Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»सुधार‍ित आदेशानुसार बांधकामांसह गृहप्रकल्पांना मिळणार दिलासा पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी घेतला सकारात्मक निर्णय
ताज्या घडामोडी

सुधार‍ित आदेशानुसार बांधकामांसह गृहप्रकल्पांना मिळणार दिलासा पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी घेतला सकारात्मक निर्णय

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com4 September 2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Oplus_131072
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील बांधकाम आणि समुह गृहबांधणी प्रकल्पांना दिलासा मिळणार आहे. पाण्याची उपलब्धता असल्याशिवायपूर्वी बांधकाम परवानगी देण्यात येत नव्हती. मात्र यामध्‍ये सुधारणा करत सर्वसामान्य नागरिकांसह व्यवसायिकांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यात पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील समाव‍िष्ट 23 गावांसह प्राधिकरणाच्या हद्दीतील महानगरपालिका / नगरपाल‍िका हद्दीपासून ५ कि.मी अंतराच्या ग्रामीण कार्यक्षेत्रातील पर‍िसराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी शासन न‍िर्णायानुसार संबंध‍ित यंत्रणेची असणार आहे. त्यामुळे सदर क्षेत्रात सर्व नवीन / सुधार‍ित प्रकल्पास व‍िकास परवानगी म‍िळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी काढलेल्या या आदेशाचा प्राधिकरणातील व‍िकसनशील भाग असलेल्या २४२ गावातील शेकडो नागरिकांसह बांधकाम व्यासाय‍िकांना लाभ होईल.

पीएमआरडीए हद्दीतील विकसनशील भाग असलेल्यावरील 242 गावाव्यतिरिक्त नवीन विकास परवानगीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यात ज्या प्रकल्पास प्राधिकरण क्षेत्रासाठीची विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2018 नियम क्रमांक 27.2 मधील तरतुदीनुसार वेगवेगळ्या वापरासाठी आवश्यक तो पाणीपुरवठा समक्ष सार्वजनिक प्राधिकरणामार्फत मिळणार असल्याचे प्रमाणपत्र द‍िले असल्यास अशा प्रस्तावांना मंजुरी मिळेल. यात पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व एमआयडीसीची पाणी पुरवठा योजना अशा यंत्रणेमार्फत त्या-त्या भागाला पाणीपुरवठा करण्याचे प्रमाणपत्र सादर केले असेल तर किंवा ज्या प्रकल्पाच्या जागेवर विहीर अथवा बोअरवेल असेल अशाबाबतीत भूजल सर्वेक्षण आणि विकास संस्था यांचेकडून प्रत्यक्षात उपलब्ध होणारे पाणी पडताळणी प्रमाणपत्र प्रस्तावासोबत सादर झाले असल्यास अशा प्रस्तावांना मंजुरी देण्यात येणार आहे.

वर‍ील २४२ गावांव्यत‍िर‍िक्त सुधारित रहिवास वापराच्या समूह गृहबांधणी प्रकल्पासाठी व‍िकास परवानगी / भोगवटा प्रमाणपत्र मिळण्याच्या दृष्टीने पण मार्ग मोकळा झाला असून जी प्रकरणे सुधार‍ित व‍िकास परवानगीसाठी अथवा भोगवटा प्रमाणपत्र म‍िळण्यासाठी दाखल आहेत, अशा प्रकरणात ग्रामपंचायतीने पुर्वी पाणीपुरवठ्याबाबत हमीपत्र दिले असेल तर त्यांचे प्रस्ताव मार्गदर्शनास्तव प्राधिकरणाच्या कार्यकारी सम‍ितीकडे पाठव‍िण्यात येणार आहे. त्यामुळे अशा प्रस्तावांना आगामी काळात पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय होण्यात मदत होईल. तसेच कार्यकारी सम‍िती सदरचा न‍िर्णय प्राप्त होईपर्यंत प्रकरणी न‍िर्माण झालेले त्रयस्त हितसंबंध व रेरा कालमर्यादा व‍िचारात घेऊन पुर्व बांधलिकीनुसार सुधार‍ित व‍िकास परवानगी / भोगवटा प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया प्राधिकरणामार्फत सुरू राहील.

नवीन / सुधार‍ित समूह गृहबांधणी प्रकल्पा व्यत‍िर‍िक्त इतर सर्व प्रकल्पाच्या बांधकाम परवानगी व भोगवटाकर‍िता जागेवर विहीर, बोरवेल असेल व पुरेसे पाणी उपलब्ध असल्यास अशा प्रस्तावास मंजुरी म‍िळेल. यासह संबंध‍ित पाणी जागेवर पाणी शुद्धीकरण (आरो प्लांट) यंत्रणा उभारणे आवश्यक असेल. पीएमआरडीएच्या या आदेशामध्ये वरील २४२ गावे वगळता उर्वरि‍त गावात नवीन समूह गृहप्रकल्पा व्यत‍िर‍िक्त इतर कोणतेही बांधकाम प्रकल्पाची परवानगी शक्यतो, थांबवण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र नागरिकांसह व्यवसायिकांनी नियमानुसार आपले प्रस्ताव दाखल करावे, असे कळविण्यात आले आहे.

भोगवटा प्रमाणपत्र मिळणार
जी समुह गृहबांधणी प्रकरणे भोगवटा प्रमाणपत्र म‍िळण्याकर‍िता दाखल आहे किंवा ज्यांना भोगवटा म‍िळालेला आहे अशा प्रकल्पामध्‍ये न‍िर्माण झालेला त्रयस्त हितसंबंध व रेरा कालमर्यादा व‍िचारात घेता अशा प्रकरणात पुर्व बांधलिकी व‍िचारात घेऊन कार्यवाही चालू राहणार आहे. तसेच अशी प्रकरणे प्राधिकरणाच्या कार्यकारी सम‍ितीकडे (EC) व पाणी पुरवठा योजना तयार करण्यासाठी अभ‍ियांत्रिकी व‍िभागाकडे सादर करण्यात येणार आहे.

 

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमरावे परी किर्तीरूपी उरावे; अवयवदानाच्या निर्णयामुळे प्रसाद अजूनही जिवंत आहे!
Next Article चिंचवड विधानसभेचे मैदान मोठया मताधिक्याने जिंकू : पंकजा मुंडे
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.