६.७६ लाख, तर भोसरीतील ६.२४ लाख, पिंपरीतील ३.९९ लाख, तसेच भोर मतदारसंघातील ताथवडे परिसरातील १३ हजारांहून अधिक मतदारांचा समावेश करण्यात आला. २० नोव्हेंबरला…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “हरित सेतू हटाव प्राधिकरण बचाव” अशा घोषणा देत निगडी, आकुर्डी प्राधिकरण मधील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मनपा प्रशासनाच्या मनमानी कारभारा विरोधात आंदोलन करून रास्ता रोको केला. निगडी, आकुर्डी प्राधिकरण परिसरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने हरित सेतू प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पामुळे अनेक वर्षांपासून वाढलेले देशी वृक्ष तोडण्यात येतील. त्यामुळे पर्यावरणाची हानी होईल. सर्व रस्ते छोटे करून पदपथ मोठे केले जात आहेत. यामुळे वाहतूक कोंडी होऊन अनेक समस्या निर्माण होतील व अपघात होण्याची शक्यता आहे. हा हरीत सेतू प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा यासाठी “निगडी प्राधिकरण रेसिडेंट फोरम फाउंडेशन” (एनपीआरएफ फाउंडेशन) या संस्थेच्या वतीने बुधवारी (दि.३ डिसेंबर), सायंकाळी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दापोडी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, रहाटणी, पिंपळे निलख आणि वाकड परिसरात झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, उंच इमारतींचा सुळसुळाट आणि वाहतूक कोंडीमुळे आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन सेवेचा विलंब होऊन नागरिकांचे जीवित सुरक्षा धोक्यात येत आहे. तरी तातडीने मनपा फायर स्टेशन उभारा अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्तांकडे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दापोडी, पिंपळे गुरव, नवी सांगवी, पिंपळे सौदागर, रहाटणी, पिंपळे निलख, वाकड आणि संलग्न परिसरातील वेगाने वाढणारी लोकसंख्या, उंच इमारतींचे साम्राज्य, व्यावसायिक केंद्रांची घनता आणि वाहतूक कोंडी यामुळे हा पट्टा आता उच्च-जोखमीचा झोन बनला आहे. अशा परिस्थितीत येथे मनपा अग्निशमन केंद्राची तातडीने…
चिंचवडमध्ये संगीत आणि भक्तीच्या मिलाफाने ६ ते १० डिसेंबर दरम्यान रंगणार ४६४ वा मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळा डॉ. प्रमोद चौधरी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, पं. भुवनेश्वर कोमकली, संकर्षण, स्पृहा, योगेश सोमण यंदाचे आकर्षण चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री मयुरेश्वर अवतार श्रीमंत महासाधू श्री मोरया गोसावी महाराजांच्या ४६४ व्या संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन यंदा ६ ते १० डिसेंबर २०२५ दरम्यान संजीवन समाधी मंदिर आणि श्री मंगलमूर्ती वाडा, चिंचवड येथे भव्य उत्साहात करण्यात आले आहे. यंदाच्या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे ‘इथेनॉल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉ. प्रमोद चौधरी यांना ‘श्री मोरया गोसावी महाराज…
कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तींना तीनचाकी ई वाहनाचे वितरण पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिव्यांग नागरिकांना सबलीकरण, स्वावलंबन आणि सन्मानाची वागणूक देण्याचे काम पिंपरी चिंचवड महानगरपालिका करत आहे. समाज विकास विभागाच्या वतीने दिव्यांग कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांद्वारे त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्याचे काम सुरू आहे. कौशल्य प्रशिक्षण, रोजगार संधी, शिक्षण-सुविधा आणि पथदर्शी कल्पनांमुळे दिव्यांग बांधवांचा आत्मविश्वास अधिक दृढ होत आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली समाज विकास विभागाच्या वतीने दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या माध्यमातून चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दिव्यांग बांधवांसाठी आयोजित कार्यक्रमात नवीन योजनांचे…
