- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत बेल्जियममधील ल्यूव्हेन शहरातील इंडिया हाऊस, ल्यूव्हेन चे संचालक गीर्ट रोबरेख्त्स यांनी ३ आणि ४ डिसेंबर रोजी दोन दिवसीय भेट देत महापालिकेच्या विविध विभागांशी चर्चा केली. शाश्वत विकास, नवोपक्रम, उद्योग क्षेत्र आणि शहरी गतिशीलता या क्षेत्रांमध्ये महानगरपालिका आणि ल्यूव्हेन शहर यांच्यातील भविष्यातील सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा ठरला. या भेटीदरम्यान रोबरेख्त्स यांनी महापालिकेचे मुख्य अभियंता आणि पर्यावरण विभाग प्रमुख संजय कुलकर्णी व सहशहर अभियंता व शहरी दळण वळण विभाग प्रमुख बापूसाहेब गायकवाड, ऑटो क्लस्टर व पीसीएसआयसी चे व्यवस्थापकीय संचालक किरण वैद्य, इंडस्ट्री फॅसिलिटेशन सेलचे प्रतिनिधी विजय वावरे, सीएसआर सेल प्रतिनिधी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अलिबाग ते श्री क्षेत्र नारायणपूर पायी दिंडी सोहळ्यात आलेल्या भाविकांचे मराठवाडा जनविकास संघाच्यावतीने अरुण एस. पवार आणि बालाजी एस. पवार यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांना थंडीपासून संरक्षणासाठी ब्लॅंकेट , फळे वाटप करण्यात आले. यावेळी जीएसटी आयुक्त डी.बी. घोडे, पुनाजी रोकडे, पी. एन. कांबळे, कृष्णा भालचिम, ह.भ.प. लक्ष्मण पवार, महादेव सुतार, ह भ प सूर्यकांत कुरुलकर स्वामी , वामन भरगंडे, दत्तात्रय धोंडगे, बळीराम माळी, दिनेश पवार, भीमाशंकर भोसले, किशोर अट्टरगेकर, सखाराम वालकोळी, गोविंद तांबवडे, सुग्रीव पाटील, रंगनाथ आवारे, लक्ष्मण जाधव, संतोष लातूरे, गोपाळ कांबळे, चंद्रकांत रासकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना गोपाळ कांबळे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांना गती देण्यासाठी भाजपा महायुती सरकारने प्राधान्य दिले. त्यामुळे सरसकट शास्तीकर माफीपासून आंद्रा- भामा आसखेड सारखी जलसंजीवनी देणारी योजनापर्यंत पिंपरी-चिंचवडकरांच्या हक्कांना न्याय मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आता शहर ‘‘शाश्वत विकासाचाच्या दिशेने’’ वाटचाल करीत आहे. नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवडकरांची भूमिका सभागृहात मांडणार आहे. त्यासाठी विविध 15 मुद्यांवर आम्ही तयारी केली आहे, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर 2025 पासून नागपूरात सुरू होत असून, भाजपा आमदार महेश लांडगे यांनी अधिवेशनासाठी तयारी केली आहे. विकासकामांना गती, वाहतूक…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे गुरव येथील कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान व महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ पिंपरी चिंचवड यांच्या वतीने जगदगुरू व्दाराचार्य विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ६ डिसेंबर रोजी अभिष्टचिंतन सोहळा, तसेच कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य अशा ७५ महाराजांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा सत्कार समारंभ नवी सांगवीतील संस्कृती लॉन्स येथे सकाळी ९ वाजता संपन्न होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे शहराध्यक्ष विजूअण्णा जगताप, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, गणेश सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष संजय जगताप, गो सेवक विजय जगताप यांनी दिली. कार्यक्रमाचे उदघाट्न जगतगुरु श्रीमद् शंकराचार्य स्वामी विद्यानृसिंह भारतीजी महाराज (करवीर पीठाधिश्वर)…
आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी येथे ५, ६ आणि ७ डिसेंबर २०२५ रोजी होणारे ‘बाबानकशी’ प्रदर्शन हे महिला गृहिणी आणि महिला उद्योजकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांना, हस्तकला, फूड प्रॉडक्ट्स, बुटीक, कला व उद्योजकतेला वाव देऊ इच्छिणाऱ्या महिलांसाठी हे व्यासपीठ एक उत्तम संधी आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून महिलांना— ✔️ स्वतःच्या उत्पादन व कलेचा थेट प्रचार ✔️ ग्राहकांपर्यंत थेट पोहोच ✔️ व्यवसाय विस्तारासाठी उपयुक्त संपर्क ✔️ प्रेरणादायी वातावरणात नवीन संधी ✔️ स्वावलंबनाचा मार्ग अधिक मजबूत करण्याची संधी अशा अनेक सुविधा लाभणार आहेत. घे भरारीने आजवर केलेल्या यशस्वी प्रदर्शनांमुळे अनेक महिलांचे छोटे-मोठे व्यवसाय पुढे आले…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक १० मध्ये दत्तजयंतीच्या पार्श्वभूमीवर धार्मिक भेटींच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवण्याची राजकीय मोहीम सुरू करत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे इच्छुक दत्तात्रय भालेराव सर पुन्हा एकदा प्रभागाच्या राजकीय केंद्रस्थानी आले आहेत. मोरवाडी, इंदिरानगर, शाहूनगर येथील विविध दत्त मंदिरांना दिलेल्या भेटीमध्ये त्यांनी दत्तभक्तांसोबत संवाद साधत सदिच्छा व्यक्त केल्या आणि स्थानिक प्रश्नांची माहिती घेतली. दत्तजयंतीनिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमांना हजेरी लावत दत्तात्रय भालेराव सर यांनी पूजा अर्चा करून प्रभागातील शांतता, सौहार्द आणि विकासासाठी प्रार्थना केली. या भेटीदरम्यान स्थानिक कार्यकर्ते, महिला मंडळे, युवक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. धार्मिक वातावरणात राजकीय संवादाची जोड देत…
आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी २० किंवा २२ डिसेंबरला आचारसंहिता लागेल, असा दावा भाजप नेते, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. इतर पक्षातील शहरातील जे माजी नगरसेवक भाजपमध्ये येऊ इच्छित आहेत. त्यांच्या नावावर अगोदर स्थानिक गाभा समितीचे (कोअर कमिटी) एकमत होईल. त्यांचे एकमत झालेली नावे पुढे प्रदेशकडे पाठवली जातील. तशी नावे काढण्याचे काम सुरु असल्याचेही चंद्रकांत पाटील सांगितले. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांची गुरुवारी पिंपळेसौदागर येथे बैठक घेतली. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, महापालिका निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, उमा खापरे, अमित गोरखे, प्रदेश सचिव राजेश पांडे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘पिंपरी चिंचवड वैभव’ या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून मांडण्यात आलेला शहराचा पद्यरूप इतिहास ही अतिशय अभिनव संकल्पना आहे!’ असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर (छोटे सभागृह) प्रेक्षागृह येथे बुधवार, दिनांक ०३ डिसेंबर २०२५ रोजी काढले. महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा आणि मराठी भाषा संवर्धन समिती, पिंपरी-चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पिंपरी चिंचवड वैभव’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना वर्षा उसगावकर बोलत होत्या. अखिल भारतीय मराठी महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी हे अध्यक्षस्थानी होते; तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे, शिक्षणतज्ज्ञ डॉ.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- औद्योगिकनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून वाहनांच्या संख्येतही भर पडत आहे. वाढत्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीत भर पडते. त्यासाठी शहरात मेट्रोचे जाळे विस्तारणे गरजेचे आहे. त्यासाठी किवळे- रावेत – डांगे चौक – काळेवाडी – जगताप डेअरी ते चतुर्श्रुंगी असा नवीन मेट्रो मार्ग तयार करावा. त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपी) तयार करावा, अशी मागणी शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय शहरी विकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांची दिल्लीत भेट घेतली. पिंपरी-चिंचवड शहरात नवीन मेट्रो मार्गाची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्याबाबतचे सविस्तर निवेदन दिले. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील लघुउद्योगांना बळ देण्यासाठी आणि त्यांच्या स्पर्धात्मकतेत वाढ करण्याच्या दृष्टीने एमएसएमई–डीएफओ मुंबईच्या वतीने ‘एमएसएमई संवाद – भारतातील एमएसएमईच्या खर्च आणि स्पर्धात्मकतेवर’ विभागीय परिषद (Zonal Conference) सोमवार, दि. ८ डिसेंबर २०२५ रोजी पुण्यात आयोजित केली आहे. पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेतर्फे सर्व लघुउद्योजकांना या परिषदेत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. भोसरी येथील क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटर प्लॉट नं. जे/पी–10, निगडी–भोसरी रोड, गणेश नगर, जे ब्लॉक, एमआयडीसी, भोसरी याठिकाणी सोमवारी ८ डिसेंबरला सकाळी दहा वाजता ही परिषद होणार आहे. अधिक माहितीसाठी. एन. एन.इस्तोलकर,संयुक्त संचालक (IEDS) – 9768686250 अभय दप्तदार,सहाय्यक संचालक–गट 1 (CDO) –…
