ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी विधानसभा लढविण्यास मी सज्ज – बाळासाहेब ओव्हाळ

Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी विधानसभा लढणवण्यासाठी इच्छुकांची खूप मोठी गर्दी आहे. बाळासाहेब ओव्हाळ यांनी 2017 साली महापलिका निवडणूक लढवली व जिंकली.  अनेक विकासात्मक प्रकल्प राबवले. सकारात्मक नेता  म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
पिंपरी विधानसभा लढविण्यास मी सज्ज  असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता येऊ घातलेल्या 2024 नोव्हेंबर  मध्ये  विधानसभा निवडणूक पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आपण लढणार आहोत.निवडणूक लढविण्याची आपली तयारी असल्याचेही बाळासाहेब ओव्हाळ यांनी स्पष्ट केले.
आपल्या अनेक योजना जनतेसमोर आणल्या. त्यात जनहित प्रतिष्ठान च्या वतीने  लाडकी बहीण माझी ताकद हे अभियान राबवले. आपण 50. हजार महिलापर्यंत पोहोचलो असल्याचा दावा ही त्यांनी केला आहे.
पिंपरी विधानसभेतील संपर्कात असणार्‍या नगरसेवकांची साथ व मतदार संघातील अंतर्गत चाललेल्या चढाओढीत बाळासाहेब ओव्हाळ यांच्या नावाची चर्चा दिसुन येत आहे,ओव्हाळ यांची प्रचार करण्याची शैली व जनतेतील नाव पुढे न करता मदत करण्याची त्यांची सवय त्यामुळे त्यांच्या सोबत जोडल्या जाणारी लोकसंख्या हिच त्यांच्या कार्याची पावती आहे,ओव्हाळ यांची स्वच्छ प्रतिमा व साधी राहणी यामुळे जनतेतील मतदाराशी सतत भेटीगाटी यामुळे त्यांची आमदार होण्याची दाट शक्यता वाढली आहे.
स्थानिक आमदार व माजी आमदार,व भावी आमदार यामध्ये ओव्हाळ यांचे नाव चर्चेत ठरले आहे. बाळासाहेब ओव्हाळ यांना  संपुर्ण पिंपरी चिंचवडचा चेहरा म्हणुन त्यांची ओळख बनली आहे.
पिंपरी विधान सभेकडे सर्व मातब्बर नेत्यांच व संपुर्ण महाष्र्टाचे लक्ष आहे. पिंपरी विधानसभा मतदार संघात जो समाज वंचित राहिला आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले.
बाळासाहेब ओव्हाळ कोणत्या चिन्हा वर निवडणूक लढणार हे अजून स्पष्ट केले नसले तरी ही त्यांना मतदारांचा पाठींबा मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. पिंपरी विधानसभा मतदार संघात प्रतिसाद पाहता बाळासाहेब ओव्हाळ हे ताकदीचे उमेदवार ठरतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button