ताज्या घडामोडीपिंपरी

मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने पूरूषांनी वाजत गाजत  सात फेरे मारून वटपौर्णिमा केली साजरी 

Spread the love

 

पिंपळे गुरव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपळे गूरव येथे मानवी हक्क संरक्षण आणि  जाग्रतीच्या वतीने 2016 पासून वटसावित्री  पौर्णिमा सातत्याने साजरी केली जाते.महाराष्ट्रात पूरूषांनी वटसावित्री साजरी करण्याचा पहिला उपक्रम राबणारी हि संस्था आहे.प्रत्येक महिला वटवृक्षाप्रमाणे  आपल्या पतीला दीर्घ  आयुष्य लाभावे व सात जन्मी हाच पती परमेश्वर म्हणून मिळावा म्हणून  दीर्घ आयुष्य आसणाऱ्या वटवृक्षाची पुजा करण्याची प्रथा आहे म्हणून आम्ही सात जन्म हिच पत्नी मिळावी म्हणून सात फेरे मारले.  मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्यावतीने पूरूषांनी वाजत गाजत  सात फेरे मारून केली वटपौर्णिमा साजरी  करण्यात आली.

विकास कुचेकर म्हणाले की महीलांनी वटवृक्षाची फाद्यी न तोडता प्रतिकात्मक किंवा त्या वटवृक्षाच्या जवळ जाऊन पुजा करावी. पर्यावरणाचा समतोल राखावा पुढील पिढीला जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळण्यासाठी वटवृक्षाची लागवड करून जतन करण्याचे त्यांनी आव्हान केले.

अरुण पवार म्हणाले कि कोरोना काळात अनेकांना ऑक्सिजन आभावी आपले प्राण गमवावे लागले ,याचे गांभीर्य ओळखुन वृक्ष लागवड केली पाहिजे, आजचे वृक्षारोपण म्हणजे उद्याच्या पिढीसाठी  ऑक्सिजनची सोय असे म्हणाले.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे उपायुक्त मनोज पाटील म्हणाले  की उच्च शिक्षित स्त्री व पुरुषामध्ये घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढले आहे अशा समानतेच्या जनजागृतीच्या उपक्रमामुळे त्यांच्यातील दरी कमी होण्यास मदत होईल आणि नऊ वर्षापासून पुरुष वटपौर्णिमा आयोजकाचे त्यांनी कौतुक केले.

शहराध्यक्ष आण्णा जोगदंड म्हणाले की पत्नी व पती यांना समान कायद्याने आधिकार दिले आहेत.पुरूषप्रधान देशात महिला पण पूरूषांच्या खांद्याला खांदा देऊन खुरपणी पासुन ते नासापर्यत प्रत्येक क्षेत्रात महिला कार्यरत आहेत.पंतप्रधान पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत महीला पोचल्या आहेत,तरीही त्या पतीला दिर्घ आयुष्य मिळावे म्हणून 150 वर्षे आयुष्य आसणाऱ्या वटवृक्षाला सात फेरे प्रदिक्षणा घालतात मनोभावे पुजा करतात .मग पुरुषांनेही जन्मोजन्मी हिच पत्नी मिळावी आणि पत्नीला दिर्घ आयुष्य मिळावे व सात जन्म हिच पत्नी मिळावी म्हणून वटवृक्षाची सात फेरे मारून वटपौर्णिमा साजरी केली तर वावगे ठरू नये.म्हणून आम्हाला सात जन्म हिच पत्नी मिळावी म्हणून आम्ही वटवृक्षाची फेऱ्या मारून सुत घालून,सनई,वाद्य वाजवून मनोभावे पूजा केल्याचे समाधान मिळाले असे आयोजक व पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आन्ना जोगदंड यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना सांगितले.सर्वांना वाजतगाजत मिरवणूक काढून वटवृक्षा पर्यंत आणले.
पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड म्हणाल्या की आमच्यासाठी पुरूषांनी सात फेऱ्या मारुन आमच्यासाठी दिर्घ आयुष्य मागीतले यामुळे खूपच आनंद झाला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुरुष वटपौर्णिमा साजरी केल्याने आम्ही सर्व महीला आनंदी झालोत.
शंकर नानेकर म्हणाले कि आजही शासन म्हंणत कि स्त्री पुरुष समान आहेत व शासनाच्याच रोजगार हमी योजने मध्ये स्त्रीला पुरुषापेक्षा कमी रोजगार दिला जातो आणि तसेच संसदेत सुद्धा 33 टक्के आरक्षण मिळत नाही अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढया  संसदेत महिला खासदार आहेत म्हणजेच शासनाचे फक्त बोलायचे एक आणि करायचे असं सरकारच काम चालू आहे असं मला वाटतं.
संजना करंजावणे म्हणाल्या कि मला खंत व्यक्त कराविशी वाटते कि. नुकतेच जागतिक आर्थिक मंच (डब्ल्यू इ एफ) कडून जारी करण्यात आलेल्या जागतिक लिंग आधारित निर्देशांकांत (ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स )नुसार 146 देशाच्या रँकिंग मध्ये 140 कोटी लोकसंख्या असलेल्या भारताची स्त्री पुरुष समानतेच्या बाबतीत 127 वा क्रमांक आहे तर आईसलँड देशाचा पहिला क्रमांक आहे.म्हणजे आपण किती मागे आहोत हे मला सांगावयाचे आहे.
वृक्ष मित्र अरुण पवार यांनी पर्यावरण संरक्षण आणि सर्वधनाची ,व प्लास्टिक न  वापण्याची शपथ नागरिकांना देण्यात आली.

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर, शहराध्यक्ष आन्ना जोगदंड, कामगार कल्याण उपायुक्त मनोज पाटील,पिंपरी चिंचवड महीला अध्यक्षा मिना करंजावणे पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष   वृक्ष मित्र अरुण पवार, जेष्ट प्रबोधनकार शारदा मुंडे,गुणवंत कामगार काळुराम लांडगे,कार्याध्यक्ष गजानन धाराशिवकर,अमोल लोंढे, विकास शहाणे,सुरेश कंक,प्रकाश बंडेवार, राजेंद्र गोराने,आरोग्य मुकादम विजय कांबळे,लक्ष्मन जोगदंड,जाई जोगदंड,रमेश थोरात, प्रदिप बोरसे,  जालिंदर दाते,शंकर नानेकर,शामराव सरकाळे, प्रकाश सावंत, सचिन करंजावणे,इंद्रजित चव्हाण, सारंगी करंजावणे आदी  उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button