Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिक आरोग्य दिन सप्ताह निमित्त लोकांचे आरोग्य सुदृढ राहावे,आजारापासून दूर राहावे,तसेच आरोग्याची काळजी कशी घ्यावी आदी प्रबोधन व्हावे म्हणून वेदस्पर्श क्लिनिक आणि वुई टुगेदर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गोयल गरिमा हॉल,केशव नगर चिंचवड येथे आयुर्वेद माहितीपर व्याख्यान आयोजित करण्यात आले.

या वेळी वैद्य गीतांजली क्षिरसागर यांनी आयुर्वेद, पंचकर्म, आहार मार्गदर्शन तसेच व्यायामाचे महत्त्व अश्या विविध विषयांवर अत्यन्त महत्त्वपूर्ण व लोकांना समजेल अश्या पद्धतीने माहिती दिली.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे हे उपस्थित राहून लोकांना आरोग्याचे महत्व,आहार,व व्यायाम आदी मनोगत व्यक्त केले.

उपस्थित नागरिकांमधुन तीन लक्की ड्रॉ काढून विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.या उपक्रमास नागरिकांकडून खूप छान प्रतिसाद मिळाला व उपक्रमाबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले
अध्यक्ष मधुकर बच्चे, सलीम सय्यद,जयंत कुलकर्णी,मंगला डोळे – सपकाळे,दिलीप चक्रे,रवींद्र सागडे,अनिल पाटोळे,रवींद्र काळे,श्री अर्जुन पाटोळे,शंकर कुलकर्णी, पाटोळे ताई , अरविंद पाटील,आपर्णा कुलकर्णी,हेमलता सुतार, समीर दरेकर,मोनाली खांडेकर,प्रतीक्षा इंगळे,अनिता मुंडे,संतोष भवार,आदींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यास मोलाचा सहभाग घेतला.तसेच चिंचवड परिसर मधील सुजान नागरिक यांचा देखील उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.सचिव जयंत कुलकर्णी यांनी आभार मानले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version