भाजपच्या चिंचवड विधानसभा सांगवी काळेवाडी मंडल उपाध्यक्षपदी ललित म्हसेकर यांची निवड

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पक्ष कार्यालयं मोरवाडी पिंपरी चिंचवड येथे भारतीय जनता पक्षाचें शहरध्यक्ष श्री शंकरभाऊ जगताप यांच्या हस्ते ललित म्हसेकर यांची चिंचवड विधानसभा सांगवी काळेवाडी मंडल उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस नामदेव ढाके, अजय पताडे, उपाध्यक्ष व प्रवक्ते राजू दुर्गे,सिद्धेश्वर बारणे,चिंचवड विधानसभा अध्यक्ष काळूराम बारणे, सांगवी काळेवाडी मंडल अध्यक्ष संदीप नखाते,सोमनाथ भोंडवे, प्रसाद कस्पटे,जयनाथ काटे, माजी मंडल अध्यक्ष विनोद तापकीर इत्यादी पदाधिकारी कर्यालयात उपस्थित होते.
ललित म्हसेकर यांनी स्वर्गवासी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गेले २१ वर्ष सामाजिक कार्य करून समाजामध्ये आपला कार्याचा ठसा उमटवला आहे.
यांच्याकडे या आधी भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चा प्रसिद्धी प्रमुख पिंपरी चिंचवड शहर हि जबाबदारी होती, व श्रीमंत दगडशेठ हलवाई गणपती ट्रस्ट वतीने अनेक वर्ष परिक्षक म्हणून देखिल त्यांनी उत्कृष्ठ कामगिरी केली आहे, तसेच यांना धार्मिक क्षेत्राची आवड आहे, सामाजिक कार्याचा दांडगा अनुभव असून स्वर्गवासी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे कट्टर खंदे समर्थक म्हणून यांची ओळख आहे, तसेच
ललित म्हसेकर हे उच्चशिक्षित इंजिनियर पदवीधर असून एका खाजगी आयटी कंपनी मध्ये कार्यरत आहेत.
यावेळी ललित म्हसेकर म्हणाले, माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांला भारतीय जनता पक्षाने व भारतीय जनता पक्षाचे शहारध्यक्ष शंकर जगताप यांनी संधी दिल्याबदल मी शतशा आभारी आहे, मी चिंचवड विधानसभा सांगवी काळेवाडी मंडला मध्ये चांगल्या पद्धतीचे काम करण्याचा प्रयत्न करून दिलेल्या पदाला मान देण्यासाठी कायम प्रयत्नशील राहील.












