Author: maharashtrabreakingnews.com

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्याच्या वतीने संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी ‘आप युवा आघाडी’ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील अधिकृत पत्र २१ एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आले. राज्यातील तरुणांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि पक्षाचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनुभवी आणि सक्रिय कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची यादी खालीलप्रमाणे आहे: अ.क्र. नाव पद १. मोईन इजाज मोकाशी प्रदेश कार्याध्यक्ष २. चेतन श्रीनिवास मच्चा प्रदेश कार्याध्यक्ष ३. उमेश निवृत्ती मेटकर प्रदेश कार्याध्यक्ष ४. प्रणित राजेंद्र डोंगरे प्रदेश कार्याध्यक्ष ५. अमर दिलीप गांगुर्डे प्रदेश कार्याध्यक्ष ६. ऋषिकेश पिराजी कानवटे प्रदेश उपाध्यक्ष…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पुर्णानगर ज्येष्ठ नागरिक संघ, पूर्णानगर यांच्या वतीने “कृतज्ञता सन्मान सोहळ्या” चे आयोजन करण्यात आले होते. समाजाप्रती उत्तरदायित्व बाळगत उदार हस्ताने मदत केल्याबद्दल उद्योजक अनिल।नेवाळे, सतीश बेंडे, संजय नाना पठारे, सतीश वाणी आणि मेजर सुरेश डोके यांचा विशेष सन्मान करण्यात आला. अक्षय तृतीयाच्या पार्श्वभूमीवर या सर्वांनी अत्याधुनिक पाणपोई , जलकुंभ, पंखे , बैठक व्यवस्था आदींच्या स्वरूपात अक्षय दानाचे लोकार्पण केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अंकुश बापू सुद्रीक हे होते. माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, जेष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे , कार्याध्यक्ष सुनील कदम, समाजिक कार्यकर्ते पप्पूशेठ लोढा यांची प्रमुख उपास्थिती होती. कार्यक्रमाची प्रस्तावना कार्याध्यक्ष सुनील कदम यांनी…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने आर्थिक वर्ष २०२६–२७ साठी मालमत्ता कर बिलांचे घरपोच वाटप महिला बचत गटांच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे. शहरातील प्रत्येक मालमत्ताधारकापर्यंत कर बिल वेळेत पोहोचविण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत असून, बिल वाटपासाठी येणाऱ्या महिलांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केले आहे. पिंपरी चिंचवड शहरात निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मिश्र तसेच मोकळ्या जागांसह सुमारे ७ लाख ४४ हजार ६३० नोंदणीकृत मिळकती आहेत. मालमत्ता सर्वेक्षणातून नव्याने सापडलेल्या मिळकतींची नोंदणी सुरू असून, एकूण मिळकतींची संख्या ८ लाखांपर्यंत होण्याची शक्यता आहे. या सर्व मिळकतींच्या कर देयकांचे वितरण…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने शहरातील अनधिकृत आणि विनापरवाना जाहिरात फलकांविरोधात कठोर पाऊल उचलत कारवाई सातत्याने सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये विनापरवाना उभारण्यात आलेले दोन जाहिरात फलक निष्कासित करण्यात आले आहेत. महापालिकेच्या कार्यक्षेत्रात जाहिरात फलक उभारण्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम २४४ व २४५ तसेच महाराष्ट्र शासन जाहिरात नियमन व नियंत्रण ९ मे २०२२ च्या अधिनियमातील तरतुदीनुसार महापालिकेची पूर्व परवानगी घेऊनच खासगी जागेत जाहिरात फलक उभारण्याची तरतूद आहे. या नियमांचे पालन न करता पिंपरी चिंचवड शहरात उभारण्यात आलेले जाहिरात फलक हटवण्याचे काम महापालिकेतर्फे सातत्याने करण्यात येत आहे. या अंतर्गत कातळेवस्ती, एन.डी.एस. बँक्वेट्स लॉन समोर,…

Read More

१०८ विद्यार्थ्यांना ९१ टक्क्यांपेक्षा जास्त गुण पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचा सीबीएसई इयत्ता दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकाल लागला आहे. यामध्ये निरंजन अनुसे याला ९८.४ टक्के गुण मिळाले असून त्याने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक आरना झांजे आणि खुशी कटारिया ९८ टक्के, तृतीय क्रमांक श्रीजीत राठोड आणि वेदांत मडोली ९७.८ टक्के, चौथा क्रमांक अंकूर हरल आणि आर्या देवशटवार ९७.६ टक्के तर पाचवा क्रमांक सिद्धी जाधव आणि सुधनवा कुलकर्णी यांनी ९७.४ टक्के गुण मिळवले. एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या एकूण २७९ विद्यार्थ्यांपैकी १०८ विद्यार्थ्यांना ९१ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.…

Read More

त्यागमूर्ती माता रमाईंचे स्मारक हे पिंपरी-चिंचवडकरांसाठी सामाजिक जाणिवेचा वारसा – अभिषेक बारणे पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहराच्या वैभवात भर टाकणारा आणि सामाजिक कृतज्ञतेची साक्ष देणारा एक ऐतिहासिक निर्णय आज घेण्यात आला. शहराच्या मध्यवर्ती पिंपरी चौकात उभारण्यात येणाऱ्या माता रमाई स्मारकाच्या स्थापत्य कामांना महानगरपालिकेच्या स्थायी समितीने आज अधिकृत मंजुरी दिली. या निर्णयामुळे नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीला आता मूर्त स्वरूप मिळणार असून, लवकरच या स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधूकर पवळे सभागृहात ही महत्त्वाची बैठक पार पडली. स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप…

Read More

चिंचवड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवडगावातील केशवनगर येथील विद्युत दाहिनी परिसरात सुरू असलेल्या पार्किंग व सुशोभीकरणाच्या कामांची स्थानिक नगरसेवक सुरेश भोईर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या गुणवत्तेचा सखोल आढावा घेतला. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना या कामांसंदर्भात सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सुरू असलेल्या कामामध्ये काही त्रुटी आढळून आल्याने त्या तात्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पाहणीदरम्यान कामाच्या दर्जाबाबत समाधान व्यक्त करतानाच, उर्वरित काम अधिक दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, तसेच परिसर अधिक स्वच्छ व सुशोभित राहावा यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देशही देण्यात आले. याशिवाय चिंचवडगावातील दशक्रिया घाट परिसरातील…

Read More

महाराष्ट्र विकास केंद्र आयोजित ज्ञानसमृद्धी व्याख्यानमाला चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “आज ज्ञान विज्ञानाची अनेक क्षेत्रे खुणावत आहेत. परिघाच्या पलीकडील शिक्षणाने व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो. युवक ही राष्ट्राची खरी संपत्ती आहे. आज देशापुढे अनेक आव्हाने आहेत. जगात सर्वाधिक युवकांचा देश म्हणून भारत ओळखला जातो. राष्ट्रप्रेमी आणि समजाभीमूक युवकच देशाचे भवितव्य उज्ज्वल करू शकतात. समाजविघातक शक्ती आणि व्यसनाधीनता या पासून दूर राहून युवकांनी कार्यप्रवणता जोपासावी. कुटुंबाचा आधार बनून समाजासाठी योगदान द्यावे. युवक व्यासंगी, जागरूक, बहुआयामी आणि अष्टपैलू बनला पाहिजे. ती आजच्या काळाची गरज आहे.” असे प्रतिपादन जेष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी केले. राजेंद्र घावटे हे चिखली येथील कॉनक्वेस्ट कॉलेजच्या ज्ञानसमृद्धी व्याख्यानमालेत…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरातील आशा सेविकांचे गेल्या सहा महिन्यांपासून मानधन थकले असल्याचा गंभीर मुद्दा पुढे आला असून, त्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन तातडीने वेतन अदा करण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी विशाल बाळासाहेब काळभोर यांनी यासंदर्भात पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांकडे निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, आशा सेविका आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाचा कणा असून, त्यांनी कोविडसह विविध आरोग्य मोहिमांमध्ये सातत्याने काम केले आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून त्यांचे मानधन थकले असल्याने त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे. अनेक सेविकांना दैनंदिन गरजा भागवणे कठीण झाले असून, यामुळे त्यांच्या कामावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. “काम थांबले…

Read More

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अर्थसंकल्पीय प्रक्रियेवरून मोठा वाद निर्माण झाला असून, तब्बल 1100 कोटी रुपयांच्या उपसूचनांना विषयपत्रिकेत उल्लेख नसतानाही मंजुरी दिल्याची घोषणा केल्याने पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सोमवारी (दि. 20) पार पडलेल्या सर्वसाधारण सभेसमोर एकूण 15 विषय निश्चित होते. मात्र, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर सभा तहकूब करण्यात आली. त्याचवेळी ‘नारी शक्ती वंदन विधेयक’ संसदेत मंजूर न झाल्याच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी काँग्रेस व मित्र पक्षांविरोधात घोषणाबाजी करत राजकीय वातावरण तापवले. या गोंधळात एकाही विषयावर प्रत्यक्ष चर्चा झाली नाही. सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी सभा तहकूब करण्याचा प्रस्ताव मांडला, ज्याला नगरसेवक ज्ञानेश्वर जगताप यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर…

Read More