संजोग वाघेरे मावळमधून शिवसेनेचे उमेदवार ?

मुंबई , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक संजोग वाघेरे यांनी घेतली शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट. – पिंपरी- चिंचवडमधील राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जाहीर. दोन दिवसात होणार पक्षप्रवेश भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत त्यांनी महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज बरोबर प्रतिक्रिया दिली ते म्हणाले , पक्षावर माझी नाराजगी नाही. आता पर्यंत तीन ते चार वेळा उमेदवारी मिळाली नाही. राहुल नार्वेकर, पार्थ पवार यांना संधी दिल्याने मला उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडे माझी इच्छा व्यक्त केली आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे प्रवेश केला नाही. उमेदवारी संदर्भात ते त्यांच्या वरिष्ठ नेत्यांशी, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील आणि मला कळवतील असे त्यांनी सांगितले.
वाघेरे यांच्या भेटीमुळे पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून आता ते नेमकी काय भूमिका घेत आहेत हे पण महत्त्वाचे ठरणार आहे याकडे लक्ष आहे.आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे प्रवेश केला नाही. पुढील भूमिका लकवरच स्पष्ट करणार असल्याचे संजोग वाघेरे यांनी महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजशी बोलताना सांगितले.
.













