Spread the love

 चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज मध्ये सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम चे आयोजन प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन व्याख्याते प्रदीप लोखंडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते व्याख्याते प्रदीप लोखंडे, वी.आर. रासकर,  वर्ल्ड नेटवर्किंग सर्विसेसच्या प्रतिनिधी शिरीन अली, व्हिएतनामचे टांच यांचा स्मृतिचिन्ह तर; यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावरती प्राचार्य डॉ.ए.के. वाळुंज, उपप्राचार्य डॉ.क्षितिजा गांधी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया आदी मान्यवर उपस्थित होते.
व्याख्याते प्रदीप लोखंडे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले,  जागतिक पातळीवर आपला भारत देश प्रगती पथावर जात आहे. तुम्ही चार वर्षे कठोर परिश्रम व शिक्षण ही जीवनात यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे. याच्या विद्यार्थ्यांनो विसर पडता कामा नये, ध्येय गाठण्याचा ध्यास अंगीकारून सकारात्मक जीवनशैली आत्मसात करा, जबाबदारी पासून दूर जाऊ नका. स्वतःवर अपार विश्वास ठेवत यश संपादन करा. जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण हेच काळाची गरज असून त्यापासून दूर जाऊ नका. नकारात्मक विचारसरणीमुळे स्वतःचे, कुटुंबांचे, पर्यायाने देशाचे नुकसान होते हे लक्षात ठेवा. युवकांनी परदेशाचे आकर्षण दूर ठेवून आपल्या भारत देशात काय चांगले आहे, आपल्या भारत देशाचा विकासासाठी आपल्याला कोणता हातभार लावता येईल, याचा विचार करा.
संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, आज विविध क्षेत्रात स्पर्धा असली तरी युवकाना प्रचंड संधी देखील आहे, त्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण पूर्ण करा. स्वतःविषयी अहंकार बाळगू नका. पदवी घेऊन नोकरी करणारे फक्त होऊ नका, स्वतःच्या व्यवसाय सुरू करून नोकरी देणारे बना. त्यासाठी तुम्हालाच पुढे यावे लागणार आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी जी मदत लागेल त्यासाठी शिक्षण संस्था तुमच्या पाठीशी असेल हे लक्षात ठेवा. यावेळी व्याख्यात्या शिरीन अली, प्राचार्य डॉ. ए.कें. वाळुंज, उपप्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, डॉ.जयश्री मुळे, डॉ.रूपा शहा यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय शिक्षण योजना 20-20 व सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत वॉरियर्सनी जनजागृती पर पथनाट्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. हर्षिता वाच्छानी तर; आभार डॉ.श्रुती गणपुले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी विशेष परिश्रम घेतले.
Share.
Leave A Reply

Exit mobile version