सामाजिक कार्यकर्ते मधुकर बच्चे यांची वुई टुगेदर फाउंडेशनच्या सल्लागार पदी नियुक्ती

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे शहरात आणि पिंपरी चिंचवड शहरात तसेच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण दुर्गम आदिवासी,अल्पभूधारक भागात कार्यरत असलेल्या वुई टुगेदर फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या सल्लागारपदी चिंचवड येथील तरुण सामाजिक कार्यकर्ते तसेच महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संस्थेच्या सर्व समावेशक ध्येयधोरणा अंतर्गत नागरी समस्या निवारणासाठी शासकीय प्रशासनिक विविध अधिकाऱ्यांना जनसंपर्क करावा लागतो,नागरिकांच्या विविध नागरी समस्या सोडवताना मागील तीन वर्षात मधुकर बच्चे यांनी पालिकेच्या जनसंवाद सभा,लोकशाही दिन, प्रशासकीय स्तरावर ताळमेळ साधून समस्या निवारण केलेल्या आहेत.
संस्थेकडे अशा प्रकारे एक समन्वयक दुवा म्हणून मधुकर बच्चे यांनी खूप मदत केलेली आहे,त्याच बरोबर गरजू महिलांचे अडचणी निवारण करताना त्यांची मोलाची मदत झालेली आहे.
विशेषतः आदिवासी भागात संस्थेच्या माध्यमातून काम करताना संस्थेला त्यांनी वेळोवेळी औषधे,व्हिटॅमिन गोळ्या,किराणा, कपडालत्ता आदी अनेक प्रकारची मदत निरपेक्ष वृत्तीने दिली आहे.
त्यांच्या एकूण योगदानामुळे वुई टुगेदर फाऊंडेशन कार्यकारिणीने *मधुकर बच्चे यांना सल्लागार मंडळात* घेण्याचा निर्णय एका बैठकीत घेण्यात आला.अर्थात श्री.मधुकर बच्चे यांची वुई टुगेदर फाऊंडेशन या संस्थेच्या सल्लागार पदी नियुक्ती करण्यात येत आहे.
या संस्थेत सल्लागार म्हणून निवड करण्यात आली व सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. या वेळी संस्थेचे संस्थापक क्रांतीकुमार कडुलकर, अध्यक्ष सलीम सय्यद, सचिव जयंत कुलकर्णी, खजिनदार दिलीप चक्रे, उपाध्यक्ष दिलीप पेटकर, शंकर कुलकर्णी, झाकीर सय्यद, सदाशिव गुरव, अनिल शिंदे, रविंद्र काळे, धनंजय मांडके, श्रीनिवास जोशी, उल्हास दाते, शैलजा कडुलकर, सोनाली शिंदे, आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांच्या उपस्थित होते.












