Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ यांना हिंदू प्रतिष्ठान कडून “हिंदू कुलभूषण” पुरस्कार देऊन सन्मान
ताज्या घडामोडी

पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ यांना हिंदू प्रतिष्ठान कडून “हिंदू कुलभूषण” पुरस्कार देऊन सन्मान

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com28 March 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – माता ही जगात सर्वश्रेष्ठ आहे. राजमाता जिजाऊ यांच्यामुळे शिवाजी हे छत्रपती शिवाजी महाराज झाले. या मातेचे पूजन ही आपली संस्कृती आहे. मग ती भूमाता, राजमाता, किंवा सामान्य जणांची माता असो ती सदा सर्वकाळ वंदनीय आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ वक्ते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी केले.

निगडी येथील ग. दि. माडगूळकर सभागृह येथे हिंदू प्रतिष्ठानच्या वतीने हिंदू स्वाभिमान दिवसानिमित्त व शिवजयंतीचे औचित्य साधून पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ यांना “हिंदू कुलभूषण” पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच राष्ट्रप्रहरी या रौप्य महोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, सचिव उत्तम दंडीमे, , शिवजयंती उत्सवाचे समन्वयक कैलास बारणे व खजिनदार दत्ता सूर्यवंशी, सुहास पोफळे, अतुल आचार्य, कुमार जाधव, रमेश स्वामी, दिलीप कुलकर्णी, दिगंबर रिद्धीवाडे, नामदेव शिंत्रे, विजय गुंजाळ, शिवाजी रेड्डी, ॲड. देवदास शिंदे, मनोज गोबे, मनोज बोरसे, सुरेंद्र कर्मचंदानी अलका आर्य, तेजस्विनी जटाळ आदीं उपस्थित होते.

यावेळी पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ यांनी सांगितले की, १९५२ मध्ये संसदेत झालेल्या चर्चेत स्वतंत्र भारताची दिनदर्शिका करण्याबाबत चर्चा झाली. यावेळी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू दबावात आले, त्यांनी समिती स्थापन केली. या समितीचे अध्यक्ष मेघनाथ साह व पुण्यातील दैनिक केसरीचे करंदीकर आणि देशभरातील इतर सहा सदस्य होते. १९५७ मध्ये दोन्ही संसद सभागृहात दिनदर्शिका मंजुरीबाबत ठराव पास झाला. परंतु आद्यपही त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली नाही. जसा समाज असतो तसे नेते असतात. ज्या व्यक्ती मध्ये पुरुषार्थ नाही, अशा व्यक्तींना समाजाकडून निवडून दिले जाते. आजचा समाज एक किलो तांदूळ, एक महिना मोफत वीज, एक साडी मध्ये आपला स्वाभिमान विकून दोन कवडीच्या नेत्याला निवडून देत आहे. हे समाजाचा स्तर खाली गेल्याचे लक्षण आहे. अशा मुर्खांची संख्या भारतात भरपूर आहे. संसदेत बोलणाऱ्या खासदारांनी किमान तयारी करुन चर्चेत सहभाग घ्यावा व नंतर आपले मत व्यक्त करावे. १९७६ मध्ये देशातील सर्व राजकीय पक्षांनी भारताच्या उद्देशिकेत कोणत्याही चर्चेशिवाय धर्मनिरपेक्षित हा शब्द घातला. यावेळी काँग्रेसचे ३५ खासदार हे पे रोल बेसिसवर होते. ही सोव्हिएत युनियन च्या एका जबाबदार नागरिकाने लिहिले आहे. यावर संसदेत कधीही चर्चा झाली नाही. संसद सभागृहात आपला स्वार्थ समोर ठेवून राजकीय मुद्दा मांडू नये, तर राष्ट्रीय स्वार्थ नजरेसमोर ठेवून राजकीय मुद्दा मांडला पाहिजे असे पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ म्हणाले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काही लोकांनी केवळ एका जातीच्या चौकटीत बसवले आहे. काही लोक जाणून बुजून त्यांचे खरे कार्य लोकांच्या नजरेसमोर आणण्यास इच्छुक नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यापेक्षा मोठे व्हायला नको असे त्यांना वाटते. संसदेतील चर्चेत धर्मनिरपेक्षते बाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मुख्य मुद्दा होता की, भारताच्या मातीत आणि सनातनी च्या रक्तातच धर्मनिरपेक्षता आहे. या धर्मनिरपेक्षतेला बंदिस्त करण्याचा प्रयत्न करू नका असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मत होते.

सावरकर ही व्यक्ती नसून विचार आहे. आरती, पूजापाठ करून कुणी हिंदू होत नाही, आचरणाने हिंदू झाले पाहिजे. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात हिंदूंनी दुसऱ्याच्या धर्मस्थळावर, पूजा पद्धतींवर आक्रमण केल्याचे उदाहरण नाही. ही वेळ हिंदू मुस्लिम करण्याची नाही. तर सनातन सभेची पुनर्स्थापना करण्याची आत्ता वेळ आलेली आहे. हिंदू संस्कृती पुढच्या पिढीकडे देण्याचे काम स्व. धर्मवीर आर्य यांनी स्थापन केलेले हिंदू प्रतिष्ठान करत आहे. सनातन एक सभ्यता आहे, विज्ञान आहे, पंचतत्व आहे. सनातन हा धर्म ब्रम्हांडाच्या उत्पत्ती पासून आहे.

चौकट – मोबाईल मुळे कुटुंबातील व्यक्तींचे संवाद बंद झाले आहेत. त्यामुळे सर्व ज्येष्ठांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांबरोबर संवाद वाढवावा. विशेष करून वयात आलेल्या मुलींबरोबर घरातील ज्येष्ठांचा संवाद झाला पाहिजे. जर संवाद होत नसेल तर, ती वयात आलेली तरुणी बाहेरील व्यक्तीशी संवाद साधेल आणि मग अडचणी वाढतील. आजचे युवक हे बुद्धिमान आहेत.युवकांच्या शक्तीमुळे देशात सत्तांतर झाले आहे. यामध्ये संचार क्रांती आणि समाज माध्यमांचे मोठे योगदान आहे असे पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ यांनी सांगितले.

स्वागत कृष्णकुमार गोयल, सूत्रसंचालन व मानपत्र वाचन उत्तम दंडीमे, आभार सुहास पोकळे यांनी मानले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण करण्याची गरज – ले. कर्नल विनीत नारायण
Next Article “थोडा है थोडे की जरुरत है!” ‘जागतिक क्रीडा स्पर्धा आणि आजचा भारत’ परिसंवादाचा सूर
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.