Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘प्रजासत्ताक दिन’उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी औंधकॅम्प येथील २४ मराठा लाईट इन्फेनेटी कमांडर सुभेदार राम बाघेले, मा. नगरसेविका निर्मला कुटे, संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, सेक्रेटरी संदीप चाबुकस्वार या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापिका नाझनीन शेख, उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत, संतोष कापसे, विलास पोळ, शांताराम भालेराव, गोरख रोकडे, मयूर ओव्हाळ, बाळासाहेब शेंडगे, फहाद खान, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

प्री-प्रायमरी, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी, आठवी, नववीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले. प्री- प्रायमरीच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आल्या. बालचमूनी विविध राष्ट्रीय महापुरुषांच्या वेशभूषा केल्या होत्या त्यातून विविध एकतेचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी ढोल ताशाच्यागजरात लेझीम सादर केले, विद्यार्थ्यांना स्पोर्ट डे प्री प्रायमरी ते तिसरी पर्यंत बक्षिस वितरण व खाऊचे वाटप करण्यात आले. उर्मिला ठोंबरे व सुनंदा साळवी यांनी सूत्रसंचालन केले व आभार जयश्री घोलप यांनी मानले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version