Spread the love

 

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर आणि शिशुविहार मराठी माध्यम पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालय आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने आकुर्डी गावठाण परिसरातून प्लास्टिक मुक्त शहर जनजागृती अभियानाचे आयोजन केले होते यामध्ये 300 शालेय विद्यार्थ्यांनी व शाळेच्या शिक्षकांनी सहभाग घेतला होता या जनजागृतीमध्ये विद्यार्थ्यांनी प्लास्टिकचा वापर टाळा हा नारा दिला.

प्लास्टिक हटवा शहर वाचवा. प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करा पर्यावरणाशी नाते जोडा प्लास्टिकचा वापर सोडा असा संदेश दिला यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती योगिता काळे संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नंदकुमार ढोले मनोज मेदनकर वर्षा शिंदे सुलभा दरेकर विकास गायकवाड संजीत पद्मन जयवंत सूर्यवंशी विद्या भागवत पल्लवी नायक यांनी संयोजन केले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version