Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सालाबादप्रमाणे यंदाही पिंपरी येथील सिंधी समाजातील समाजबांधवांनी चालिहो समाप्ती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

चालिहो म्हणजे सिंधी समाजातील समाजबांधव चाळीस दिवस उपास करतात. विशेषतः समाजातील महिला हे चाळीस दिवस उपवास मोठ्या प्रमाणात करतात या मध्ये पिंपरी मधील विविध झुलेलाल मंदिरे , गुरुद्वारा या मध्ये संतसंग, भजन कीर्तन आणि हे संस्कारातमक कार्यक्रमानंतर प्रसाद वाटप केले जाते. यामध्ये पिंपरी मधील विविध सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था, आणि विविध समाजातील बांधव सुध्दा मोठ्या प्रमाणात सहभागी होतात.या चाळीस दिवसांच्या कालावधीत सिंधी समाजातील लोक इतर समाजातील लोकांना सहभागी करून घेऊन समाजबांधव इतर समाजामध्ये सलोखा, प्रेम, निर्माण होण्यासाठी प्रयत्न करतात.

आज या चालिओ महोत्सवाची सांगता मोठ्या उत्साहात आणि पिंपरी मधील सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊन नदिकाठावरील झुलेलाल मंदिरे जवळ वाजत गाजत भजन म्हणत पवनामाई ला अख्खा म्हणजे मराठीमध्ये आपण अक्षदा म्हणतो त्या अर्पण करतात.

यावेळी घाटावरील झुलेलाल मंदिरात दिवसभर भजनाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाची नदीकाठी चांगल्या प्रकारे व्हावी यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी आणि पोलिस कर्मचारी जातीने उपस्थित राहुन स्वच्छता आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेत होते आणि समाजबांधव सुध्दा त्यांचे आभार मानताना दिसत होते.

या महोत्सवाच्या समाप्तीचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दिलीप मदनानी, भगवान लालवनकुमार मुथानी,मोहन खेमचंदानी,जामु चंद्रन,विशाल रोहारा,किशन माथानी, राजेश चांदवानी, अशोक मदानी, चंदर अचरा, हेमंत राजेश,इंद्रायन नाथांनी ताराचंद तरथानी,किशन माथानी, अजित कंजवानी,राजु नागपाल, मनोहर जेठवानी,आणि पिंपरी चिंचवड च्या माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर या स्व: हा दोन दिवस समक्ष उपस्थित राहुन सर्व योग्य पध्दतीने होण्यासाठी विशेष प्रयत्न करीत होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version