भोसरी एम.आय.डी.सी परिसरात सीसीटीव्ही बसवण्याचे लघुउद्योग संघटनेचे आवाहन

भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन व पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
केलेल्या जाहीर आवाहनात म्हटले आहे की,भोसरी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन व पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे पदाधिकारी,संचालक,स्विकृत संचालक,सल्लागार
भोसरी एम.आय.डी.सी. S, J, T, W, ब्लॉक पिंपरी F-II, H ब्लॉक, चिंचवड D- I, D-II, D-III हे सर्व ब्लॉक भोसरी औद्योगिक परिसरातील सेक्टर ७ आणि १०, शांतीनगर, चिखली, कुदळवाडी, तळवडे,ज्योतिबानगर, शेलारवस्ती चिखली, चोविसावाडी चऱ्होली, बारणेवस्ती मोशी याऔद्योगिक परिसरामध्ये चोऱ्या, गुन्हे तसेच अतिरेकी /दहशतवादी कारवाया, समाज कंटकाकडून घातपाती कृत्ये घडू नये याकरिता सुरक्षिततेच्या व कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आपलेसंघटनेचे सदस्य व इतर औद्योगिक आस्थापनेचे / कंपनीचे / शॉपचे समोरील परिसर व रस्तेकव्हर होतील अशाप्रकारे चांगल्या प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे किमान ३० दिवसापर्यंत स्टोअरेज क्षमतेसह बसविण्यात यावे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्या पूर्वीचे व बसविल्यानंतरचे फोटो काढून
जुन्या व नवीन बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्याची माहित भोसरी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनसंतोष फावडे मो.नं 9923124105 व पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना औटी 9881450225 यांना द्यावी.









