- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकशाहीच्या उत्सवाला साजेसा रंग, कला, ताल आणि जनसंवाद यांचा सुरेल संगम साधत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पुढाकारातून चिंचवड येथील एल्प्रो मॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मतदान जनजागृती कार्यक्रमाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. मतदानाचे महत्त्व प्रभावीपणे मांडणारा हा उपक्रम स्वीप अंतर्गत उत्साहात पार पडला. पिंपरी चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली असून, या निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अधिपत्याखाली महापालिका हद्दीत स्वीप कार्यक्रमांतर्गत व्यापक मतदान…
केवळ मतदानाच्या दिवशी नव्हे तर पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकशाही प्रक्रियेत मतदान हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनावर नागरिकांचा विश्वास अबाधित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी निवडणूक काळात केवळ मतदानाच्या दिवशी पुरते आपले कार्य मर्यादित नसून, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर दक्ष राहणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणात सर्व शंकांचे निरसन करून, आत्मविश्वासाने निवडणूक कामकाज पार पाडा, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी केले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात महापालिका सार्वत्रिक निवडणुक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रारंभिक प्रशिक्षण पार पडले. यावेळी मार्गदर्शन करतांना अतिरिक्त…
पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने आज एकूण १२ नामानिर्देशन पत्रे दाखल
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने आज एकूण १२ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत. त्यानुसार २३ डिसेंबर २०२५ ते आजपर्यंत एकूण १३ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत. आज प्रभागनिहाय नामनिर्देशन पत्रे जमा करणाऱ्या व्यक्तींची नावे व त्यांनी नोंदविलेल्या माहितीचा तपशील ब क्षेत्रीय कार्यालय – एकूण ७ अर्ज प्रभाग क्र. १७ – दिलीप मुरलीधर गोसावी (भारतीय जनता पार्टी) राजेंद्र गुलाबराव साळुंके (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी-२, अपक्ष-२) – ४ अर्ज राहुल राजेंद्र पालांडे (शिवसेना – उबाठा गट) सचिन अरूण सिद्धे (अपक्ष) इ क्षेत्रीय कार्यालय – एकूण २ अर्ज प्रभाग क्र. ४ – उदय…
मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यासाठी ३ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मतदान केंद्र निहाय याद्या प्रसिद्ध करण्यासाठी ३ जानेवारी २०२६ रोजी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने सर्व महापालिकांना दिलेल्या सुचनेनूसार दुबार मतदार व मतदान केंद्रनिहाय मतदार यादीचे कंट्रोल चार्ट संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यासाठी २७ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी ३ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापुर्वी राज्य निवडणूक आयोगाने मतदान केंद्रनिहाय…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी सांगवी प्रभाग क्र. ३१ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, उद्योजक अरुण पवार, माजी नगरसेवक अंबरनाथ कांबळे यांची कन्या दिप्ती अंबरनाथ कांबळे, माजी नगरसेवक शिवाजी पाडुळे यांच्या पत्नी उमा शिवाजी पाडुळे यांनी सुरू केलेल्या होम-टू-होम प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत परिसरातील विविध नगरांमध्ये जाऊन त्यांनी थेट मतदारांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी परिसरातील दिवसाआड पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य सुविधा, स्वच्छता व मूलभूत सोयींबाबतच्या समस्या मांडल्या. या सर्व प्रश्नांची नोंद घेत, आजपर्यंत केलेल्या विकासकामांप्रमाणेच पुढील काळातही प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय राहील, असा विश्वास राष्ट्रवादी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक २८ मधील उमेदवारांनी पिंपळे सौदागर परिसरात जोरदार शक्तीप्रदर्शन करत राजकीय वातावरण ढवळून काढले. आज पार पडलेला भव्य प्रचार शुभारंभ हा केवळ कार्यक्रम न राहता, जनतेच्या विश्वासावर उभा असलेला विजयाचा एल्गार ठरला. मुंजोबा चौक ते रहाटणी चौक दरम्यान निघालेल्या भव्य प्रचार फेरीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रस्त्यांच्या दुतर्फा उभे असलेले नागरिक, महिलांचा उस्फूर्त सहभाग, युवकांचा जोश आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद — या सर्वांनी प्रचाराला अभूतपूर्व उर्जा दिली. विविध चौक, मंदिरे आणि मार्गांवर मिळालेल्या शुभेच्छा व आशीर्वादांनी या प्रचार शुभारंभाला लोकमान्यतेची ठोस मोहोर उमटवली. लोकहित, विकास आणि विश्वास या त्रिसूत्रीवर आधारित…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्रमांक 3 मधील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका विनया तापकीर आणि प्रभावशाली सामाजिक कार्यकर्ते प्रदीप तापकीर यांनी भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वात भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे, आमदार महेश लांडगे देतील त्या उमेदवारांचे काम आम्ही करणार आहोत. चऱ्होलीच्या विकासात योगदान आम्ही दिले असून, आगामी काळात आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वात आणखी विकासकामे मार्गी लागतील, असा विश्वास माजी नगरसेविका विनया तापकीर यांनी व्यक्त केला आहे. पिंपरी-चिंचवड भाजपा मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय येथे तापकीर दांम्पत्याचा जाहीर पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळी विधान…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी भाजपच्या उमेदवारांची अंतिम यादी प्रदेश कार्यालयाकडे सादर करण्यात आली आहे. पक्षश्रेष्ठींनी विधानसभानिहाय उमेदवारांचा आढावा घेतला असून, उमेदवारांची पहिली यादी रविवारी (दि. २८) प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती पिंपरी चिंचवड निवडणूक प्रचार प्रमुख आमदार शंकर जगताप यांनी शुक्रवारी (दि. २६ ) हि माहिती दिली. आमदार शंकर जगताप यावेळी म्हणाले, दोन दिवसात उमेदवार यादी जाहीर करण्यात येणार आहे. पालिका निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची अंतिम यादी आम्ही प्रदेश कार्यालयाकडे पाठविली आहे . मुंबईत या संदर्भात बैठक झाली. बैठकीला सर्व कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते. उमेदवारांचा विधानसभा निहाय आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. ज्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -+धर्म, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेसाठी अल्पवयातच सर्वोच्च बलिदान देणाऱ्या साहिबजाद्यांच्या अतुलनीय शौर्य व त्यागाच्या स्मरणार्थ पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आकुर्डी येथील मुख्यालयात गुरुवारी (दि. २६) ‘वीर बाल दिन’ साजरा करण्यात आला. या वेळी गुरू गोविंदसिंगजी यांचे वीर सुपुत्र साहिबजादे जोरावर सिंग व फतेह सिंग यांच्या सर्वोच्च बलिदानास विनम्र अभिवादन करण्यात आले. साहिबजाद्यांचे जीवन धैर्य, सत्यनिष्ठा, त्याग आणि राष्ट्रप्रेमाचा आदर्श घालून देणारे असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. युवक पिढीने या आदर्शांचा अंगीकार करून समाज व राष्ट्राच्या उन्नतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहनही करण्यात आले. या कार्यक्रमास विकास परवानगी व नियोजन विभागाचे संचालक अविनाश पाटील, प्रशासन…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील कमला शिक्षण संस्थेच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेजने राष्ट्रीय कला उत्सव २०२५मध्ये उत्स्फूर्त आणि लक्षवेधी सहभाग नोंदवला. या भव्य उत्सवाची सुरुवात प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या *“महाराष्ट्राची लोकधारा” या बहारदार नृत्यप्रकाराने करण्यात आली. महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचे दर्शन घडवणाऱ्या या नृत्यात भूपाळी, वारकरी दिंडी, जोगवा, गोंधळ,कोळी , शेतकरी,पोवाडा आदी लोकनृत्य प्रकारांचे सुंदर सादरीकरण करण्यात आले. पारंपरिक वेशभूषा, जोशपूर्ण ताल आणि विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने उपस्थितांची मने जिंकली. या सादरीकरणामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाच्या यशस्वी सादरीकरणासाठी प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.वर्षा निगडे आणि सर्व…
