- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी आज इंद्रायणी नगर ‘क’ क्षेत्रीय कार्यालय, ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय तसेच ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय येथे ईव्हीएम मशीन व स्ट्रॉंग रूमची पाहणी केली. यावेळी ईव्हीएम व स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करता कामा नये, असे निर्देश आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिले. यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, डॉ. दिप्ती सूर्यवंशी, डॉ. अर्चना पठारे, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे, तानाजी नरळे, पूजा दुधनाळे,सहाय्यक आयुक्त किरणकुमार…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत चऱ्होली बु. प्रभाग क्रमांक ३ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली असून, ज्येष्ठ नागरिकांसह तरुणाईचा उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात प्रभागातील सर्वच रस्ते भाजपमय झाल्याचे चित्र दिसून आले असून, महायुतीच्या उमेदवारांनी निवडणूक रणांगणात निर्णायक आघाडी घेतल्याचे संकेत मिळत आहेत. वडमुखवाडी येथे पद्मावती देवीच्या चरणी नतमस्तक होत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी महापौर व उमेदवार मा. नितीनआप्पा काळजे, भाजप शहर कोषाध्यक्ष सचिनभाऊ श्रीधर तापकीर, सर्वसाधारण महिला गटातून सौ. अर्चनाताई राजेश सस्ते तसेच अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून सौ. सारिका रवींद्र गायकवाड यांनी प्रचाराला सुरुवात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक 28 च्या संपूर्ण पॅनेलच्या कॅलेंडरचे प्रकाशन आज महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री तसेच पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले . याप्रसंगी शहराध्यक्ष योगेश बहल ,अजित गव्हाणे तसेच प्रकाश सोमवंशी उपस्थित होते .पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र.२८ रहाटणी पिंपळे सौदागर मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाना काटे पॅनेल जागा .अ साठी उमेदवार उमेश गणेश काटे ,जागा ब साठी सौ.शितल नाना काटे ,क साठी सौ.मिनाक्षी अनिल काटे आणि जागा ड साठी श्री विठ्ठल उर्फ नाना काटे निवडणूक रिंगणात आहेत .या चारही उमेदवाराचे २०२६ चे नवीन दिनदर्शिकेचे प्रकाशन …
उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लवकरच नियमितीकरणाची प्रमाणपत्रे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे दोन लाख अनधिकृत घरांच्या नियमितीकरणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. गुंठेवारीच्या अटी शिथिल करून आणि नाममात्र दंडात्मक शुल्क आकारून अनधिकृत घरांना लवकरच नियमितीकरणाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे दोन लाख नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता संपताच उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नियमितीकरणाची प्रमाणपत्रे नागरिकांना दिली जाणार आहेत. याबाबतची माहिती शिवसेना उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी सातत्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. तत्कालीन मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २४ थेरगाव-दत्तनगर येथील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत काढलेल्या रॅलीला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. चारही उमेदवारांचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले. गणेशनगर, मयूरेश्वर मंदिर, एकता कॉलनी, शिव कॉलनी, गुजरनगर या भागात ही प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीत प्रभाग २४ थेरगाव-दत्तनगरमधील शिवसेनेचे उमेदवार विश्वजीत बारणे, नीलेश बारणे, शिवसेना पुरस्कृत रुपाली लालासाहेब गुजर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माया बारणे हे चारही उमेदवार सहभागी झाले होते. या रॅलीत तरुण, महिला, ज्येष्ठांसह नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. प्रभाग क्रमांक २४ मधील निवडणूक लक्षवेधी होत आहे. . माजी नगरसेवक संतोष बारणे, मंगेश बारणे, संभाजी बारणे, महेश बारणे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ऑनलाईन बैठकीद्वारे महापालिका प्रशासनाकडील निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेतला. महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी करण्यात आलेल्या विविध नियोजनात्मक बाबींची माहिती यावेळी बैठकीत दिली. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ मतदान होणार असून मतमोजणी १६ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण ६९१ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे असून, या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनामार्फत सर्वंकष तयारी करण्यात आली असून याबाबत आज राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी आढावा घेतला. या बैठकीस…
नवी सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नवी सांगवी परिसरात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३१ चे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र गणपत जगताप, अरुण श्रीपती पवार, दिप्ती अंबरनाथ कांबळे, उमा शिवाजी पाडुळे यांनी निवडून आल्यावर नवी सांगवीतील वीजपुरवठा व पाणीपुरवठा कायमस्वरूपी नियमित करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवू, असे आश्वासन दिले. घरगुती वापर, व्यावसायिक आस्थापना तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर वीजखंडिततेचा मोठा परिणाम होत असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. एक दिवसाआड पाणी पुरवठ्यामुळे महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना अडचणी सहन कराव्या लागत आहेत. या समस्या केवळ तात्पुरत्या उपायांनी नव्हे, तर…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आज प्रभाग क्रमांक २६ मधील कस्पटे वस्ती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या अधिकृत उमेदवार सौ. सारिका गणेश कस्पटे यांनी प्रचार दौरा केला. या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कस्पटे वस्तीमधूनच उभ्या राहिलेल्या आणि या भागातून महिला नेतृत्व म्हणून पुढे आलेल्या सौ. सारिका कस्पटे यांचे नागरिकांनी मोठ्या आपुलकीने स्वागत केले. घराघरात जाऊन संवाद साधताना नागरिकांनी त्यांना आशीर्वाद दिले तसेच *“आमच्या वस्तीतील लेक आता नगरसेवक व्हावी”* अशी भावना व्यक्त केली. दीर्घकाळापासून सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या सौ. सारिका कस्पटे यांची लोकप्रियता या प्रचारातून स्पष्टपणे दिसून आली. महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १८ सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. “आम्हाला सुरेश भोईरच नगरसेवक म्हणून हवेत,” असा ठाम सूर मतदारांमधून उमटू लागल्याने राजकीय समीकरणे स्पष्ट होताना दिसत आहेत. भाजपचे अधिकृत उमेदवार सुरेश शिवाजी भोईर यांना मिळणारा वाढता जनसमर्थन हा केवळ प्रचाराचा परिणाम नसून, त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक संपर्क, कार्यपद्धती आणि विकासाभिमुख प्रतिमेचा परिपाक असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. प्रचारादरम्यान भोईर यांनी मतदारांशी थेट संवाद साधत प्रभागातील मूलभूत प्रश्न—रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य व सुरक्षा—यावर ठोस भूमिका मांडली. याउलट विरोधकांकडे केवळ आश्वासनांची पुनरावृत्ती असल्याची भावना मतदारांमध्ये निर्माण झाली आहे. “दिसणारा माणूस, ऐकणारा माणूस आणि…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८ मध्ये भाजपचे युवा नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे संदेश काटे यांनी निवडणूक रणांगणात जोरदार तयारी सुरू केली आहे. संघटन कौशल्य, सातत्यपूर्ण जनसंपर्क आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाच्या जोरावर संदेश काटे यांनी अल्पावधीतच प्रभागात आपली ठळक ओळख निर्माण केली आहे. प्रभाग २८ मधील युवक, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये संदेश काटे यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असून “काम करणारा, संवाद साधणारा आणि समस्या तातडीने मार्गी लावणारा नेता” अशी त्यांची प्रतिमा तयार झाली आहे. विशेषतः युवकांमध्ये त्यांचे नेतृत्व आशेचे केंद्र ठरत असून रोजगार, क्रीडा सुविधा, डिजिटल सेवा आणि आधुनिक पायाभूत सुविधांबाबत त्यांनी मांडलेली…
