Spread the love

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –   पुण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील  मोटार वाहन निरीक्षक अभिजित गायकवाड यांनी बुधवार ऑगस्ट ला जेजुरी येथील फ्लाईंग राहिनो पॅरामोटार यांच्याकडे प्रत्यक्ष जाऊन २५०० फूटउंचावरुन पॅरामोटरींग करत रस्ता सुरक्षा जनजागृती होण्याच्या दृष्टीकोनातून ११ विविध प्रकारचे रस्ता सुरक्षाविषयक संदेश फलक दाखवून  इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मध्ये नोंद केली.

रस्ता सुरक्षाविषयक संदेश फलक    एका पाठोपाठ एक असे दाखवून एक अनोखा व प्रेरणादायी उपक्रम केला. या उपक्रमाची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मध्ये झाली आहे. त्याअनुषंगाने
मेडल आणि प्रमाणपत्रे प्राप्त झाली आहेत.
ही उल्लेखनीय बाब असून रस्ता सुरक्षा संदेश जनमाणसांमध्ये प्रसारित करण्याच्या महत्वपूर्ण व
उल्लेखनीय कामगिरीबद्दल  महाराष्ट्र  शासनाकडून  हार्दीक अभिनंदन करण्यात आले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version