Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»मुख्यमंत्र्यांच्या रेकॉर्ड ब्रेक ‘महा रोड शो’ने बारणे यांच्या प्रचाराची सांगता
ताज्या घडामोडी

मुख्यमंत्र्यांच्या रेकॉर्ड ब्रेक ‘महा रोड शो’ने बारणे यांच्या प्रचाराची सांगता

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com11 May 2024Updated:12 May 2024No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ आज (शनिवारी) पिंपरी-चिंचवड शहरात झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘महा रोड शो’ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्यानिमित्त जोरदार शक्तीप्रदर्शन करत बारणे यांच्या प्रचाराची मोठ्या धुमधडाक्यात सांगताही झाली.

मुख्यमंत्र्यांच्या ‘महा रोड शो’मध्ये खासदार बारणे, आमदार अण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, उमा खापरे, महेंद्र थोरवे, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप तसेच अपर्णा डोके, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, अश्विनी चिंचवडे, राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, चंद्रकांता सोनकांबळे, मयूर कलाटे, सचिन चिखले, निलेश बारणे, महेश बारणे, सीमा सावळे, तुषार हिंगे, मोरेश्वर शेडगे, संदीप वाघेरे, सुनील पाथरमल, बाळासाहेब वाल्हेकर, प्रकाश मलशेट्टी, निलेश तरस, राजेंद्र तरस, कुणाल वाव्हळकर, आशा शेंडगे, डब्बू आसवानी, संतोष बारणे, माया बारणे आदी पदाधिकारी, माजी नगरसेवक व हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

ढोल-ताशांचा दणदणाट आणि फटाक्यांचा कडकडाटात क्रेनच्या सहाय्याने फुलांचे भले मोठे हार घालत, फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत, भगव्या कागदांच्या तुकड्यांचा पाऊस पाडत चौका-चौकात मुख्यमंत्री शिंदे व खासदार बारणे यांचे जंगी स्वागत करण्यात येत होते. भगवे झेंडे, भगव्या टोप्या, भगवे फेटे घातलेले तरुण दुचाकीस्वार तसेच शेकडो मोटारी सहभागी झाल्याने महा रोड शोचा संपूर्ण मार्ग ‘भगवा’ झाला होता.

भगवे फेटे व भगव्या साड्या परिधान केलेल्या महिलांची उपस्थिती ही लक्षणीय होती. कडाक्याचे ऊन असतानाही रस्त्याच्या दुतर्फा कार्यकर्ते व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मुख्यमंत्री शिंदे व खासदार यांनी हात उंचावून अभिवादन केले की एकच जल्लोष होत होता.

बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे स्वतः उपस्थित राहिले होते. त्यावेळी मिरवणुकीत देखील ते सहभागी झाले होते. त्यानंतर ते प्रचाराच्या सांगतेसाठी पुन्हा आवर्जून मावळ मतदारसंघात आल्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसून येत होते.

चिंचवड येथील चापेकर चौकातून दुपारी सव्वाबारा वाजता क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या शिल्पसमूहास अभिवादन करून मुख्यमंत्र्यांच्या महा रोड शोचा प्रारंभ झाला. चिंचवड गावातील पॉवर हाऊस चौक, लिंक रोड, तानाजी गावडे चौक, भाटनगर, इंदिरा गांधी उड्डाणपूल, शगुन चौक, साई चौक, गुरुद्वारा, जयहिंद स्कूल चौक, काळेवाडी नदी पूल, काळेवाडी रोड, पंचनाथ चौक, एम एम स्कूल, बीआरटी रोड, तापकीर चौक, रहाटणी चौक, काळेवाडी फाटा, बेलठीकानगर 16 नंबर, संतोष मंगल कार्यालय, गुजर नगर, वाकड रोड चौक या मार्गे डांगे चौक, असा महा रोड शोचा मार्ग होता. डांगे चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ ठीक पावणेतीन वाजता या महा रोड शोची सांगता झाली.

*मोदी व बारणे यांची हॅटट्रिक निश्चित – मुख्यमंत्री*

नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाची तर श्रीरंग बारणे यांची खासदारकीची हॅटट्रिक निश्चित आहे, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘रोड शो’ची सांगता करताना व्यक्त केला. 42 अंश तापमान असतानाही हजारो लोक हसतमुखाने रोड शोमध्ये सहभागी झाले होते. आमचे स्वागत करत होते. रस्त्याच्या दुतर्फा माणसांची गर्दी होती. इथले मतदार आनंदी व खूश दिसले. सर्वांच्या चेहऱ्यावर एवढा आनंद मी पहिल्यांदाच पाहिला. गेली दहा वर्षे पंतप्रधान मोदी यांनी केलेले काम व गेल्या दोन वर्षातील महायुती सरकारचे काम याची पोचपावती 13 मेला मतदानातून द्यायची आहे आणि चार तारखेला विरोधकांचे बारा वाजवायचे आहेत, असे शिंदे म्हणाले.

*महायुती 45 पार जागा जिंकणार – एकनाथ शिंदे*

राज्यात मतदानाचे तीन टप्पे पार पडले आहेत आणि चौथ्या टप्प्याचे मतदान 13 तारखेला होत आहे. कोणी काहीही बोलू देत, पण राज्यात महायुती 45 पार जागा जिंकणार, हे निश्चित आहे, असे भाकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

महिलांना लोकसभा व राज्यसभेत 33 टक्के आरक्षण देण्याचा क्रांतिकारक निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतला आहे. त्यामुळे सकाळी महिलांनी आधी मतदान करावे व नंतर कुटुंबातील सगळ्यांचे मतदान करून घ्यावे, असे आवाहन शिंदे यांनी केले. तुमचे एक मत विकास करणार आहे, देश घडवणार आहे, बारणे यांना खासदार करणार आहे आणि मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

बारणेंना मंत्रिपद हवे, आधी 80 टक्के मतदान करा!

मावळ मतदारसंघात गेल्यावर निवडणुकीत 63 टक्के मतदान झाले होते. यावेळी 80 टक्के मतदान करा आणि पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळवा, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यावर एका महिला कार्यकर्ती म्हणाली, ‘बक्षीस म्हणून आप्पांना मंत्रीपद द्या’. त्यावर हजरजबाबीपणे मुख्यमंत्री शिंदे उत्तरले, ‘आधी 80 टक्के मतदान तर करून दाखवा!’

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleश्रीरंग बारणेंनी त्यांना दोन वेळा खासदार करणा-या नेतृत्त्वाशी गद्दारी केली – संजोग वाघेरे पाटील
Next Article मतदारांना मतदानासाठी ओळखपत्र अनिवार्य; १०० मीटर परिसरात मोबाईल नेण्यास प्रतिबंध
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.