ताज्या घडामोडीपिंपरीपुणेमहाराष्ट्र

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळीबार

Spread the love

 

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर शुक्रवारी सकाळी गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कोथरूड परिसरात शरद मोहोळ याच्यावर हल्ला करण्यात आला. मोहोळ याच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. यामध्ये शरद मोहोळ गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे. शरद मोहोळ याच्यावर हा जीवघेणा हल्ला एखाद्या टोळीने किंवा अन्य कोणी व्यक्तीने केला, याबाबत अद्याप कोणताही तपशील समोर आलेला नाही. पोलिसांनी अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. ही घटना नेमकी कशी घडली, हेदेखील अद्याप समोर आलेले नाही.

कोण आहे शरद मोहोळ?
शरद मोहोळ पुण्यातील कुख्यात गुन्हेगार आहे. मोहोळवर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. पिंटू मारणे हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. या खटल्यात तो जामिनावर बाहेर आला आणि दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचे त्याने अपहरण केल्या प्रकरणात त्याला पुन्हा अटक झाली. येरवडा कारागृहात शरद मोहोळने विवेक भालेराव याच्या साथीने दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागाचा आरोप असलेल्या कतील सिद्दीकीचा खून केला. या प्रकरणात शरद मोहोळला जामीन मिळाला. मात्र बाहेर आल्यानंतर त्याची गुन्हेगारी कृत्य सुरुच होती. जुलै २०२२ मध्ये त्याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडिपार करण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button