Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»मावळ लोकसभेच्या निवडणुकीत गद्दारांना त्यांची जागा दाखवा: खासदार ओमराजे निंबाळकर
ताज्या घडामोडी

मावळ लोकसभेच्या निवडणुकीत गद्दारांना त्यांची जागा दाखवा: खासदार ओमराजे निंबाळकर

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com26 March 2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

– कोणाच्याही दबावाला बळी न पडता निर्भीडपणे संजोग वाघेरे पाटलांच्या मागे उभे रहा

– संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ काळेवाडीत धाराशिवकरांची बैठक

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही कोणत्याही एका राजकीय पक्षाची दुसर्‍या राजकीय पक्षाशी राहिलेली नाही. ही लढाई आता निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशी होणार आहे. निष्ठा ही आमच्या धाराशिवकरांच्या रक्तातच आहे. त्यामुळे मावळची जनताच त्यांना जागा दाखवून देईल. त्यामुळे आगामी निवडणुकीत गद्दारांना त्यांची जागा दाखवून द्या आणि मावळमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे, असे आवाहन धाराशिव लोकसभेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पिंपरी चिंचवड शहरातील मराठवाड्यातील नागरिकांना केले.

काळेवाडी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ धाराशिव फाउंडेशनतर्फे आयोजित आढावा बैठकीत खासदार ओमराजे निंबाळकर बोलत होते. या बैठकीसाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) संघटक एकनाथ पवार, जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, उपजिल्हाप्रमुख दस्तगीर मनियार, उपशहरप्रमुख हरेश नखाते, युवराज कोकाटे, धाराशिव फाऊंडेशनचे संदीप शिंदे, सतीश साळुंखे, नरसिंग माने, गणेश पाडुळे, दत्ता गिरी, प्रदीप शिंदे, जनार्धन गिलबिले, राम पाटील, एकनाथ मंजाळ, गणेश वायभट, महादेव बिकट, अमोल राठोड, सागर शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच धाराशिव जिल्हा आणि मराठवाड्यातील नागरिक, बंधू-भगिनी मोठ्या संखेने उपस्थित होते.

खासदार ओमराजे निंबाळकर पुढे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर वाईट नजर टाकणा-यांना‌ धडा शिकविण्यासाठी निष्ठावंत शिवसैनिक आणि महाराष्ट्रातील स्वाभीमानी नागरिक तयार आहेत. या निवडणुकीत आपण सर्व‌ मिळून हे करून दाखविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यासह शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या पाठीशी उभा राहून त्यांना लोकसभेत पाठवण्याचा संकल्प त्यांच्यासह मराठवाड्यातील उपस्थित नागरिकांनी केला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी पिंपरी चिंचवड शहरात मराठवाड्यातील नागरिक मोठ्या संख्येने आहेत. या बैठकीत जनतेचा भरघोस पाठिंबा पाहून आणि लोकसभेत पाठवण्यासाठी ठामपणे पाठीशी राहण्याचा निर्धार व्यक्त केल्याबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार मानले. तसेच मराठवाड्याच्या राजकारणातील अभेद्य जोडी धाराशिवष लोकसभेचे खासदार ओमराजे निंबाळकर व कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांचा लाखमोलाचा पाठींबा म्हणजेच महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचेही वाघेरे पाटील यावेळी म्हणाले.

या‌ बैठकीचे‌ सूत्रसंचालन गोरख पाटील यांनी केले. तर आभार हरेष नखाते‌ यांनी मानले.

मावळ आणि धाराशिव लोकसभेचा विजयी‌ मेळावा एकत्रित होणार: आमदार‌ कैलास पाटील

या‌ बैठकीला उपस्थित मराठवाड्यातील निष्ठावंत आमदार कैलास पाटील म्हणाले की, मावळकरांनो, कोणाच्याही निर्भीडपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आणि संजोग वाघेरे पाटलांच्या मागे उभे रहा. यंदाच्या मावळ आणि धाराशिव लोकसभा निवडणुकीतील विजयी मेळावा याच ठिकाणी दोन महिन्यांनंतर एकत्रित घेऊ आणि विजयी गुलाल उधळू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसंच, महाविकास आघाडीतील शिवेसना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ विजयासाठी मराठवाड्यातील जनतेने निष्ठेने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article‘शिवतांडव’ या ऐतिहासिक नाटकाचा गुरुवारी शुभारंभ
Next Article उपयाेग कर्ता शुल्काशिवाय मालमत्ता कर भरा
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.