Spread the love

 

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  शिव संत लक्ष्मण महाराज समाधी मंदिर आष्टी येथे सुरु असलेल्या बाल सुसंस्कार शिबिरास मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सद्दिच्छा भेट देऊन मार्गदर्शन केले.

यावेळी जरांगे पाटील यांचा सत्कार संयोजक गौतम तौर, प्रताप तौर, वैभव सोळंके, समर्थ तौर, अथर्व देशमुख यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थिती सीताराम महाराज रोडगे यांची यावेळी कीर्तन सेवा झाली. या शिबिरात गीता श्लोक, हरिपाठ, योगासने, मृदंग वंदन, गायन, भजन, वारकरी चाली, संत चरित्र मार्गदर्शन करण्यात आले. व्यक्तिमत्व विकास आणि दैनंदिन शिक्षणाचे मार्गदर्शन करण्यात आला. शिबिराचे आयोजन गौतम तौर, योगेश तौर यांनी केले. १९ दिवस या शिबिरास बालकांनी मोठा प्रतिसाद देत शिबीर यशस्वी केले. शिव संत लक्ष्मण महाराज समाधी मंदिर मधील शिबीर काळात भागवत तौर, नितीन तौर, जिल्हा परिषद सदस्य समाधान तौर यांनी पुष्प सजावट सेवा रुजू केली. आकाश महाराज रंभावरे यांनी मार्गदर्शन केले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version