Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»भोसरी येथील बांधकाम कामगारांचा मृत्यू दुर्दैवी;शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली घटनास्थळाला भेट
ताज्या घडामोडी

भोसरी येथील बांधकाम कामगारांचा मृत्यू दुर्दैवी;शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली घटनास्थळाला भेट

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com25 October 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

कामगारांची नोंदणी अनिवार्य करण्यासाठी मोहीम सुरू करणे आवश्यक

भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरी येथे पाण्याची टाकी कोसळून दुर्घटना झाली त्या ठिकाणाला शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी सांगितले की, ऐन सणासुदीच्या तोंडावर कामगारांवर जो प्रसंग ओढवला आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे. या ठिकाणी लेबर कॅम्पमधील कामगारांसाठी तकलादू पद्धतीने पाण्याची टाकी उभारली असल्याचे प्रथमदर्शनी कळते आहे. येथील ठेकेदाराने येथील टाकीची बांधणी व्यवस्थित केली असती तर हा प्रसंग ओढवला नसता. तसेच येथील कामगार हे कुठून आलेले आहेत याची माहिती पूर्णपणे नाही. कामगार विभाग आणि महापालिका सातत्याने कामगारांची नोंदणी व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे. यातून कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लागू शकतो. जे श्रमिक कामगार आहेत त्यांची अधिकृतपणे नोंदणी होणे आवश्यक आहे. नोंदणी झाल्यानंतर त्यांना जे लाभ मिळतात त्याबद्दल कामगार अनभिज्ञ असल्याचे दिसत आहे. बऱ्याचदा हे लाभ द्यावे लागू नयेत म्हणून कंत्राटदार त्यांची अधिकृत नोंदणी करण्यास विलंब करत असतात त्यामुळे कामगारांची नोंदणी अनिवार्य करण्यासाठी मोहीम सुरू करणे आवश्यक असल्याचे मत शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

*याखेरीज पिंपरी चिंचवड भागात सर्वच ठिकाणी कामगारांची नोंदणी होण्यासाठी तपासणी मोहिम चे आयोजन करावे, याखेरीज ज्या ज्या ठिकाणी लेबर कॅम्प आहेत तेथे मोबाईल व्हॅनने काय सोयी सुविधांची तरतुद केली आहे याची देखरेख करणारी नोंदणी व तपासणी सुरू करावी.या घटनेतील मृत्युमुखी पडलेले कामगार हे बाहेर राज्यातील असल्याने त्या त्या राज्यातील प्रशासनाला यासंदर्भात माहिती देऊन त्यांच्या परिवाराला कळवावे, या घटनेत ज्यांना अपंगत्व आलेले आहे तसेच ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्या सर्वांचा खर्च संबंधीत कंपनीने करावा आणि या घटनेचा सविस्तरपणे अहवाल सादर करावा अशा सुचना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या .*

तसेच या पूर्वी देखील तळवडे येथे दुर्दैवी घटना घडली होती त्यासंदर्भात विधानपरिषदेत लक्षवेधी अंतर्गत प्रश्न घेऊन निर्देश देखील दिले होते. यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेने संपूर्ण सर्वेक्षण करून कामगारांना कशा प्रकारे सुरक्षा देता येईल याबद्दल अहवाल मागविला होता. तसेच पिंपरी चिंचवड, भोसरी भागातील रेड झोन चा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. त्यामुळे येथील जमिनीवर असणाऱ्या मजूर कॅम्प हे चिंतेचे विषय बनले आहेत. असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

याप्रसंगी,सारिका ताई पवार,मनीषाताई परांडे,संभाजी शिरसाठ, दादासाहेब बांगर तसेच कामगार उपायुक्त अभय गीते, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे, पोलीस निरीक्षक विश्वनाथ चव्हाण, उपअग्निशामक अधिकारी दिलीप गायकवाड, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहीवाल, पिंपरी चिंचवड मनपा उपअभियंता मनोज बोरसे, विभाग अधिकारी फडतरे, लेबर अधिकारी श्रीकांत चौबे उपस्थित होते.
——

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleअंध मतदारांनी सर्व मतदारांना केले मतदान करण्याचे आवाहन 
Next Article मोशीकर आमदार महेश लांडगे यांच्या एकुजटीने पाठीशी !
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.