ताज्या घडामोडीपिंपरी

प्रभाग २२ मध्ये भाजपचा रणसंग्राम! पंचनाथ महाराजांच्या दर्शनाने प्रचाराचा शंखनाद; आमदार शंकर जगतापांचा विरोधकांना थेट इशारा – ‘विकास करूनच दाखवणार!’”

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक २२ मध्ये भारतीय जनता पार्टीने आक्रमक शक्तिप्रदर्शन करत प्रचाराची दिशा ठामपणे निश्चित केली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेमुळे संपूर्ण प्रभागातील राजकीय वातावरण अक्षरशः तापले आहे.

ग्रामदैवत पंचनाथ महाराजांचे दर्शन घेऊन पदयात्रेने प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर ज्योतिबा गार्डन येथे झालेल्या भव्य जाहीर सभेला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. सभास्थळी पोहोचताच भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला, तर विरोधकांच्या गोटात खळबळ उडाल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
सभेत बोलताना आमदार शंकर जगताप यांनी अत्यंत आक्रमक शैलीत विरोधकांवर थेट हल्लाबोल केला. “काळेवाडीचा विकास म्हणावा तसा झाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. आता फक्त टीका नाही तर प्रत्यक्ष काम करून दाखवण्याची वेळ आली आहे,” असे ठणकावून सांगत त्यांनी भाजपच्या चारही उमेदवारांचा निर्धार जाहीर केला.

“काळेवाडीचा विकास हाच आमचा एकमेव अजेंडा आहे. शब्द नव्हे तर काम बोलणार, आणि तो विकास करूनच दाखवणार,” असा ठाम विश्वास त्यांनी नागरिकांना दिला. पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, भाजपच्या चारही उमेदवारांसोबत स्वतः खंबीरपणे उभा राहून प्रत्येक विकासकामाची जबाबदारी ते स्वतः घेणार आहेत.

या सभेत रस्ते, पाणीपुरवठा, गार्डन, स्वच्छता, लाईट व इतर मूलभूत नागरी सुविधांसाठी ठोस आणि कालबद्ध विकासकामे करण्यात येतील, असे ठाम आश्वासन देण्यात आले. या आक्रमक घोषणांनी प्रभाग २२ मधील राजकीय समीकरणे बदलू लागल्याचे चित्र आहे.

या सभेमुळे भाजपने प्रभाग २२ मध्ये प्रचाराचा स्पष्ट शंखनाद करत विरोधकांवर मानसिक आघाडी घेतली आहे. विकासाच्या मुद्द्यावर थेट मैदानात उतरलेल्या भाजपसमोर विरोधक बचावात्मक भूमिकेत गेले असून, येत्या काळात प्रभाग २२ मधील लढत अत्यंत चुरशीची आणि निर्णायक ठरणार, हे निश्चित मानले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button