- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असताना भाजप आणि शिवसेना (ठाकरे गट) यांना शहरात मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतंत्र लढण्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्षप्रवेशांची लाट उसळली आहे. भाजपमधील काही माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली. यामध्ये भाजपच्या माजी नगरसेविका सीमा सावळे आणि अश्विनी जाधव यांचा समावेश आहे. तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शहराध्यक्ष रूपाली आल्हाट आणि उपशहर प्रमुख नेताजी काशीद यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशांमुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व ३२ प्रभागांतील सुमारे सातशे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मंगळवारी घेतल्या. भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वतंत्र निवडणूक लढविण्याचे स्पष्ट झाल्यानंतर अजित पवार यांनी तातडीने हालचाली करीत पिंपरी चिंचवडमध्ये काही इतर पक्षांतील माजी नगरसेवकांना प्रवेश देत तेथील इच्छुकांशी संवाद साधला. पवार यांच्यासोबत मुलाखत घेण्याच्या प्रक्रियेत पक्षाचे नेते विलास लांडे, अण्णा बनसोडे, योगेश बहल, नाना काटे, अजित गव्हाणे हे स्थानिक नेते उपस्थित होते. बारामती हॉस्टेल येथे सकाळी सात वाजल्यापासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. या मुलाखती सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू होत्या. प्रत्येक इच्छुक…
महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने ४ हजार ८१९ अनधिकृत फ्लेक् पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून १५ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आली असून निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रात आज (१६ डिसेंबर) दुपारी ३ वाजेपर्यंत ४ हजार ८१९ नियमबाह्य तसेच अनधिकृतपणे लावण्यात आलेले राजकीय फ्लेक्स, बॅनर्स, किऑस्क, स्टिकर्स, होर्डिंग, चिन्हे, ध्वज, फलक, भिंतीवरील राजकीय जाहिराती आदी तद्सम बाबी हटविण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या वतीने ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना आणि आदेशांचे पालन करण्यासाठी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने कारवाईची…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक कामासाठी नियुक्त सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परस्पर उत्तम समन्वय ठेवून आपली जबाबदारी पार पाडावी. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमावलीनुसार अत्यंत जबाबदारीने पारदर्शक आणि नि:पक्षपातीपणे निवडणूक प्रक्रिया पार पाडावी, अशा सूचना आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिल्या. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने आढावा बैठक आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली,त्यावेळी ते बोलत होते. या आढावा बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप जिल्हाधिकारी अनिल पवार,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अकोला जिल्ह्यातील कामगार क्षेत्रात कार्यरत असलेले विविध कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी आज कष्टकरी संघर्ष महासंघाच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान महासंघाच्या कार्यालयीन कामकाजाची सविस्तर माहिती त्यांनी जाणून घेतली. संघटनेच्या आजपर्यंतच्या कार्यपद्धती, कामगारांच्या हक्कांसाठी सुरू असलेले उपक्रम, आंदोलनात्मक भूमिका तसेच आगामी काळातील कार्यदिशा यावर सखोल चर्चा करण्यात आली. महासंघाचे अध्यक्ष, कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी या प्रतिनिधींचे सहर्ष स्वागत केले. यावेळी अकोला जिल्हा आणि विविध तालुका प्रतिनिधी सचिन भुसारी, श्रीकृष्ण घारडे, सिंधू अधम, जीवन डूमालेशेख, समीर शेख, हुसेन शेख, शुभांगी मते, शारदा पाटील, शारदा काळे, अनिता खैरनार, अविनाश तायडे, रवी मोरे आदी मान्यवर कार्यकर्ते…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठीची अंतिम मतदार यादी जाहीर झाली असून, शहरातील ३२ प्रभागांमध्ये एकूण १७ लाख १३ हजार ८९१ मतदार नोंदले गेले आहेत. यामध्ये ९ लाख ५७ हजार ७२८ पुरुष, ८ लाख ७ हजार ९६६ महिला, तर १९७ इतर मतदारांचा समावेश आहे. वाढती मतदारसंख्या लक्षात घेता आगामी निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. प्रभागनिहाय आकडेवारी पाहता प्रभाग क्रमांक १६ मध्ये सर्वाधिक ७५ हजार १०५ मतदार असून, तो शहरातील सर्वात मोठा प्रभाग ठरला आहे. यानंतर प्रभाग क्रमांक ३ (७२ हजार १०६) आणि प्रभाग क्रमांक २ (६९ हजार ५१८) या प्रभागांतही मोठ्या प्रमाणावर मतदार आहेत.…
भाजप अॅक्शन मोड”वर : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी मुलाखती सुरू 730 उमेदवारांचे अर्ज ; उद्या निवडणूक मुलाखत प्रक्रिया पूर्ण करणार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर पिंपरी चिंचवड भाजप अॅक्शन मोडवर आला आहे. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार मुलाखत प्रक्रिया पूर्ण करून सक्षम उमेदवार देण्याकडे भाजपचा कल असल्याचे आमदार तथा पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी सांगितले. भारतीय जनता पार्टीने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखत प्रक्रियेला अधिकृत सुरुवात केली आहे. मंगळवारी मोरवाडी, पिंपरी येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयात या मुलाखती शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्या. या प्रक्रियेसाठी आमदार महेश लांडगे,…
– पाच सर्व्हेमध्ये अपयशी ‘बॅकबेंचर्स’ना भाजपाचा ‘STRICT NO’ पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने अत्यंत शिस्तबद्ध आणि टप्प्याटप्प्याने पाच व्यापक सर्व्हे राबवले. या सर्व्हेचा उद्देश केवळ तिकीट वाटप नव्हता, तर पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवणारे, निवडून येण्याची क्षमता असलेले आणि प्रामाणिकपणे पक्षवाढीसाठी काम करणारे उमेदवार पुढे आणणे हाच होता. त्यामुळे अनेक माजी नगरसेवकांच्या उमेदवारीवर ‘फुली’ मारली होती. आता भाजपा- राष्ट्रवादी स्वतंत्र लढण्याचे निश्चित झाल्यानंतर संबंधित इच्छुकांनी राजकीय अपरिहार्यता म्हणून राष्ट्रवादीत प्रवेशाचा पर्याय निवडला आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक इच्छुकांची बैठक झाली. त्याठिकाणी भाजपाकडून निवडून आलेल्या माजी नगरसेविका अश्विनी जाधव, सीमा सावळे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिखली, कृष्णानगर परिसरात सुरू असलेल्या प्रचारातून नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यात भाजपच्या सक्रिय सदस्य आणि इंद्रायणी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्ष निशा दिनेश यादव यांनी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. सुरुवातीपासूनच विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत नागरिकांशी थेट संवाद साधला जात असल्याने प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला वेग आला असून, आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नागरिकांच्या सेवेसाठी मैदानात उतरण्याचा दृढ संकल्प निशा दिनेश यादव यांनी व्यक्त केला आहे. नागरिकांपर्यंत पोहोचण्यात मिळालेली आघाडी महत्त्वाची.. रविवारी सुट्टीचा मुहूर्त साधत प्रचाराच्या माध्यमातून प्रभागातील विविध ठिकाणी नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. ठिकठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – त्रिवेणीनगर- तळवडे प्रभाग क्र.१२ मध्ये भारतीय जनता पक्षाची आक्रमक भूमिका गेम चेंजर ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा “फेक नरेटिव्ह प्लान“ फेल करत प्रभाग क्र.१२ मधून प्रभाग क्र.१ व ११ मध्ये स्थलांतरित झालेली मतदारांची नावे पुन्हा प्रभाग क्र.१२ मध्ये समाविष्ट करण्यात आली असल्याची माहिती माजी नगरसेवक शांताराम बाप्पू भालेकर यांनी दिली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील त्रुटी आणि मतदारांच्या स्थलांतराचा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागला आहे. प्रभाग क्र.१२ (त्रिवेणीनगर, तळवडे) मधील मतदार यादी भाग क्रमांक ७ सह अनेक मतदारांची नावे चुकीने प्रभाग क्र.१ आणि ११ मध्ये स्थलांतरित झाली होती. भाजपच्या स्थानिक…
