Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कष्‍टकऱ्यांचे नेते डॉ. बाबासाहेब कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्‍या विविध कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी उपक्रमांची आवश्यकता असभ्‍याचे मत योगेश बहल यांनी व्‍यक्‍त केले. तर ‘महिलांचे सक्षमीकरण म्हणजे सामाजिक प्रगती’ अशी भावना डॉ. बाबासाहेब कांबळे यांनी यावेळी व्‍यक्‍त केली. यावेळी राष्‍ट्रवादीचे शहराध्‍यक्ष योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते राहूल भोसले, अजित गव्हाणे, डब्बू आसवानी, वैशाली घोडेकर, ज्ञानेश्वर कांबळे, विशाल मासूळकर, राहुल डबाळे, सुवर्णा डंबाळे, मुमताज शेख, संतोष निसगंध, संदिपान झोंबाडे, बळीराम काकडे, प्रल्हाद कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. बाबासाहेब कांबळे म्‍हणाले की, महापालिकेत कष्टकरी जनतेचे प्रतिनिधित्व देण्याची गरज आहे. महापालिका…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात इच्छुक उमेदवारांकडून मिळालेल्या अर्जवितरण प्रक्रियेला तिसऱ्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मावळचे महासंसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महानगरप्रमुख राजेश वाबळे यांच्या उपस्थित अर्जवितरणाची प्रक्रिया पार पडली.  9 नोव्हेंबरला पहिल्या दिवशी ऑनलाइन व ऑफलाइन मिळून एकूण 47 अर्ज वाटप करण्यात आले.  10 नोव्हेंबरला दुसऱ्या दिवशी ऑनलाइन व ऑफलाइन मिळून एकूण – 62 अर्ज वाटप करण्यात आले.  11 नोव्हेंबरला तिसऱ्या दिवशी ऑनलाइन व ऑफलाइन मिळून एकूण – 39 अर्ज वाटप करण्यात आले. अशाप्रकारे तीन दिवसांत एकूण 148 अर्ज वितरित झाले असून उमेदवारीसाठी शिवसैनिकांचा मोठा आणि सकारात्मक प्रतिसाद दिसून आला.…

Read More

पुणे शहराचा ‘अग्नी प्रतिबंधक उपाययोजनांचा आराखडा’ तयार करावा नागपूर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील नागरी विकास केंद्रात मलनिसा:रण योजनांच्या 27 गावांमधील 1209.8 कोटींच्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या कामांमुळे संबंधित गावातील 39 लाख 42 हजार लोकसंख्येला लाभ होणार आहे. प्राधिकरणाने अग्निशमन सेवा शुल्कापोटी जमा झालेल्या निधीच्या विनियोगासाठी पुणे शहराचा ‘अग्नी प्रतिबंधक उपाययोजना आराखडा ‘ तयार करावा, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधानभवनातील मंत्री परिषद सभागृहात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची 13 वी सभा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आपली शिल्पकला दाखवली आहे. ज्ञानवान असलेला हा  समाज रस्त्याच्या कडेला राहतो . त्यांना जगण्यासाठी खूप धडपड करावी लागते .सन २०४७ साली भारत देश १०० वर्षाच्या स्वतंत्रता होईल, तोपर्यंत या सर्व समस्या आपण दूर करू . २० ते २५  वर्षे आपल्या हातात आहे. आपण त्या वयातील आहात की भारताचे तुम्ही भाग्य बदलू शकता, असे पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी गौरवोदगार काढले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी चिंचवड येथील कमला शैक्षणिक संकुलात १९ व्या वर्धापन दिनानिमित्त तीन दिवसीय  प्रतिभा सृजन व्याख्यानमालेचे आयोजन केले. या शैक्षणिक संकुलाचे  संस्थापक डॉ दीपक शहा त्यांचे सर्व सहकारी व कुटुंबीय, संचालक विद्यार्थी ,पालक …

Read More

“प्रभाग ११ मध्ये भाजपाच्या निशा यादव यांची ‘घर टू घर’ मोहीम जोरात” चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्र.११ चिखली, कृष्णानगर भागात भाजपाच्या निशा दिनेश यादव यांनी ‘घर टू घर’ गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. या प्रभागातून भारतीय जनता पक्षाकडून तीव्र इच्छुक असून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाचं व्हिजन आणि प्रगतीचा निर्धार घेऊन बुधवारी चिखली, कृष्णानगर परिसरात ‘घर घर संपर्क’ मोहीम राबवण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिकांशी मनमोकळा संवाद साधून प्रत्येक घरापर्यंत विकासाच्या योजना पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून विकसित शहराचे स्वप्न आपल्याला साकार करायचे आहे.…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘पुस्तकी शिक्षणासोबतच पिंपरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयांतून संशोधन कार्य हिरिरीने केले जावे!’ अशी अपेक्षा हडपसर येथील एस. एम. जोशी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांनी रयत शिक्षण संस्था संचलित महात्मा फुले महाविद्यालय, संभाजीनगर, चिंचवड येथे  व्यक्त केली. महात्मा फुले महाविद्यालय आयोजित सात दिवसीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषद व चर्चासत्राचे उद्घाटन करताना प्रा. डॉ. सुरेश साळुंखे बोलत होते. ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. सतिश गोरडे, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील प्रा. डॉ. मच्छिंद्र गोफणे,  सी-मेट संस्थेतील प्रा. डॉ. रामचंद्र कलबर्मे, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले, प्रा. संजय अहिवळे, प्रा. शहाजी मोरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.…

Read More

चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या पी.सी.एम.सी. पब्लिक स्कूल कुदळवाडी शाळा क्र. ८९ येथे आज दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी भव्य कलाविष्कार कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संपूर्ण वर्षभर विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक तसेच विविध उपक्रमांतून केलेल्या प्रगतीचे दर्शन या मंचावरून घडले. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी महापौर  राहुल जाधव यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीबद्दल बोलताना त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक  संपत पोटघन व शिक्षकवर्गाचे विशेष कौतुक केले. महानगरपालिकेतील इतर शाळांमध्ये आदर्श कामगिरी करणारी संस्था म्हणून कुदळवाडी शाळेने स्थान मिळवल्याचे त्यांनी गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाला नगरसेवक  दिनेश यादव,  युवराज पवार,  निशा यादव,  मनिषा पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  कविता निकम, …

Read More

नागपूर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विधानभवनातील मंत्रीमंडळ सभागृहात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (PMRDA) ५ वी महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. या बैठकीत आमदार सुनील शेळके यांच्यासह PMRDA चे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीची सुरुवात मागील ४ थ्या बैठकीच्या अनुपालन अहवालाच्या सादरीकरणाने झाली. पुणे महानगर प्रदेश क्षेत्राकरिता एक उत्कृष्ट आणि व्यवहार्य ‘स्ट्रक्चर प्लॅन’ तयार करण्याच्या स्पष्ट सूचना मा. मुख्यमंत्री महोदयांनी दिल्या. PMRDA मार्फत मंजूर झालेल्या विविध विकासकामांची सद्यस्थिती आणि विस्तृत माहितीही सर्व सदस्यांसमोर सादर करण्यात आली. आमदार सुनील शेळके यांनी ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी निधीअभावी थांबलेल्या कामांचा मुद्दा ठामपणे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून प्रभाग क्रमांक 28 मधून भाजपचे इच्छुक संदेश काटे यांनी आज अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज सादर केला. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या उपस्थितीत हा अर्ज सुपूर्त करण्यात आला. भाजप शहर कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची उपस्थिती दिसून आली. दस्तावेज स्वीकृत करताना शहराध्यक्षांनी आगामी निवडणुकीत पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी सक्षम उमेदवारांची निवड महत्वाची असल्याचे सांगितले. संदेश काटे यांनी स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी प्रभागात प्रभावी काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. स्वच्छता, वाहतूक, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यावर आपले प्राधान्य असेल, असेही…

Read More

– राज्य सरकारकडून अपेक्षीत निधी, मान्यता अन्‌ कार्यवाहीची मागणी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या भाजपा आमदार महेश लांडगे यांनी सभागृहात शहराच्या विकासासंदर्भातील 10 महत्त्वपूर्ण मुद्दे मांडत अक्षरशः “धमाका” उडवून दिला. शहराच्या सर्वंकष आणि शाश्वत विकासाशी निगडित असलेल्या विविध प्रकल्पांसाठी आवश्यक निधी व तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी ठामपणे केली. अधिवेशनाच्या पुरवणी मागणी सत्रामध्ये आमदार लांडगे ‘‘दस कदम आगे’’ असल्याचे पहायला मिळाले. नागपूर येथे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आहे. अधिवेशनच्या तिसऱ्या दिवशी पुरवणी मागणी सत्र झाले. यामध्ये आमदार लांडगे यांनी विविध मागण्या केल्या. तसेच, सुमारे 35 लाख पिंपरी-चिंचवडकरांशी निगडीत विषय मार्गी लावण्यासाठी सकारात्मक व धोरणात्मक निर्णय घ्यावेत,…

Read More