- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याच्या उत्तर भारतीय प्रकोष्ठ अध्यक्षपदी संतोष वशिष्ठ मुनि ओझा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या स्वाक्षरीने त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. पक्षाची ध्येय-धोरणे, विचार आणि संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे की, संतोष मुनि ओझा यांनी पक्षासाठी केलेल्या सेवाभावी कार्याची दखल घेत त्यांची ही निवड करण्यात आली असून, जनतेच्या प्रगती व कल्याणासाठी कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या नियुक्तीबद्दल संतोष मुनि ओझा यांचे पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
पिंपळे गुरव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – योगवेद क्लासतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी व योगप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना व ओंकार उच्चाराने करण्यात आली. त्यानंतर विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.सहभागी विद्यार्थ्यांनी प्राणायाम व ध्यानाचा सराव करून योगाचे महत्त्व अनुभवले. या प्रसंगी योग प्रशिक्षक अस्मिता मॅम अस्मिता आकडकर यांनी योगाचे आरोग्यावर होणारे फायदे समजावून सांगत नियमित योग करण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमामुळे सहभागींच्या मनात आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली. योग दिनाचे औचित्य साधून मराठी पत्रकार संघ,पुणे जिल्हाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संजय मराठे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मान्यवर म्हणून डॉ.…
भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापु) काटे, नगरसेविका कुंदाताई भिसे,नगरसेविका अनिता काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न! ’द आर्ट ऑफ लिविंग’चे सत्यजित भैया यांचे विशेष मार्गदर्शन; शिवछत्रपती लिनिअर अर्बन गार्डन येथे रंगले सामूहिक योग शिबिर! ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’चे औचित्य साधून आज रविवार, दिनांक २१ जून २०२६ रोजी सकाळी ठीक ६.३० वाजता पिंपळे सौदागर येथील शिवछत्रपती लिनिअर अर्बन गार्डन येथे सामूहिक योग आणि प्राणायाम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टी रहाटणी-पिंपळे सौदागर आणि ‘द आर्ट ऑफ लिविंग’ (The Art of Living) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाला भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज),- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मोहन नगर येथे नागरिकांसाठी विनामूल्य योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. योग, ध्यान आणि प्राणायामाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश देत या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रसिद्ध योग अध्यापक महादेव येसके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी विविध योगासने, प्राणायाम व ध्यानधारणेचा सराव केला. यावेळी श्री. येसके यांनी योगाचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व सांगत नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका अरुणा गणेश लंगोटे उपस्थित होत्या. त्यांनी मनोगतात महादेव मंदिर येथे नियमितपणे सुरू असलेल्या योग वर्गाचा नागरिकांनी लाभ घ्यावा आणि आरोग्यासाठी योगाला जीवनशैलीचा भाग बनवावे,…
कासारवाडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे येथील पगारिया परिवारातील कल्पेश आणि आरती पगारिया यांचे चिरंजीव जिनेश पगारिया चार्टर्ड अकौटंटच्या अंतिम परीक्षेत प्रथम प्रयत्नात च उत्तीर्ण झाला. त्याला आई वडिल कल्पेश ,आरती आणि दादाजी सीए डॉ अशोककुमार आणि विलास कुमार पगारिया यांचे मार्गदर्शन आणि आशिर्वाद लाभला.
समिती अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटील, नंदकुमार कुऱ्हाडे पाटील यांची घोषणा आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यास यावर्षी बैलजोड निवड समिती बैलजोड सेवा देणार असल्याची माहिती समिती अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटील, माजी उपनगराध्यक्ष तथा समिती सदस्य नंदकुमार कुऱ्हाडे पाटील यांनी दिली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाला बैलजोडी सेवा देण्यासाठी आळंदीकर ग्रामस्थ बैलजोडी निवड समितीने या वर्षी जबाबदारी स्वीकारली असून तशी है देखील दिली आहे. सन १९८२ पासून बैल जोड समिती श्रींचे पालखी रथाला बैलजोडी देण्यासाठी ग्रामस्थां मधून नावे मागवून सेवा पुरवली जाते. या वर्षी रानवडे यांचे कडे सेवा देण्याचे रोटेशन होते. मात्र रानवडे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक २५ मधील नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या जनहिताच्या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, आयुष्मान भारत कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड दुरुस्ती तसेच विविध शासकीय कागदपत्रे आणि योजनांचा लाभ मोफत उपलब्ध करून देण्यात आला. शासनाच्या सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सुलभपणे पोहोचाव्यात आणि आवश्यक कागदपत्रांसाठी होणारी धावपळ कमी व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शासकीय सेवांचा लाभ घेतला. शेकडो नागरिकांनी या उपक्रमाचा…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रंगीत तालीम’ हा ज्ञानाकडून आत्मज्ञानाकडे नेणारा काव्यात्मक प्रवास आहे!’ असे विचार महाराष्ट्र साहित्य परिषद चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांनी शांता शेळके सभागृह, निगडी प्राधिकरण येथे रविवार, दिनांक १४ जून २०२६ रोजी व्यक्त केले. प्रज्ञार्थ प्रकाशन निर्मित आणि कवी दामोदर कुलकर्णी लिखित ‘रंगीत तालीम’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात राजन लाखे बोलत होते. ज्येष्ठ निरूपणकार आणि उद्योजक रवींद्र पाठक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच प्रकाशिका प्रज्ञा रामतीर्थकर आणि कवी दामोदर कुलकर्णी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती; तसेच श्रोतृवर्गाचा उत्तम प्रतिसाद कार्यक्रमास लाभला होता. राजन लाखे पुढे म्हणाले की, ‘अभियांत्रिकीसारख्या रूक्ष वातावरणात राहूनही कवी दामोदर कुलकर्णी यांनी आपली काव्यप्रतिभा…
मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ विधानसभा मतदारसंघात केंद्र, राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. या विकास कामांना गती द्यावी. कामांचा दर्जा राखावा. पावसाळापूर्व कामे पूर्ण करावीत. शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे उपलब्ध करून द्यावीत, अशा सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. मावळ तालुक्याची आढावा बैठक खासदार बारणे यांनी शुक्रवारी पंचायत समिती कार्यालयात घेतली. आमदार सुनील शेळके, तहसीलदार विक्रम देशमुख, मावळ पंचायत समिती सभापती सुनिताताई येवले, उपसभापती साहेबराव कारके, शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाऊ खांडभोर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शरदराव हुलावळे, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ सावंत, जिल्हा परिषद सदस्य संतोष राऊत, जिल्हा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज), – विविध विभागांत कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या साडेचार ते पाच हजार कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटी (निवृत्ती वेतन लाभ) आणि बोनसचा गंभीर प्रश्नही प्रशासनासमोर मांडला असून कंत्राटी कर्मचाऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी महापालिकेने थेट ‘प्रिन्सिपल एम्प्लॉयर’ (मुख्य नियोक्ता) म्हणून जबाबदारी घ्यावी या संदर्भात महापौर रवी लांडगे आणि स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी होकार दर्शवल्याची माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी पिंपरी येथे (दि.१९) पत्रकार परिषदेत दिली. कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांनी पत्रकार परिषदेत माहिती देतांना सांगितले की,सध्याच्या प्रथेनुसार महापालिकेचे टेंडर (कंत्राट) बदलले की जुना कंत्राटदार निघून जातो. अनेक वर्षे काम करूनही कर्मचारी निवृत्त झाल्यावर…
