ताज्या घडामोडीपिंपरी

सुरक्षित ‘श्री जगन्नाथ यात्रा’ संपन्न करताना “पीएनएसकेएस” च्या “एसपीओंची” भूमिका मोलाची – जगदीश गौरांग दास

Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दरवर्षीप्रमाणे यंदाही (०७/०७/२०२४ रोजी) इस्कॉन रावेत संस्थेच्या वतीने श्री जगन्नाथ यात्रा पिंपरी चिंचवड शहरात संपन्न झाली. चिंतामणी चौक वाल्हेकरवाडी ते इस्कॉन मंदिर रावेत असा प्रवास करत यंदाची रथयात्रा “जय जगन्नाथ – हरे कृष्ण” नामाचा जयघोष करीत संपन्न झाली.शहरातील हजारो श्री जगन्नाथ भक्त भाविक या यात्रेमध्ये सहभागी झाले होते.भाविकांची संख्या मोठी असल्याने प्रमुख चौकात वाहतूक नियमन करण्यासाठी तसेच सुरक्षित यात्रा पार पाडण्यासाठी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या ६० स्वयंसेवकांनी मोलाची भूमिका पार पाडली.
    प्रथमतः भगवान श्री जगन्नाथाची आरती प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली. मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून यात्रेची सुरुवात झाली. या प्रसंगी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, मा.महापालिका आयुक्त शेखरसिंह, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, पीएनएसकेएस राज्य अध्यक्ष डॉ.विजयकुमार पाटील, इस्कॉन रावेत अध्यक्ष गौरांग दास, श्री जयप्रकाश दास, परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी उपस्थित होते.
    यंदाची यात्रा वाल्हेकरवाडी, प्राधिकरण, रावेत ह्या प्रमुख उपनगरातून मार्गस्थ होत असल्याकारणाने प्रमुख चौकात वाहतूक कोंडी न होण्यासाठी तसेच भाविकांना सुरक्षित यात्रा प्रवास करण्यासाठी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीने नियोजनबद्ध आराखडा बनविला होता.त्याप्रमाणे प्रत्येक चौकात स्वयंसेवक – एसपीओ यांनी त्यांची भूमिका सुरळीत पार पाडली. त्यामुळे यात्रा नियोजित वेळेत संपन्न झाली.इस्कॉन मंदिरामध्ये श्री जगन्नाथ यात्रेतील सेवा हेतू सहभागी सर्व समिती एसपीओंचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.त्यामध्ये सतिश देशमुख,अर्चना घाळी दाभोळकर, विशाल शेवाळे, संदीपनाना कुंबरे, संतोष चव्हाण,गौरी सरोदे,वैशाली पवळे, राजेंद्र कुंवर,राजेन्द्र येळवंडे, लक्ष्मण इंगवले, बळीराम शेवते, विजय जगताप, राम सुर्वे,तेजस सकट, नितीन मांडवे, तेजस सापरिया, कलाप्पा डोंगरे,भरत उपाध्ये, रामशरन चौहान, प्रकाश सुतार, संजय गोरखा, अभिजीत जोशी, उद्धव कुंभार, शशिकांत जमदाडे, सातप्पा पाटील, नितीन ढमणगे, संतोष ढमणगे,नितीन कराळे, अमित वाघ,सुभाष माने, संभाजी गुंजाळ, मंगेश सकपाळ,ललिता झामरे, जागृती वायकुळे, रमजान पटेल, प्रशांत जमदाडे, किशोर कदम, विजय चौगुले, राजेंद्र झावरे, गणेश सावंत,रोशन हांडे या एसपीओंचा समावेश आहे.
    स्वयंसेवकांचा सन्मान झाल्यानंतर इस्कॉन रावेत अध्यक्ष जगदीश गौरांग दास म्हणाले,” हजारो श्री जगन्नाथ भक्तांच्या सुरक्षेकरिता “पीएनएसकेएस” एसपीओ ,पोलीस मित्रांची कार्यप्रणाली सुरक्षित व सुरळीत दिसून आली, आंतराष्ट्रीय इस्कॉन भावनामृत कृष्णभक्त संघाच्या वार्षिक धार्मिक कार्यक्रमात यापुढे समितीचा सहभाग नक्की असेल.”
 जयप्रकाश दास यांनी सन्मानपत्र वाटप कार्यक्रमात प्रास्ताविक केले.अध्यक्ष जगदीश गौरांग दास यांनी आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button