Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल आयोजित “पीडीसीसी” च्या निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत नऊ आणि अकरा वर्षाखालील मुलींच्या गटात पिंपळे सौदागरची कन्या “शालवी चासकरने” प्रथम क्रमांक पटकविल्याबद्दल पिंपरी चिंचवड भाजपा कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी ट्रॉफी देऊन सन्मानित केले.

यावेळी  शत्रुघ्न काटे यांनी सांगितले कि,पिंपळे सौदागर मधील लहान मुले तसेच युवा वर्ग क्रीडा प्रकारात करत असलेली प्रगती हि एक खूप समाधानाची बाब आहे आणि त्यांचा खेळाडू वृत्तीला अजून चालना देण्यासाठी एक लोकसेवक या नात्याने सदैव प्रयत्नशील राहणार आहे तसेच प्रभागातील विविध खेळात पारंगत असलेल्या खेळाडूंना एक सकारात्मक दृष्टीने पुढील वाटचाल सोयीस्कर होण्याच्या दृष्टीने पुढाकार घेणार आहे .

यावेळी  शत्रुघ्न काटे यांनी “शालवी चासकर” हिचे आई वडील यांचे विशेष अभिनंदन केले.आपल्या मुलीला/मुलाला त्यांच्या आवडत्या खेळात सहभाग घेण्यापासून मज्जाव न करता त्यांना आपला पूर्ण पाठिंबा देऊन त्यांचं मनोधर्य उंचावणे हीच त्यांच्या यशाची खरी गुरुकिल्ली असते.
आज क्रिकेट,फुटबॉल यासारख्या खेळाचा बोलबाला असतांना देखील बुद्धिबळ सारखा माईंड गेम निवडल्याबद्दल तसेच आपल्या अपार मेहनतीने यश संपादन करणाऱ्या “शालवी चासकर” ला मिळालेल्या यशाबद्दल खूप शुभेच्छा दिल्या.

Share.
Leave A Reply

Exit mobile version